खाली न आलेले अंडकोष | Undescended Testis in Marathi

Undescended Testis in marathi : अंडकोष हे मुलांमधील लैंगिक ग्रंथी असते. अंडकोष हे प्रजननासाठी आवश्यक  शुक्राणू व लैंगिक हार्मोन टेस्टोस्टेरोन तयार करते.

आईच्या गर्भात बाळ असते तेव्हा बाळाचे अंडकोष हे बाळाच्या पोटात असते. सामान्यतः अंडकोष हे बाळ जन्माला येण्याआधी इंग्वायनल कॅनॉलमधून स्क्रोटममध्ये उतरत असते. स्क्रोटम म्हणजे लिंगाच्या खाली असलेला पिशवी सारखा भाग.

चला तर मग जाणून घेऊया अनडिसेंडेड टेस्टीस (खाली न आलेले अंडकोष) बद्दल संपूर्ण माहिती व त्याचे दुष्परिणाम व उपचार.

Table of Contents

अनडिसेंडेड टेस्टीस म्हणजे काय? | Undescended Testis in Marathi

बाळाचे अंडकोष जर इंग्वायनल कॅनॉल मधून खाली आलेले नसेल तर अशा परिस्थितीला अनडिसेंडेड टेस्टीस असे म्हणतात. जन्माला आलेल्या बाळांपैकी पूर्ण दिवसाच्या बाळांमध्ये हे होण्याचे प्रमाण 4% ते 5% असते,तर कमी दिवसाच्या बाळांमध्ये 15 ते 20 टक्के असते.

बराच वेळा पहिल्या काही महिन्यात खाली न आलेले अंडाशय स्क्रोटम मध्ये येऊन जाते. काही वेळेस दोन्ही बाजूचा अंडाशय खाली आलेले नसते हे होण्याचे प्रमाण दहा टक्के बालकांमध्ये आढळते.

undescended testis in marathi

अनडिसेंडेड टेस्टीस होण्याचे कारण काय असते ?

अनडिसेंडेड टेस्टीस होण्याचे कारण काहीच स्पष्ट नसते. परंतु अनुवंशिकता, आईचे आरोग्य, गर्भ असताना आईने केलेले धूम्रपान हे अनडिसेंडेड टेस्टीस होण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. 

बाळ कमी दिवसाचे जन्माला आलेले असेल किंवा बाळ कमी वजनाचे जन्माला आलेले असेल तर अनडिसेंडेड टेस्टीसचे प्रमाण अशा बाळांमध्ये सामान्य बाळापेक्षा 3 ते 4 पटीने जास्त असते.

अनडिसेंडेड टेस्टीसचे लक्षणे काय असतात?

बरोबर खाली न आलेले अंडाशय इंग्वायनल कॅनॉलच्या टोकाजवळ असते. त्यामुळे डॉक्टर शारीरिक तपासणी वरून अनडिसेंडेड टेस्टीसचे निदान करतात. परंतु जर अंडाशय इंग्वायनल कॅनल मध्ये तपासणी करून देखील दिसून आले नाही तर ते 

  • बाळाच्या पोटात असू शकते.
  • इंग्वायनल कॅनॉलच्या खूप वरच्या भागात ते असू शकते.
  • अंडाशय हे छोटे झालेले किंवा नष्ट झालेले असते.

अनडिसेंडेड टेस्टीस चे निदान कसे करण्यात येते?

डॉक्टर, बाळाला आणि टेस्टचे निदान त्याच्या शारीरिक तपासणी वरून करतात. जर अंडाशय या तपासणीमध्ये आढळून आले नाही तर खालील तपासण्या करण्यात येतात.

सोनोग्राफी 

बाळाच्या पोटाच्या व ओटीपोटाच्या सोनोग्राफीमध्ये बाळाचे अंडाशय कोणत्या भागात आहे?, दोन्ही बाजूला तर नाही ना?, ही माहिती समजून येते. बऱ्याचदा ही माहिती पुरेशी असते. क्वचितच डॉक्टर एम आर आय काढण्यास सांगू शकतात.

अनडिसेंडेड टेस्टीस चा काय उपचार असतो?

जन्माच्या वेळी अनडिसेंडेड टेस्टीस असलेल्या बाळांच्या 50% बाळांमध्ये अंडाशय वयाच्या तीन ते चार महिन्यांमध्ये स्क्रोटममध्ये येते. त्यामुळे फक्त 1 ते 2 टक्के मुलांमध्ये अंडाशय हे स्क्रोटममध्ये उतरत नाही. त्यासाठी ऑपरेशनची गरज असते. 

