लहान मुलांमध्ये हर्निया असेल तर काय करावे | Hernia in Children in Marathi

लहान मुलांमध्ये हर्निया खूप सामान्य गोष्ट असते. जन्मतः असणारा इंग्वायनल हर्निया (Inginal hernia in children in marathi) त्यातल्या त्यात खूप सामान्यपणे दिसून येतो. चला तर मग समजून घेऊया लहान मुलांमध्ये होणाऱ्या हर्नियाबद्दल माहिती.

Table of Contents

हर्निया म्हणजे काय असतो ? (What is hernia in children in marathi?)

जेव्हा पोटातील स्नायूंमुळे कमकुवतपणा असतो तेव्हा पोटातील आतडे या भागातून बाहेर येतात यालाच हर्निया असे म्हणतात हा हर्निया त्वचेखाली सूज आल्यासारखा दिसतो.

हर्नियाचे प्रकार कोणते असतात ? (What are types of hernia in children marathi?)

हर्नियाचे बरेच प्रकार असतात व त्यांचे उपचार पण वेगवेगळे असतात. लहान मुलांमध्ये इंग्वायनल हर्निया (जांघेतील हर्निया) व बेंबीचा  हर्निया खूप सामान्य असतो. 

इंग्वायनल हर्निया (Inguinal Hernia in children in marathi)

इंग्वायनल हर्निया हा जांघेत होणारा हर्निया असतो. मुलांमध्ये हा हर्निया मुलींपेक्षा आठ पटीने जास्त असतो.

मुलांमधील अंडाशय हे आईच्या गर्भात असतांना पोटात असते व ते जन्माच्या आधी इंग्वानाल कॅनल मधून खाली स्क्रोटंम (लिंगाच्या खालील थैली) मध्ये येते व तो मार्ग सामान्यतः बंद होऊन जातो पण काही मुलांमध्ये हा मार्ग बंद होत नाही.

त्यामुळे जेव्हा पोटातील दाब जेव्हा वाढतो तेव्हा पोटातील आतडे त्या मार्गाने  स्क्रोटंम मध्ये शिरतात. त्यामुळे तो भाग सुजलेला दिसतो त्याला इंग्वायनल हर्निया (Inguinal hernia in marathi) म्हणतात. मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांमध्ये हर्निया हा स्नायूंच्या कमकुवतपणामुळे नसतो तर तो इंग्वायनल कॅनल बंद झाल्यामुळे असतो.

बेंबीचा हर्निया (Umblical Hernia in children in marathi)

जेव्हा बाळाच्या पोटातील आतडे बेंबीखालील पोटाच्या स्नायूंमधून बाहेर येतात तेव्हा त्याला बेंबीचा हर्निया असे म्हणतात  ह्या प्रकारचा हर्निया साधारण नवजात बालकांमध्ये दिसून येतो. बऱ्याचदा हा हर्निया काहीही न करता बरा होतो जर वयाच्या तीन वर्षानंतर देखील बेंबीचा हर्निया कमी होत नसेल तर अशा वेळी ऑपरेशनची गरज भासू शकते . 

इपिगॅस्ट्रिक हर्निया (Epigastric Hernia in children in marathi)

जेव्हा पोटातील आतडे बेंबीवरच्या व छातीखालील स्नायूंमधून बाहेर येतात. तेव्हा त्याला इपिगॅस्ट्रिक हर्निया असे म्हणतात. सामन्यात: हा हर्निया लहान असतो. याला ऑपरेशनची गरज पडत नाही. परंतु जर हर्निया मोठा असेल व बाळाला लक्षणे असतील तर मात्र ऑपरेशनची गरज भासू शकते. 

हर्नियाची लक्षणे काय असतात ? (What are symptoms of hernia in children in marathi ?)

जर तुमच्या मुलाला हर्निया असेल तर तो जांघेमध्ये सूज आल्यासारखा दिसतो. बऱ्याचदा बाळ रडत असेल व जोर लावत असेल तेव्हा अशी सूज दिसून येते. जांघेतील सूज ही न दुखणारी असते पण जेव्हा बाळ रडणे थांबवते तेव्हा सूज कमी होते.

