9 कॉम्बीफ्लाम टॅबलेट चे उपयोग

Combiflam Tablet Uses in Marathi : कॉम्बीफ्लाम टॅबलेट चा वापर हा अंगदुखी, तापासाठी करण्यात येतो. कॉम्बीफ्लाम टॅबलेट ही सामान्यपणे वापरात येणारी गोळी आहे जी मेडिकल काउंटर डॉक्टरांच्या प्रेस्क्रिप्शन वर सहजपणे मिळून जाते. चला तर मग जाणून घेऊया कॉम्बीफ्लाम टॅबलेट विषयीची माहिती.

Table of Contents

कॉम्बीफ्लाम टॅबलेट म्हणजे काय ?

कॉम्बीफ्लाम टॅबलेट ही एक प्रकारची पेन किलर टॅबलेट आहे जी ताप व अंगदुखीसाठी वापरण्यात येत असते. ही टॅबलेट सॅनोफी कंपनी ने तयार केलेली आहे. कॉम्बीफ्लाम टॅबलेट २० टॅबलेट च्या स्ट्रीप मध्ये उपलब्ध असते.

combiflam tablet in marathi

कॉम्बीफ्लाम टॅबलेट चे कन्टेन्ट काय आहे ?

कॉम्बीफ्लाम टॅबलेट मध्ये पॅरासिटामोल आणि आयबुप्रोफेन ही औषधे असतात. हे दोन्ही औषधी पेन किलर म्हणून काम करतात. एका कॉम्बीफ्लाम टॅबलेट मध्ये ३२५ मिलिग्रॅम पॅरासिटामोल व ४०० मिलिग्रॅम आयबुप्रोफेन औषध असते.

पॅरासिटामोल३२५ मिलिग्रॅम
आयबुप्रोफेन४०० मिलिग्रॅम
combiflam tablet in marathi

कॉम्बीफ्लाम टॅबलेट चे कार्य काय आहे ?

कॉम्बीफ्लाम टॅबलेट मध्ये पॅरासिटामोल आणि आयबुप्रोफेन हे औषध आहे.

 • पॅरासिटामोल हे औषध अँटी पायरेटिक (antipyretic) व यनलजेसिक (analgesic) म्हणून काम करत असते. अँटिपायरेटिक म्हणजे ताप कमी करणारे औषध तसेच यनलजेसिक म्हणजे दुखणे कमी करणारे औषध, म्हणजे पॅरासिटामोल औषधाच्या दोन प्रकारचे कार्य असते.
 • आयबुप्रोफेन हे औषध यनलजेसिक म्हणून काम करत असते जे मेंदूकडे सिग्नल पाठवते ज्यामुळे दुखण्यासाठी जबाबदार असणारे केमिकल मेसेंजर कमी प्रमाणात सोडते त्यामुळे अंगदुखी कमी होण्यास मदत होते.

कॉम्बीफ्लाम टॅबलेट चा वापर कशासाठी होतो | Combiflam Tablet Uses in Marathi

 • अंगदुखी : कॉम्बीफ्लाम टॅबलेट ही एक प्रकारची नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लमेटोरी औषध असल्याने ते अंगदुखी कमी करण्यासाठी वापरात येत असते.
 • ताप : कॉम्बीफ्लाम टॅबलेट मध्ये पॅरासिटामोल हे औषध आहे जे ताप कमी करण्यासाठी फायद्याचे असते. तसेच त्यातील दुसरे औषध म्हणजे आयबुप्रोफेन सुद्धा ताप कमी करण्यासाठी मदत करत असते.
 • सूज : बऱ्याचदा शरीरात काही लागल्याने सूज येत असते अश्या वेळेस कॉम्बीफ्लाम टॅबलेट चा वापर सूज कमी करण्यासाठी येत असतो.
 • डोकेदुखी : कॉम्बीफ्लाम टॅबलेट ही एक प्रकारची यनलजेसिक टॅबलेट असल्याने, ही गोळी डोकेदुखी कमी करण्यास मदत करत असते.
 • मायग्रेन : मायग्रेन या आजारात एका बाजूला डोकेदुखी चालू होते त्यामुळे रुग्ण खूप बेचैन होत असतो अश्या वेळेस कॉम्बीफ्लाम टॅबलेट काही प्रमाणात डोकेदुखी कमी करण्यास मदत करत असते.
 • मासिक पाळीचे दुखणे : मासिक पाळीचे दुखण्यामध्ये कॉम्बीफ्लाम टॅबलेट चा वापर करता येऊ शकतो. जर रक्तस्त्राव जास्त प्रमाणात असेल तर आपली डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या टॅबलेट चा वापर करावा.
 • दातदुखी : बऱ्याच लोकांमध्ये दाढ काही वेळेस जास्त प्रमाणात दुखून येत असते अश्या वेळेस कॉम्बीफ्लाम टॅबलेट चा वापर करण्यात येऊ शकतो.
 • स्नायू मध्ये मोच असल्यास : काही वेळेस शरीरातील स्नायूमध्ये मोच येत असते अश्या वेळेस कॉम्बीफ्लाम टॅबलेट तो स्नायूतील तणाव कमी करण्यास मदत करत असते.
 • ऑपरेशन झाल्यानंतर : कॉम्बीफ्लाम टॅबलेट हे दुखणे कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे औषध आहे. त्यामुळे ऑपरेशन नंतर दुखणे कमी करण्यासाठी कॉम्बीफ्लाम टॅबलेट चा वापर केला जाऊ शकतो.
combiflam tablet in marathi
Combiflam Tablet Uses in Marathi

