3 Best Cital Syrup Uses in Marathi | सीटाल सिरप चे उपयोग

सीटाल सिरप हे लघवीच्या आजारात खूप सामान्यपणे वापरण्यात येणारे औषध आहे. हे औषध युरॉलॉजिस्ट खूप सामान्यपणे प्रेस्क्राइब करत असतात. चला तर मग या लेख मध्ये जाणून घेऊया सीटाल सिरप बद्दलची माहिती ( Cital Syrup uses in marathi)

Table of Contents

सीटाल सिरप म्हणजे काय ? ( Cital Syrup in Marathi)

सीटाल सिरप ( Cital Syrup in Marathi) हे एक प्रकारचे अल्कलायझर सिरप आहे जे जास्त करून लघवीच्या संसर्गामध्ये तसेच गाऊट या आजारात वापरण्यात येत असते. सीटाल सिरप हे इंडोको रेमेडीस द्वारे तयार केले गेलेले औषध आहे.
सीटाल सिरप हे औषध ३० डिग्री पेक्षा कमी तापमानात ठेवावे लागते तसेच ते फ्रिज मध्ये ठेवू नये.

सीटाल सिरप ची क्रिया काय असते ? ( Cital Syrup Action in Marathi)

सीटाल सिरप हे अल्कलायझर सिरप असल्याने ते लघवीला अल्कलाईन करत असते आणि त्यामुळे लघवीतील युरिक ऍसिड सुद्धा लघवीतून बाहेर फेकले जात असते. त्यामुळे रक्तातील युरिक ऍसिड चे प्रमाण तसेच लघवीतील युरिक ऍसिड चे प्रमाण कमी होते व गाऊट चा त्रास आणि लघवीतील संसर्ग सुद्धा कमी होतो.

सीटाल सिरप कसे घ्यावे ?

सीटाल सिरप ( Cital Syrup in Marathi) मध्ये डायसोडियम हायड्रोजन सायट्रेट असते ज्याची चव अल्कलाईन असते. त्यामुळे सीटाल सिरप थेट न घेता ते डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे १ कप पाण्यासोबत घ्यावे. पाण्यासोबत घेतल्याने लहान मुले ते सहजपणे घेतात व पोटात ऍसिडिटी सुद्धा होत नाही. सीटाल सिरप हे जेवणासोबत किंवा जेवणाशिवाय सुद्धा घेता येत असते. सीटाल सिरप हे दर ८ तासांनी दिवसातून ३ वेळेस घेण्यात येऊ शकते.

जर तुम्ही सीटाल सिरप चा डोस घेण्याचे विसरले असाल तर तुम्ही तो लगेच घेऊ शकतात परंतु दुसऱ्या डोस चा वेळ झालेला असेल तर दुसराच डोस घ्यावा. सीटाल सिरप बॉटल या १०० मिली व २०० मिली मध्ये उपलब्ध आहेत.

सीटाल सिरप घेण्याने काय दुष्परिणाम होतात ? (Side effects of Cital Syrup in Marathi)

सीटाल सिरप घेतल्याने जास्त दुष्परिणाम होत नाहीत. परंतु काही पेशंट मध्ये पोटात जळजळ होणे दिसून येत असते. मळमळ, उलटी तसेच वारंवार लघवी होणे असे दुष्परिणाम दिसून येऊ शकतात. सीटाल सिरप घेतल्यानंतर तुम्हाला काही ऍलर्जी दिसून आली तर लगेच आपल्या डॉक्टर शी संपर्क करणे फार महत्वाचे असते.

सीटाल सिरप घेतांना कोणती काळजी घ्यावी ?