इंग्वानाल हर्निया हा जास्त करून उजव्या बाजूला दिसून येतो पण डाव्या बाजूला देखील असू शकतो किंवा दोन्ही बाजूंना सुद्धा एकाचवेळी असू शकतो.

जेव्हा पोटातील आतडे मुक्तपणे पोटातील स्नायुमधून आत बाहेर करू शकत असतील त्याला रिड्युसिबल हर्निया (Reducible Hernia in marathi) असे म्हणतात.

हर्नियाचे रिस्क फॅक्टर (Hernia Risk Factors)

जेव्हा घरातील कोणाला लहानपणी हर्निया झालेला असेल तर इंग्वायनल हर्निया होण्याचे प्रमाण अधिक असते जर बाळ कमी दिवसाचे जन्माला आले असेल तर इंग्वायनल हर्निया होऊ शकतो.

हर्निया होण्याची कारणे (Causes of Hernia)

बऱ्याचदा हर्निया हा मांसपेशींमध्ये  कमकुवतपणा आल्यामुळे होतो परंतु हर्निया होण्याची इतर मुख्य कारणे म्हणजे लहान मुलांमध्ये हर्निया हा गर्भात असतांना पोटातील स्नायूंची वाढ योग्य रित्या न झाल्याने होतो. म्हणून  लहान मुलांमधील हर्निया हा जन्मतः:असतो.

हर्नियाचे निदान कसे केले जाते ? (How Hernia is diagnosed in marathi?)

हर्नियाचे निदान शारीरिक तपासणीने केले जाते. तरी बऱ्याचदा सोनोग्राफी सुद्धा करण्यात येते. जेणेकरून हर्निया एका बाजूला आहे की दोन्ही बाजूंना आहे व हर्निया सोबत दुसरा आजार तर नाही ना हे समजून येते. 

हर्निया मध्ये काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात ? (What are complications of hernia in children in marathi ?)

जेव्हा हर्नियामध्ये आतडे कमकुवत स्नायूंमधून बाहेर येतात आणि जर हा आतड्याचा भाग त्या स्नायूंच्या वर येऊन फसला तर त्या भागाचा रक्त पुरवठा बंद पडू शकतो आणि असा हर्निया रिड्यूस करता येत नाही अश्या फसलेल्या हर्नियाला स्टेगुलेटेड हर्निया (strangulated hernia in marathi) असे म्हणतात.

हर्निया फसला आहे हे कसे ओळखावे ? (How to know hernia got strangulated ?)

जेव्हा सूज आलेल्या भागाजवळ खालील लक्षणे दिसून येतात तेव्हा हर्निया फसला आहे असे समजावे. 

  १) सूज आलेला भाग लाल झालेला असेल  किंवा काळा निळा पडत असेल. 

  २) बाळाला मळमळ किंवा उलटी होत असेल. 

  ३) पोटात दुखून येत असेल. 

  ४) ताप येत असेल. 

  ५) सूज आलेल्या भागावर हात ठेवल्यास दुखून येत असेल. 

  ६) सूज आलेल्या भागाचा आकार बदलत नसेल. 

         वरील कोणतेही लक्षण दिसले तरी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करणे महत्वाचे असते. अश्यावेळी त्वरित ऑपरेशनची गरज असते.

हर्नियावर उपचार काय असतो ? (What is treatment of hernia in children in marathi?)

हर्नियाचा उपचार केवळ ऑपरेशनचा आहे. हर्नियाचे ऑपरेशन हे पारंपरिक पद्धतीने व लॅप्रोस्कोपीने केले जाते.

पारंपरिक पद्धतीने जांघेवर चिरा लावून हर्निया होणारा मार्ग टाक्यांनी बंद केला जातो.

लॅप्रोस्कोपीमध्ये (Laparoscopy hernia repair in children) पोटावर छोट्या चिऱ्यातून दुर्बीण टाकून हर्निया होणारा मार्ग टाक्यांनी बंद केला जातो.

लहान मुलांमध्ये  मेषची गरज पडत नाही. हर्नियाचे ऑपरेशन बाळाला बेशुद्ध करूनच केले जाते त्यासाठी जनरल किंवा स्पायनल या अनेस्थेशियाचा वापर होतो. ही माहिती भूलरोगतज्ज्ञ ऑपरेशनच्या वेळेला देतात. 