कॉम्बीफ्लाम टॅबलेट चा वापर कमीत कमी वेळेसाठी करावा कारण जास्त प्रमाणात या गोळीचा वापर धोकेदायक ठरू शकतो.

कॉम्बीफ्लाम टॅबलेट कशी घ्यावी ?

कॉम्बीफ्लाम टॅबलेट ४० किलो वजनावरील किंवा १२ वर्षावरील माणसामध्ये वापरण्यात येऊ शकते. १ गोळी दिवसातून तीन वेळेस घेऊ शकतो. दोन डोस मधील कमीत कमी अंतर ६ तास ठेवावे.

जर गोळी चा डोस तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस घ्यावा लागला तर आपली डॉक्टरांशी संपर्क करणे फार महत्वाचे असते.

कॉम्बीफ्लाम टॅबलेट ही पूर्ण टॅबलेट पाण्यासोबत किंवा दुधासोबत घ्यावी. गोळीला शक्यतो क्रश करू नये. शक्यतो कॉम्बीफ्लाम टॅबलेट चा वापर जेवणानंतर करावा कारण ही गोळी एक प्रकारची नॉन स्टिरॉइडल अँटीइंफ्लामेंटरी औषध असल्याने त्यामुळे ऍसिडिटी होत असते किंवा तुम्ही या गोळीचा वापर अँटासिड गोळीसोबत सुद्धा करू शकतात.

कॉम्बीफ्लाम टॅबलेट चे काय दुष्परिणाम असतात ?

कॉम्बीफ्लाम टॅबलेट चे दुष्परिणाम जास्त प्रमाणात नसतात. परंतु तुम्हाला गोळी घेतल्यानंतर जास्त प्रमाणात त्रास होण्यास सुरवात झाली तर आपली डॉक्टरांशी संपर्क करावा. काही सामान्यपणे दिसून येणारे दुष्परिणाम हे खालीलप्रमाणे असतात.

 • मळमळ होणे
 • छातीत जळजळ होणे
 • अपचन होणे
 • पोटदुखी.

कॉम्बीफ्लाम टॅबलेट घेतांना काय काळजी घ्यावी ?

 • गर्भ अवस्थेत : जर तुम्ही गर्भवती असाल तर कॉम्बीफ्लाम टॅबलेट घेणे अवश्य टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही गोळी घेऊ नये.
 • स्तनपान करतांना : स्तनपान करत असतांना तुम्ही कॉम्बीफ्लाम टॅबलेट चा वापर करू शकतात कारण कॉम्बीफ्लाम टॅबलेट चे कन्टेन्ट आईच्या दुधातून बाळाला मिळत नाही त्यामुळे ते बाळाच्या आरोग्य घटक नसते. परंतु जास्त प्रमाणात या गोळीचा वापर करणे टाळावे. नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 • मद्यपान केले असेल तेव्हा : मद्यपान केलेले असेल तर कॉम्बीफ्लाम टॅबलेट घेणे टाळावे कारण मद्य व या गोळीतील औषधाने पोटातील आम्ल वाढते व ऍसिडिटी चा त्रास वाढतो.
 • गाडी चालवण्याआधी : तुम्ही गाडी चालवण्याआधी कॉम्बीफ्लाम टॅबलेट चा वापर करू शकतात परंतु तुम्हाला गोळी घेतलत्यानंतर दिसण्यास त्रास होत असेल किंवा झोप येत असेल तर गाडी चालवणे टाळावे.
 • किडनी विकार : जर तुम्ही किडनी विकाराने ग्रसित असाल तर कॉम्बीफ्लाम टॅबलेट घेणे टाळावे. नेहमी आपली डॉक्टरांशी संपर्क करूनच कॉम्बीफ्लाम टॅबलेट चा वापर करावा.
 • लिव्हर विकार : जर तुम्ही लिव्हर चा आजाराने ग्रसित असाल तरी सुद्धा तुम्ही कॉम्बीफ्लाम टॅबलेट घेणे टाळावे कारण हे औषध नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामटेरी औषध असल्याने ते लिव्हर ला धोकेदायक ठरू शकते. आपली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच गोळी चा वापर करावा.
 • हृदय विकार : जर तुम्ही हृदय विकाराने ग्रसित असाल किंवा तुमची अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी झालेली असेल तर तुम्ही ही गोळी घेणे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या गोळी चा वापर करणे आवश्यक आहे.
 • दमा : जर तुम्ही दमा या आजाराने ग्रसित असाल तर कॉम्बीफ्लाम टॅबलेट घेणे टाळावे.
 • अल्सर : तुम्हाला स्तमक अल्सर असेल तर तुम्ही कॉम्बीफ्लाम टॅबलेट घेणे टाळावे कारण जर तुम्ही अश्या वेळेस ही गोळी घेतली तर तुमचा आजार वाढू शकतो.

