लहान मुलांमध्ये ताप असेल तर घेण्याची काळजी | Fever in children in marathi

लहान मुलाला ताप (Fever in children in marathi) आला की घरातील सर्वजण परेशान होतात कारण अशावेळी लहान बाळ ताप आल्याने रडत राहते. अशावेळी घाबरून न जाता बाळाला धीर देणे महत्त्वाचे असते.

बच्चो में बुखार होगा तो क्या करे (Fever in children in hindi)

4 Best way to deal Fever in children

लहान मुलाला आलेला ताप म्हणजे काय ? (What is fever in children in marathi?)

सर्वप्रथम मुलाला ताप आला असेल तर तो डोक्यावर हात ठेवून किंवा छातीवर हात ठेवून मोजू नये. डिजिटल थर्मोमीटर ने ताप मोजणे महत्त्वाचे असते.

सामान्यतः बाळाचे शरीराचे  तापमान 98.6 डिग्री फॅरेनहाईट असते. जेव्हा  डिजिटल थर्मामीटर काखेत  ठेवल्यावर त्यावरील तापमान 100 डिग्री फॅरेनहाईटच्या वर दाखवत असेल तर त्याला ताप असतो.

शक्यतो डिजिटल थर्मामीटर चा वापर करणे चांगले असते कारण जर मर्क्युरी थर्मामीटर काचेचे असते व त्यात मर्क्युरी असतो, जो अत्यंत विषारी असतो.

बाळाला ताप आला तर काय करावे ? (What to do when there is fever in children in marathi?)

आता आपण मूळ मुद्द्यावर येऊन जेव्हा बाळाला ताप आला असेल व थर्मामीटर वर 100 डिग्री फॅरेनहाईटच्यावर असेल, तेव्हा आपल्या जवळील तापाचे औषध बाळाला पाजावे. पॅरासिटेमॉल 15 मिलीग्राम पर केजी प्रमाणे द्यावा किंवा आपल्या डॉक्टरांनी दिलेल्या डोस बाळाला पाजावा.

औषध पाजल्यानंतर बाळाचा ताप जर अर्ध्या तासात कमी होत नसेल किंवा वाढत असेल तर कोमट पाण्याने बाळाचे अंग पुसून घ्यावे किंवा आंघोळ घातली तरी चालते त्यामुळे बाळाचा ताप लगेच उतरतो.

बाळाला ताप येण्याचे कारण काय असतात ? (What are causes of fever in children in marathi?)

बाळाला ताप येण्याची कारणे बरीच असू शकतात

सर्वात सामान्य कारण म्हणजे शरीरात जर जंतुसंसर्ग झाला असेल तर ताप येतो. हे जंतू विषाणू व्हायरस किंवा जीवाणू बॅक्टेरिया असू शकतात.

जेव्हा हे जंतू शरीरात शिरतात तेव्हा त्यांच्या वाढीसाठी पोषक असे तापमान शरीराचे असते. अशावेळी आपल्या शरीरातील थर्मोस्टॅट म्हणजे मेंदूतील हायपोथॅलॅमस हे त्या जंतूंचा विनाश करण्यासाठी शरीराचे तापमान वाढवत असते वेगवेगळ्या जंतूंमुळे तापाच्या वेळ सुद्धा विविध असू शकतात.

 • टायफाईड मध्ये सतत जास्त ताप येत राहतो.
 • क्षयरोगामध्ये  संध्याकाळी ताप येतो.
 • डेंग्यू मध्ये तापा सोबत अंगदुखी होते.

जरी शरीराचे तापमान वाढल्याने जंतू नष्ट होतात पण काही जंतू नष्ट होत नाही अशा वेळी जंतुसंसर्ग कमी करण्यासाठी अँटिबायोटिक औषधांची  गरज भासू शकते.

तापाची कारणे खालीलप्रमाणे असतात

 • विषाणू जिवाणू जंतू संसर्ग झालेला असेल
 •  सर्दी खोकला झालेला असेल
 • क्षयरोग, न्यूमोनिया, फ्लू असेल
 • लघवीचा संसर्ग
 • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले असेल.
 • लसीकरणानंतर एक ते दोन दिवस ताप येऊ शकतो.

तापाची लक्षणे काय असतात ? (What are symptoms of fever in children in marathi?)