 • हैपेरकलेमिया – हैपेरकलेमिया म्हणजे रक्तातील पोटॅशियम चे प्रमाण वाढणे. पोटॅशियम हे हृदय तसेच नसांच्या कार्यासाठी फार महत्वाचे असते. सीटाल सिरप हे रक्तातील पोटॅशियम चे प्रमाण वाढवते त्यामुळे ज्या रुग्णांना हैपेरकलेमिया चा त्रास आहे त्या रुग्णांनी सीटाल सिरप घेणे टाळावे.
 • गर्भ अवस्थेत – जर तुम्ही प्रेग्नन्ट असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सीटाल सिरप चा वापर करावा
 • स्तनपान करतांना – सीटाल सिरप चा इतका काही दुष्परिणाम स्तनपानावर होत नाही परंतु डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सीटाल सिरप वापरावे.
 • मद्य सेवन – सीटाल सिरप घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला कधीही बरा.
 • ड्रायविंग – सीटाल सिरप मुळे झोप लागत नसते त्यामुळे तुम्हाला ड्रायविंग कराची असेल तर करू शकतात परंतु तुम्हाला काही दुष्परिणाम दिसून आला तर ड्रायविंग करणे टाळावे.
 • किडनी चा आजार – जर तुम्हाला किडनी चा आजार असेल तर सीटाल सिरप चा डोस तुम्हाला किडनी च्या आजारानुसार ऍडजेस्ट करावा लागत असतो. त्यामुळे नेहमी डॉक्टरांशी संपर्क करूनच औषध वापरावे.
 • लिव्हर चा आजार – जर तुम्हाला लिव्हर चा आजार असेल तर डॉक्टरांशी संपर्क करूनच औषधाचा वापर करावा

सीटाल सिरप चे उपयोग काय आहेत ? (Cital Syrup Uses in Marathi)

सीटाल सिरप हे जास्तकरून किडनी संबंधी आजारासाठी वापरण्यात येत असते. किडनी स्टोन तसेच लघवीचा संसर्ग व गाऊट मध्ये सीटाल सिरप चा वापर होत असतो.

सीटाल सिरप हे लघवीतील बॅक्टरीया फ्लश करून टाकते तसेच लघवीला अल्कलाईन करते त्यामुळे रुग्णाला लघवी करतांना त्रास होत नाही व जळजळ कमी होते.

सीटाल यु टी आय सिरप ( Cital UTI Syrup in Marathi)

सीटाल यु टी आय सिरप हे युरीन इन्फेक्शन मध्ये वापरण्यात येणारे औषध आहे. या औषधामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम सायट्रेट, क्रॅनबेरी एक्सट्रॅक्ट, डी मनॉस हे कन्टेन्ट असते. औषधातील कन्टेन्ट हे हृदय, किडनी, नस यांच्या नॉर्मल कार्यासाठी फायद्याचे असते.

cital uti syrup uses in marathi

क्रॅनबेरी एक्सट्रॅक्ट हे लघवीचा संसर्ग कमी करण्यास मदत करत असते तसेच पोटॅशियम मॅग्नेशियम सायट्रेट हे लघवीला अल्कलाईन करते त्यामुळे लघवी करतांना जळजळ कमी होते. सीटाल यु टी आय सिरप ( Cital UTI Syrup uses in Marathi) हे शुगर फ्री असल्याने डायबेटिक पेशंट सुद्धा याचा वापर करू शकतात.

लघवीचा संसर्ग म्हणजे काय ? ( Urine Infection in Marathi)

लघवीचा संसर्ग म्हणजे युरेथ्रा, लघवीची थैली, लघवीची नळी, किडनी मध्ये झालेला संसर्ग असतो. जर लघवीचा संसर्ग कमी प्रमाणात असला तर युरेथ्रा व लघवीची थैली मध्ये संसर्ग पसरलेला असतो. जर लघवीचा संसर्ग जास्त प्रमाणात असेल तर किडनी पर्यंत संसर्ग गेलेला असू शकतो.

लघवीचा संसर्ग झालेला असेल तर वारंवार लघवी होणे, लघवी करतांना जळजळ होणे, कोला कलर ची लघवी होणे, ओटीपोटात दुखून येणे अशी लक्षणे दिसून येत असतात.

कोणत्या भागामध्ये संसर्ग झालेला आहे त्याप्रमाणे लक्षणे दिसून येतात

 • जर युरेथ्रा मध्ये संसर्ग असेल तर लघवी करतांना जळजळ होत असते.
 • जर लघवीच्या थैलीत संसर्ग झालेला असेल तर ओटीपोटात दुखून येणे, वारंवार लघवी लागणे, लघवीत रक्त जाणे अशी लक्षणे दिसून येतात.
 • जर किडनी मध्ये संसर्ग झालेला असेल तर खूप जास्त प्रमाणात ताप येणे, थंडी वाजून येणे, कमरेत दुखून येणे, उलटी, मळमळ होणे अशी लक्षणे दिसून येतात.