कॉम्बीफ्लाम टॅबलेट बद्दलचे गैरसमज

 • कॉम्बीफ्लाम टॅबलेट वर भारतात बंदी आहे : कॉम्बीफ्लाम टॅबलेट वर भारतात बंदी नाही. मागील बऱ्याच वर्षांपासून सॅनोफी कंपनी कॉम्बीफ्लाम टॅबलेट चे उत्पादन करते.
 • कॉम्बीफ्लाम वर जगात बंदी आहे : कॉम्बीफ्लाम हे भारतात तयार केले जाते व फक्त भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. भारतात कॉम्बीफ्लाम टॅबलेट वर बंदी नाही.
 • कॉम्बीफ्लाम टॅबलेट ने किडनी व लिव्हर ड्यामेज होते : कॉम्बीफ्लाम टॅबलेट चा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा व सांगितलेल्या योग्य डोस मध्ये करावा. कॉम्बीफ्लाम टॅबलेट चा जास्त दिवस वापर केल्याने त्याचा किडनी किंवा लिव्हर वर दुष्परिणाम होऊ शकतो त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच या औषधाचा जास्त दिवस वापर करावा.
 • कॉम्बीफ्लाम टॅबलेट मध्ये स्टिरॉइड असतात : कॉम्बीफ्लाम हे नॉन स्टिरॉइडल अँटिइन्फेमेंटरी औषध आहे त्यात स्टिरॉइड नसते. नॉन स्टिरॉइडल अँटिइन्फेमेंटरी औषध हे वेदनाशामक औषध असते त्यात कोणत्याही प्रकारचे स्टिरॉइड औषध नसते.

बऱ्याचदा विचारण्यात येणारे प्रश्न

कॉम्बीफ्लाम टॅबलेट कुठे मिळू शकते ?

कॉम्बीफ्लाम टॅबलेट ही कोणत्याही मेडिकल दुकानावर डॉक्टरांच्या प्रेस्क्रिप्शन वर सहजपणे उपलब्ध असते.

कॉम्बीफ्लाम टॅबलेट चे व्यसन लागते का ?

कॉम्बीफ्लाम टॅबलेट चे व्यसन लागत नाही परंतु वारंवार दुखण्यासाठी कॉम्बीफ्लाम टॅबलेट चा वापर करणे टाळावे.

कॉम्बीफ्लाम टॅबलेट घेतांना जेवण टाळावे का ?

जेवण केल्यानंतर कॉम्बीफ्लाम टॅबलेट घेणे फायद्याचे असते कारण उपाशीपोटी कॉम्बीफ्लाम टॅबलेट घेतली तर मळमळ, ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते.

एक्सपायर झालेली कॉम्बीफ्लाम टॅबलेट घेतल्याने काय त्रास होतो ?

एक्सपायर कॉम्बीफ्लाम टॅबलेट चुकीने घेतली गेली व तुम्हाला काही दुष्परिणाम दिसून आला तर तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क करावा.

कॉम्बीफ्लाम टॅबलेट ही पेन किलर टॅबलेट आहे का ?

कॉम्बीफ्लाम टॅबलेट मध्ये नॉन स्टीरॉइडल अँटिइन्फ्लमेटरी औषध असल्याने ते पेन किलर म्हणून काम करत असते. त्यामुळे कॉम्बीफ्लाम टॅबलेट ही पेन किलर टॅबलेट आहे.

कॉम्बीफ्लाम टॅबलेट किती वेळ काम करत असते ?

कॉम्बीफ्लाम टॅबलेट ६-८ तास काम करत असते.

कॉम्बीफ्लाम टॅबलेट चहा किंवा कॉफी सोबत घेऊ शकतो ?

कॉम्बीफ्लाम टॅबलेट कॅफ्फेईन असलेल्या द्रव्यांसोबत घेणे टाळावे. त्यामुळे कॉम्बीफ्लाम टॅबलेट चहा किंवा कॉफी सोबत घेणे टाळावे.

5/5 - (2 votes)

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

Leave a Comment