अनडिसेंडेड टेस्टीस चे ऑपरेशन हे दोन प्रकारे करण्यात येते एक म्हणजे जांघेत चिरा लावून ज्याला ऑर्किडोपेक्सि म्हणतात तसेच दुसरे म्हणजे लॅपरोस्कोपिक ऑर्किडोपेकक्सि ज्यात बेंबीजवळून दुर्बीण टाकून केले जाते.

ऑर्किडोपेक्सि (Orchidopexy)

लहान बाळांचे सर्जन पोटात असलेले बाळाचे अंडाशय मोकळे करून स्क्रोटममध्ये आणतात. या ऑपरेशनला ऑर्किडोपेक्सि असे म्हणतात.

या ऑपरेशनमध्ये बाळाच्या ज्या बाजूला अनडिसेंडेड टेस्टीस आहे त्या बाजूला जांघेत चिरा मारण्यात येतो व खालीं न आलेले अंडाशय शोधून ते इंग्वायनल कॅनॉलमधून स्क्रोटम मध्ये आणण्यात येते व तो मार्ग बंद करण्यात येतो. व ते अंडाशय स्क्रोटम ला फिक्स करण्यात येते जेणेकरून ते अंडाशय स्वतः भोवती फिरणार नाही. वरील ऑपरेशन हे बाळाला भूल देऊनच करण्यात येते.

6 महिने ते 18 महिने वयापर्यंत अंडाशयाचे ऑपरेशन करणे महत्त्वाचे असते कारण अंडाशयाचे मुख्य ठिकाणः स्क्रोटम असते .ज्याचे तापमान शरीराच्या तापमानापेक्षा एक ते दोन डिग्री सेंटीग्रेड कमी असते. कारण ते शुक्राणू तयार होण्यासाठी आवश्यक असते व जर अंडाशय पोटातच राहिले तर ते नष्ट होऊन जाते किंवा भविष्यात त्या अंडाशयात कॅन्सर होण्याचे प्रमाण खूप असते. त्यामुळे हे दुष्परिणाम टाळण्यासाठी ठराविक वयात ऑपरेशन झालेले महत्त्वाचे असते.

लेप्रोस्कोपिक ऑर्किडोपेक्सि

दुर्बिणीद्वारे पोटात असलेले अंडाशय या ऑपरेशनने स्क्रोटम मध्ये आणण्यात येते. या ऑपरेशनमध्ये पोटावर दोन ते तीन ठिकाणी छोटे चिरे मारण्यात येतात व पोटात असलेले अंडाशय कॅमेराच्या साह्याने ओळखून इंग्वायनल कॅनॉलमधून स्क्रोटम मध्ये आणण्यात येते व इंग्वायनल कॅनॉलचा मार्ग टाके लावून बंद करण्यात येतो. व पोटावरील चिरे मारलेले भागसुद्धा टाक्यांनी बंद करण्यात येतात. हे चिरे खूपच छोटे असतात. जवळपास 2 mm ते 3mm एवढे.

जर तुमचे बाळ मोठे झालेले असेल तर सर्जन डॉक्टर तुम्हाला बाळाचे खाली न आलेले अंडाशय काढून टाकण्याचा सल्ला देऊ शकतात कारण त्या अंडाशयाने काम करणे बंद केलेले असू शकते.

अनडिसेंडेड टेस्टीसचे कॉम्प्लिकेशन काय असू शकतात?

1) जर अंडाशय इंग्वायनल कॅनॉलमधून स्क्रोटम मध्ये उतरले नसेल तर ते पोटातील जास्त तापमानामुळे निकामी होण्यास सुरुवात होते. ज्यामध्ये शुक्राणू कमी प्रमाणात तयार होणे व तयार झालेले शुक्राणू कमी गुणवत्तेचे असते.

2) जर अंडाशय इंग्वायनल कॅनॉलमधून स्क्रोटम मध्ये उतरले नसेल तर ते जर अंडाशय हे पोटातच राहिली तर त्यामध्ये भविष्यात कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे डॉक्टर ते काढून टाकण्याचा सल्ला देऊ शकतात.

3) जर अंडाशय इंग्वायनल कॅनॉलमधून स्क्रोटम मध्ये उतरले नसेल तर ते अंडाशय स्वतः भोवती फिरुन त्याला पीळ पडू शकतो. त्याला टेस्टिक्युलर टॉर्शन असे म्हणतात. ही एक इमर्जन्सी असते

अशावेळी बाळाला त्वरित ऑपरेशनची गरज पडते कारण पीळ पडल्याने त्या अंडाशयाचा रक्तप्रवाह थांबुन जातो. त्यामुळे सहाजिकच अंडाशय काम करणे बंद करते व बाळाच्या जीवाला धोकासुद्धा वाढतो.

4) जर अंडाशय इंग्वायनल कॅनॉलमध्ये असेल, आणि बाळ खेळता-खेळता त्या भागाला जर इजा झाली तर ते अंडाशय निकामी होऊ शकते.