 •  शरीर खूप गरम झाले असेल.
 •  बाळ चिडचिड करत रडत असेल.
 •  बाळ तोंडाने काहीच घेत नसेल.
 •  बाळ सुस्त पडलेले असेल.
 •  बाळाला थंडी वाजून आलेली असेल.

वरील कोणतेही लक्षण लक्षात आल्यावर पालकांनी बाळाचा ताप मोजणे आवश्यक असते. जर तुमचे बाळ तीन महिन्या खालील असेल व त्याला ताप असेल तर लगेच आपल्या डॉक्टरांशी संपर्क करणे महत्त्वाचे असते.

ताप कमी करण्यासाठी काय करावे ?

सर्वप्रथम घरात तापाचे औषध असेल तर ते दिले पाहिजे. तापासाठी पॅरासिटेमॉल सिरप हे बाळाच्या वजनानुसार द्यावे. औषधाचे दुष्परिणाम सर्वात कमी असतात त्यामुळे ते दर सहा तासांनी देऊ शकतात.

* बाळाचे कपडे सैल असले पाहिजे.
* औषध देऊन सुद्धा ताप कमी होत नसेल तर कोमट पाण्याने स्पंजिंग करावे.
* बाळाला मोकळ्या वातावरणात न्यावे.
* रूम मध्ये खेळती हवा ठेवावी.

ताप कमी करण्यासाठी काय करू नये ?

 * बाळाला ओल्या कपड्यामध्ये गुंडाळू नये.
 * बाळाला स्वेटर,चादर किंवा रगने पांघरू नये.
 * बर्फाच्या पाण्याने बाळाला आंघोळ घालू नये.
 * बाळा जवळ जास्त लोकांनी गर्दी करू नये.

तापामध्ये डॉक्टरांचा सल्ला कधी घेतला पाहिजे ?

 * दोन-तीन दिवस सातत्याने ताप येत असेल
 * लघवीचे प्रमाण कमी झालेले असेल
 * जेवण व्यवस्थित करत नसेल
 * तापा सोबत अंगावर पुरळ आलेली असेल
 * श्वास घेण्यास त्रास होत असेल
 * डोकेदुखी, अंगदुखी असेल
 * खूपच अशक्तपणा आलेला असेल
 * झटके आले तर
 मुलाला ताप आल्यावर घाबरून न जाता त्याच्या खाण्या-पिण्यावर लघवीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते परंतु वरील काही लक्षणे दिसून आली तर त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असते.

तापा मध्ये कोणता आहार घ्यावा ?

 * सर्वप्रथम महत्वाचे म्हणजे ताप येत असेल तर भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.
 * तेलकट पदार्थ सोडून इतर सकस आहार घेऊ शकतात.
 * फळ किंवा फळांचा रस घेऊ शकतात.
 * वरण भात, दही भात, खाऊ शकतात.

तापाचे काय कॉम्प्लिकेशन असतात ?

ताप हा काही आजार नाही ते एक लक्षण असते परंतु तापाचे काही कॉम्प्लिकेशन असतात.
* तापातील झटके
लहान मुलांमध्ये वयाच्या सहा महिने ते पाच वर्ष या वयोगटात ताप आल्यावर झटके येऊ शकतात हे झटके ताप चढत असताना किंवा ताप उतरत असताना सुद्धा येऊ शकतात दोन ते पाच टक्के मुलांमध्ये तापातील झटके दिसून येतात.

* शरीरातील पाणी कमी होणे (डिहायड्रेशन)
जेव्हा मुलांना ताप येतो अशा वेळी त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होते म्हणूनच आपल्या मुलाला अशा वेळी जास्तीत जास्त पाणी पाजणे महत्त्वाचे असते , परंतु  जर आपला मुलगा खूप  सुस्त पडला असेल अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

*(हॅलोसिनेशन) बडबड करणे 
बरेचदा शरीराचे तापमान 103 डिग्री फॅरेनहाईटच्यावर गेले तर बडबड करणे जसे ज्या गोष्टी समोर नाही त्या विषयी बोलणे हे लक्षण दिसून येते.

वरील माहिती वाचल्यानंतर तुम्हाला नक्की समजून आले असेल कि तुमच्या मुलाला ताप आला असेल त्या वेळेस काय करावे. वरील लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेयर करा.

7 thoughts on “लहान मुलांमध्ये ताप असेल तर घेण्याची काळजी | Fever in children in marathi”

Leave a Comment