Best facts about Posterior Urethral Valve in marathi

पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्ह (Posterior Urethral Valve in marathi) हा जन्मत: असणारा गंभीर आजार असतो. हा आजार जाणून घेण्यासाठी आपल्याला लहान बाळाच्या मूत्रमार्ग कसा असतो हे माहीत असणे महत्त्वाचे असते.

 मूत्रमार्ग हा किडनी, यूरेटर, ब्लॅडर ,युरेथ्रा पासून बनलेला असतो.

  1. किडनी- किडनी हे घेवड्याच्या बी च्या आकारासारखे अवयव असते. किडनी शरीरातील रक्त फिल्टर करून त्यातील जास्तीचे पाणी व अनावश्यक गोष्टी लघवीतून बाहेर टाकते. सामान्यत आपल्या शरीरात दोन किडनी असतात. किडनी या पोटाच्या मागील बाजूस कमरेत असतात.
  2. यूरेटर- किडनी पासून लघवी वाहून नेण्यासाठी यूरेटर नावाची नळी असते. या नळीची लांबी 25 सेंटिमीटर असते. ही नळी खाली ब्लॅडरला जोडलेली असते.
  3. ब्लॅडर- ब्लॅडर ही मूत्र जमा करणारी पिशवी असते. त्याची जागाही ओटीपोटात असते.                                       
  4. युरेथ्रा- युरेथ्रा सुद्धा एक प्रकारची नळी असते जी ब्लॅडरमध्ये जमा झालेली लघवी शरीराच्या बाहेर फेकते.

 चला, तर मग नवजात बाळांना असणाऱ्या पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्हबद्दल (posterior urethral valve in newborn in marathi) संपूर्ण माहिती जाणून घेऊ.

पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्ह म्हणजे काय? (What is posterior urethral valve in marathi?)

 पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्ह म्हणजे युरेथ्राच्या मागील भागात असलेला मांसल पडदा. हा पडदा बाळ आईच्या गर्भात असतांनाच सुरुवातीच्या काही महिन्यात तयार होतो. पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्ह हा मुलांमध्येच दिसून येतो.

पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्ह हा बाळ आईच्या गर्भात असतांनाच लघवीला अडथळा आणत असतो. त्यामुळे लघवीच्या मार्गावर सूज येत असते. म्हणून किडनी, यूरेटर व ब्लॅडरवर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. 

दुसरी समस्या म्हणजे आईच्या गर्भातून पाणी हे गर्भधारणेच्या पाच महिन्यापासून बाळाच्या लघवीनेच बनलेले असते. . पोस्टेरियर युरेथ्रल व्हाल्व्हमुळे बाळाची लघवी अडकून राहत असल्याने आईच्या गर्भातील पाणी कमी राहते. ज्यामुळे बाळाच्या फुफ्फुसाच्या विकासाला सुद्धा धोका असतो. त्यामुळे हा आजार बाळ जन्माला येण्या अगोदरच आईच्या सोनोग्राफीमध्ये बरेचदा दिसून येतो.

पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्ह तयार होण्याचे कारण काय असते ? (What is cause of posterior urethral valve in marathi?)

पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्ह तयार होण्याचे कारण स्पष्ट नसते परंतु जुळे मुले, वडील व मुलगा यांमध्ये पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्ह दिसून येतो. त्यामुळे काही वेळेस याचे कारण अनुवंशिकता असू शकते. जवळपास जन्माला येणाऱ्या पाच हजार मुलांमागे एका मुलाला हा आजार असू शकतो.

पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्ह तयार होण्याचे लक्षणे काय असतात? (What are symptoms of posterior urethral valve in marathi?)

बाळ जन्माला येण्याआधी आईच्या गर्भात असतांना पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्ह मुळे बाळाच्या किडनीवर सूज आलेली असते. अँन्टेन्टल हैड्रोनेफ्रोसीस (antenatal hydronephrosis in marathi) असे म्हणतात

 जन्माला आल्यानंतर खालील प्रकारची लक्षणे दिसून येतात

  1. वारंवार लघवीचा संसर्ग होणे. पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्हमुळे बाळाची लघवी ब्लॅडरमध्ये मध्ये तुंबून राहते.त्यामुळे तेथे संसर्ग तयार होत असतो. यात बाळाला खूप प्रमाणात ताप येत असतो.
  2. लघवी करण्यासाठी त्रास होणे व थेंब थेंब लघवी होणे.
  3. लघवी ब्लॅडरमध्ये तुंबून राहत असल्याने ती पुन्हा यूरेटरच्या मार्गाने किडनी पर्यंत पोहोचते व त्याचा किडनीवर गंभीर परिणाम होतो. या परिस्थितीला व्हजायको युरेटेरिक रिफ्लक्स (Vasicoureteric reflux in marathi) असे म्हणतात.
  4. लघवी ब्लॅडरमध्ये तुंबून राहत असल्याने बाळाचा रक्तदाब सुद्धा वाढतो.
  5. किडनीवर गंभीर परिणाम होत असल्याने बाळाच्या वाढ व विकासावर त्याचा उलटा परिणाम होतो.
  6. पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्हमुळे बाळ आईच्या गर्भात असताना गर्भातील पाणी कमी झाल्याने बाळाच्या फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होतो. व फुफ्फुसांची वाढ झाली नसेल तर बाळाच्या जीवाला धोका असतो.

पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्हचे निदान कसे करण्यात येते?

जन्माआधी बाळ गर्भात असताना आईची सोनोग्राफी केली असता, आईच्या गर्भात पाणी किती प्रमाणात आहे हे समजून येते. जे जास्त करून बाळाच्या लघवीमुळे बनलेले असते. पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्ह सोनोग्राफीत दिसून येत नाही परंतु 

 काही गोष्टींमुळे पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्हचे निदान करण्यात येऊ शकते.

  1. बाळाच्या किडनी, यूरेटर, ब्लॅडरवर सूज आलेली असते. यामुळे आपल्याला लघवीच्या मार्गात काहीतरी अडथळा आहे हे समजून येते.
  2. आईच्या गर्भात खूप कमी प्रमाणात पाणी असणे कारण बाळाच्या लघवीच्या मार्गात अडथळा असणे किंवा किडनीचे कार्य हे कमी झालेले असणे.अशावेळी शिशु शल्यचिकित्सकसांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

 पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्हचे खरे निदान जन्मानंतर होते. त्यासाठी बाळाच्या खालील तपासण्या करण्यात येतात. 

  1. पोटाची सोनोग्राफी– बाळाची सोनोग्राफी करण्यात येते त्यात किडनीवर आलेली सूज दिसून येते.
  2. MCUG– बाळाची लघवी बाळाच्या शरीरातून कशी बाहेर पडत आहे हे समजून घेण्यासाठी बाळाच्या लघवीत डाय सोडून एक्स-रे काढण्यात येतो.
  3. डी एम एस ए  स्कॅन– किडनीचे कार्य तपासणी करण्यासाठी केला जातो. यात बाळाच्या रक्तात डाय सोडला जातो. व किडनीच्या मार्गाच्या इमेजेस घेतल्या जातात.
  4. रक्ताच्या तपासण्या– बाळाच्या रक्ताच्या तपासणीवरून किडनीचे कार्य कसे आहे हे समजून येते.
  5. लघवीची तपासणी– लघवी मध्ये काही संसर्ग झालेला आहे का, हे तपासण्यासाठी लघवीची तपासणी करण्यात येते.

पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्हचा उपचार काय असतो ? (What is treatment of posterior urethral valve in marathi?)

सर्वप्रथम बाळाच्या परिस्थितीनुसार उपचार करण्यात येतो. सर्वात महत्त्वाचा उपचार म्हणजे बाळाच्या लघवीच्या मार्गातील अडथळा दूर करणे हा असतो. परंतु त्याआधी बाळाची प्रकृती स्थिर असणे सुद्धा महत्त्वाचे असते.

सर्वप्रथम बाळाला असलेली लक्षणे दूर करण्यात येतात त्यासाठी बाळाच्या लघवीच्या मार्गामध्ये नळी टाकण्यात येते, जेणेकरून बाळाची तुंबलेली लघवी बाहेर काढता येते.

जर बाळाच्या शरीरातील पाणी व क्षार कमी झाले असतील तर सलाईन द्वारे ते सामान्य करण्यात येतात व बाळाला लघवीचा संसर्ग झालेला असेल तर त्याला अँटिबायोटिक्सचे इंजेक्शन सुद्धा लावण्यात येतात.

इंडोस्कोपिक अँबलेशन (Endoscopic ablation of posterior urethral valve in marathi) – बाळाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर बाळाच्या लघवीच्या  मार्गातील पडदा हा जाळून टाकण्यात येतो ज्यामुळे बाळाचा लघवीचा मार्ग मोकळा होतो व ब्लॅडर मध्ये लघवी तुंबून राहण्याचे प्रमाण कमी होते.

जरी बाळाचा पडदा जाळल्यानंतर बाळाचे लक्षणे कमी होतात परंतु अशा बाळांना यूरोलॉजिस्टला वारंवार तपासणीसाठी दाखवणे फार महत्त्वाचे असते.

पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्हचे काय कॉम्प्लिकेशन असतात?

जवळपास 30% टक्के पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्हचे असलेल्या बाळांमध्ये किडनी काही प्रमाणात निकामी होऊ शकते. जर ऑपरेशन लहान वयात झाले तर हे कॉम्प्लिकेशन होण्याचे प्रमाण खूप कमी असते. 

काही बाळाच्या किडनी वर सूज आलेली असते व काही बाळांमध्ये लघवी ब्लॅडरमधून लघवीच्या नळीत शिरत असते. ऑपरेशन झालेल्या 50% बाळांमध्ये होण्याचे प्रमाण कमी होते. व उरलेल्या 50% टक्के बाळांमध्ये हा आजार राहू शकतो. त्यासाठी स्वतंत्र ऑपरेशन लागू शकते. त्याला युरेटरल रिइम्प्लानटेशन (ureteric reimplantation) असे म्हणतात.

पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्ह हा मुलींमध्ये असतो का ?

नाही. पोस्टेरियर युरेथ्रल व्हाल्व्ह हा मुलींमध्ये नसतो.

Rate this post

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

1 thought on “Best facts about Posterior Urethral Valve in marathi”

Leave a Comment