5) ऑर्किडोपेकक्सि व लेप्रोस्कोपिक ऑर्किडोपेक्सि – हे दोन्ही ऑपरेशन तज्ञ शिशु शल्यचिकित्सकाकडून करणे आवश्यक असते. कारण ऑपरेशन करत असतांना वीर्याच्या नळीला इजा होऊ शकते म्हणूनच ते ऑपरेशन करण्यात पारंगत अशा बालरोग सर्जन कडून ऑपरेशन करावे.

निष्कर्ष

जर तुमच्या बाळाला अनडिसेंडेड टेस्टीस हा आजार असेल तर खालील गोष्टी तुम्हाला माहीत असणे आवश्यक असते.

  1.  सर्व प्रथम आपल्या बाळाला अनडिसेंडेड टेस्टीस हा आजार आहे हे ओळखता आले पाहिजे.
  2. वेळेवर उपचार घेणे हे बाळाच्या भविष्यासाठी चांगले असते. त्यामुळेच समाजात असलेल्या काही अंधश्रद्धेपासून दूर असलेले बरे.
  3. वेळेवर उपचार घेतला तर बाळाला भविष्यात कॅन्सर पासून टाळू शकतो.

बरेचदा विचारण्यात येणारे प्रश्न

अनडिसेंडेड टेस्टीस हा आजार धोकादायक असतो का?

अनडिसेंडेड टेस्टीस मध्ये शुक्राणू कमी प्रमाणात व कमी गुणवत्तेचे तयार होतात त्यामुळे भविष्यात प्रजननासंबंधित समस्या होऊ शकते. कॅन्सर होण्याचे प्रमाण व अंडाशय स्वतःभोवती फिरणे यामुळे सुद्धा समस्या येऊ शकते.तसेच बाळाला त्यामुळे भविष्यात मानसिक ताण सुद्धा येऊ शकतो.

अनडिसेंडेड टेस्टीस बरी होते का?

वयाच्या पहिल्या तीन ते चार महिन्यात 50% बाळांमध्ये बरे होऊ शकते.

माणूस हा एका अंडाशया सोबत जगू शकतो का?

हो, परंतु त्यामुळे भविष्यात प्रजननासाठीची शक्यता 50 टक्क्यांनी कमी होऊ शकते यासाठीच वेळेवर अनडिसेंडेड टेस्टीस चा उपचार करणेआवश्यक असते. त्यामुळे प्रजननासाठीची शक्यता वाढते व भविष्यात त्यासाठी करण्यात येणारा खर्च सुद्धा वाचतो. आपल्याला माहीतच असेल की मुल होण्यासाठी लाखो रुपये खर्च करावा लागतो.

अनडिसेंडेड टेस्टीस चे ऑपरेशन हे मुलाचे वय मोठे झाल्यावर करावे का ?

नाही. हा सुद्धा गैरसमज आहे. वैद्यकीय क्षेत्राच्या प्रगतीमुळे हे ऑपरेशन ६-१२ महिने या वेळेत करता येते आणि जर बाळाचे अंडाशय वाचवायचे असेल व भविष्यातील प्रजननाच्या समस्या टाळायच्या असतील तर वेळेत ऑपरेशन झालेले बरे.

ऑर्किडोपेक्सि ऑपरेशनला किती वेळ लागतो?

ऑर्किडोपेक्सि ऑपरेशन नाजूक जागेचे असल्याने हे ऑपरेशन करण्यास जवळपास एक ते दीड तास लागत असतो.

ऑर्किडोपेक्सि ऑपरेशन झाल्यानंतर बाळ किती दिवसात खेळू शकते ?

ऑर्किडोपेक्सि ऑपरेशन झाल्यानंतर बाळ लगेच खेळू शकते. बाळाला दुखणे कमी राहण्यासाठी डॉक्टरांनी औषध दिलेले असते व आपण बाळाला एका जागी थांबवून ठेवू शकत नाही त्यामुळे बाळ लगेच खेळण्यास सुरवात करू शकते.

ऑर्किडोपेक्सि ऑपरेशन फेल होऊ शकते का?

ऑर्किडोपेक्सि ऑपरेशन फेल होण्याचे प्रमाण जवळपास नसतेच त्यामुळेच तज्ज्ञ शिशूशल्यचिकित्सक कडून ऑपरेशन केलेले कधीही बरे.

ऑर्किडोपेक्सि ऑपरेशन दुर्बिणीने (लॅपरोस्कोपी) करावे का ?

बाळाला असलेल्या आजारानुसार ते दुर्बिणीने ऑपरेशन होईल की नाही हे सांगू शकतात.

अवश्य वाचा :
लहान मुलांमधील हर्निया
लहान मुलांमधील हायड्रोसिल

Rate this post

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

Leave a Comment