हर्नियाचे ऑपरेशन डे-केअर ऑपरेशन असते. त्यामध्ये बाळाला दुसऱ्या दिवशी सुट्टी होते. जर हर्निया फसलेला असेल तर हॉस्पिटलमधील स्टे वाढू शकतो.

हर्निया ऑपरेशनचे कॉम्प्लिकेशन काय असतात ? (What are complications of hernia surgery in marathi?)

हर्निया ऑपरेशनचे कॉप्लिकेशन हे फार दुर्मिळ असतात. त्यात गोटीला (टेस्टीस) इजा होणे. वीर्याच्या नळीला इजा होणे. हर्नियाचे ऑपरेशन हे अत्यंत नाजूक जागेचे ऑपरेशन असते. वरील कॉप्लिकेशन टाळण्यासाठी तज्ज्ञ पेडिऍट्रिक सर्जन कडून ऑपरेशन करणे महत्वाचे असते. 

बरेचदा विचारण्यात येणारे प्रश्न

हर्निया हा किती लहान मुलांमध्ये होऊ शकतो ?

 हर्निया हा जन्मतः बाळाला होऊ शकतो त्याला इन्फंटाइल हर्निया (Infantile hernia in marathi)असे म्हणतात.   

हर्नियाचे निदान झाल्यावर ऑपरेशन केव्हा करायला पाहिजे ?     

हर्नियाचे ऑपरेशन हे इमर्जन्सी सर्जरी नसते. परंतु बऱ्याचदा हर्नियामध्ये आतडे फसल्यानंतर ती इमर्जन्सी होते.अशा वेळी लगेच ऑपरेशन करावे लागते व धोका सुद्धा वाढतो म्हणून ऑपरेशन काही कॉम्प्लिकेशन व्हायच्या आत केलेले बरे. 

बिना ऑपरेशन हर्नियाचा उपचार होऊ शकतो काय ?

नाही. हर्निया होण्याचा मार्ग बंद करणे हे ऑपरेशन करूनच शक्य असते.त्यासाठी दुसरा पर्याय नसतो.बऱ्याचदा पेशंट बिना ऑपरेशनने उपचार करतात व शेवटी कॉम्प्लिकेशन होते व ऑपरेशन करावे लागते. 

हर्निया ऑपरेशन नंतर बाळ केव्हा खेळू शकते ?

लहान मुले भूल उतरल्यावर लगेच खेळायला लागू शकतात. त्यांना दुखणे कमी होण्यासाठी औषध दिलेले असते.

हर्निया ऑपरेशनची रिस्क किती असते ?

हर्निया ऑपरेशनची रिस्क खूपच कमी असते. ऑपरेशनमध्ये भूलची रिस्क थोड्या प्रमाणात असू शकते ऑपरेशन बद्दल सर्व माहिती डॉक्टर ऑपरेशन होण्याआधी देतात तेव्हा आपल्या काही शंका असतील त्यांचे निरसन करून घेणे महत्वाचे असते.

हर्नियाचे ऑपरेशन वय मोठे झाल्यावर केले पाहिजे का ?

नाही. हर्नियाचे ऑपरेशन हे निदान झाल्यावर लवकरात लवकर केलेले बरे, कारण जर हर्नियामध्ये आतडे फसले तर ती इमर्जन्सी होते अश्या वेळी लगेच ऑपरेशन करावे लागते कारण बाळाच्या जीवाचा धोका सुद्धा वाढतो ऑपरेशनचा खर्च वाढतो. 

हर्नियाचे ऑपरेशन केल्यावर पुन्हा ऑपरेशन होऊ शकते का? 

हर्नियाचे ऑपरेशन केल्यावर परत ऑपरेशन होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे . 

हर्निया हा फक्त मुलांमध्येच होऊ शकतो काय ?

इंग्वायनल हर्निया (Inguinal hernia in children in marathi) हा मुलींपेशा मुलांमध्ये आठ पटीने जास्त प्रमाणात होतो.

3/5 - (2 votes)

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

1 thought on “लहान मुलांमध्ये हर्निया असेल तर काय करावे | Hernia in Children in Marathi”

Leave a Comment