जास्त करून लघवीचा संसर्ग हा ई कोलाय ( E coli) या बॅक्टरीया मुळे होत असतो.

लघवीचा संसर्ग हा जास्त करून मुलींमध्ये दिसून येत असतो ज्याचे कारण त्यांचा युरेथ्रा लहान असतो. युरेथ्रा लहान असल्याने योनीतील तसेच गुदद्वारातील बॅक्टरीया सहजपणे युरेथ्रा मध्ये शिरतात व तेथे संसर्ग तयार करत असतात.

वारंवार किडनी स्टोन होणे, वारंवार कॅथेटर चा वापर होणे, प्रतिकारशक्ती कमी असणे यामुळे सुद्धा लघवीचा संसर्ग होत असतो.

गाऊट म्हणजे काय ? (Gout in Marathi)

गाऊट हा ऱ्हुमॅटिक आजार आहे ज्यामध्ये जॉईंट मध्ये युरिक ऍसिड चे खडे तयार होत असतात ज्यामुळे जॉईंट दुखून येणे, लाल पडणे, सूज येणे अशी लक्षणे दिसून येतात. जास्त करून पायातील अंगठा हा आजार दिसून येत असतो.

विशेष टिप्स

 • दरवेळेस औषध घेण्याआधी औषधाची बॉटल हलवून घेणे
 • भरपूर प्रमाणात पाणी पिणे
 • ज्या पदार्थात ऑक्झयलेट जास्त प्रमाणात आहे जसे बीट, पालक, चॉकलेट, चहा असे पदार्थ घेणे टाळावे कारण ते पदार्थ रक्तातील युरिक ऍसिड चे प्रमाण वाढवतात.
 • नेहमी बॉटल वरची एक्सपायरी तारिक चेक करून घ्यावी.
 • किती दिवस उपचार घ्यावा यासाठी आपल्या डॉक्टर शी संपर्क करावा.

बऱ्याचदा विचारण्यात येणारे प्रश्न

डायबेटिक पेशंट सीटाल सिरप घेऊ शकतो का ?

सीटाल सिरप हे शुगर फ्री असल्याने डायबेटिक पेशंट सीटाल सिरप घेऊ शकतो. परंतु नेहमी आपली डॉक्टर शी कंसल्ट करूनच औषधाचा वापर करावा कारण प्रत्येक पेशंट ची हिस्टरी वेगवेगळी असते.

सीटाल सिरप च्या दोन डोस मधील अंतर किती असावे ?

सीटाल सिरप च्या दोन डोस मधील अंतर ८ तास तरी असावे. दिवसातून ३ वेळेस तुम्ही सीटाल सिरप घेऊ शकतात.

दूध घेतल्यानंतर लगेच सीटाल सिरप घेतले तर चालते का ?

दूध हे अल्कलाईन असल्याने दूध घेतल्यानंतर १५ ते २० मिनिटांनी सीटाल सिरप घ्यावे

सीटाल सिरप सोबत दुसरे औषध घेतले तर चालते का ?

सीटाल सिरप चे जास्त करून दुसऱ्या औषधांसोबत इंटरॅक्शन नसते त्यामुळे सीटाल सिरप तुम्ही दुसऱ्या औषधांसोबत घेऊ शकतात. दोन औषधामध्ये १० ते १५ मिनिट अंतर ठेवावे.

सीटाल सिरप हे लघवीतील यीस्ट संसर्ग साठी वापरण्यात येऊ शकते का ?

सीटाल सिरप चा वापर हा संसर्ग ट्रीट करण्यासाठी होत नसतो परंतु सीटाल सिरप हे लघवीतील बॅक्टरीया फ्लश करत असते त्यामुळे ते काही प्रमाणात लघवीतील संसर्ग कमी करण्यास मदत करते.

4.7/5 - (3 votes)

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

Leave a Comment