मुलांमध्ये हॅन्ड, फूट आणि माऊथ आजार | Hand Foot and Mouth Disease in Marathi

हॅन्ड फूट आणि माऊथ डिसीज (Hand Foot and Mouth Disease in marathi) या आजाराच्या नावावरून तुम्हाला समजून आले असेल की, या आजारात हात-पाय-तोंड या शरीराच्या भागांचा समावेश झालेला असेल. तुम्ही बरोबर ओळखले हा एक प्रकारचा व्हायरल आजार असून त्यात हात, पाय, व तोंडावर लक्षणे दिसून येत असतात.

चला तर मग जाणून घेऊया या आजारा बद्दल आवश्यक ती माहिती( hfm disease meaning in marathi). हाथ पाय तोंड आजार एक प्रकारचा विषाणूजन्य आजार आहे. ज्यामध्ये ताप येणे, प्रामुख्याने अंगावर ,हात पाय या भागावर, लाल रंगाचे पुरळ येणे. तसेच तोंडामध्ये छाले येत असतात तसेच जांघेत ,पोटावर सुद्धा काही वेळेस पुरळ दिसून येत असतात.

हॅन्ड फूट आणि माऊथ डिसीज (hfmd in kids) सामान्यतः पाच वर्षाखालील मुलांना होत असतो. तसेच मोठ्या माणसांमध्ये हा आजार होत असतो. हा आजार कॉक्सझांकी या व्हायरसमुळे पसरत असतो.

Hand foot mouth disease in english

Hand foot mouth disease in hindi

Table of Contents

हॅन्ड फूट आणि माऊथ डिसीज हा आजार कसा पसरतो ?

हॅन्ड फूट आणि माऊथ डिसीज (Hand Foot and Mouth Disease in marathi) हा आजार संसर्ग ,स्पर्शाने पसरणारा असतो. त्यामुळे या आजाराचा रुग्ण घरात असल्यास प्रत्येकाने हात साबणाने स्वच्छ धुणे फार महत्त्वाचे असते. हा आजार खालील कारणांनी पसरत असतो.

 1)  रुग्णाच्या शिंकण्याने किंवा खोकल्यामुळे त्याचे थुंकीद्रव्यातील (लाळ) विषाणू हवेत पसरत असतात व ते कोणत्याही वस्तूवर पडतात. त्या वस्तूला निरोगी व्यक्‍तीने हात लावल्यास निरोगी व्यक्‍तीच्या शरीरात पसरू शकतात.

2)  हवेतील थुंकीद्रव्याच्या संपर्कात आल्याने ते निरोगी व्यक्‍तीच्या नाकातोंडातून विषाणू शरीरात पसरू शकतात.     

 3)  रुग्णाच्या मलाशी अप्रत्यक्ष संपर्क आल्याने सुद्धा संसर्ग होऊ शकतो. रुग्णाच्या पुरळ असलेल्या भागातून निघत असलेल्या द्रव्याच्या संपर्कात आल्याने सुद्धा संसर्ग होऊ शकतो. प्रामुख्याने हा आजार उन्हाळ्यात व  पावसाळ्याच्या सुरुवातीला दिसून येतो. 

हॅन्ड फूट आणि माऊथ डिसीज चे लक्षणे काय असतात?

हॅन्ड फूट आणि माऊथ डिसीज या आजारात सुरुवातीला ताप येणे, डोकेदुखी होणे, सर्दी येणे अशी लक्षणे (hfmd symptoms in marathi) दिसून येत असतात. या लक्षणानंतर एक ते दोन दिवसांनी पुरळ येण्यास सुरुवात होते. या पुरळ पासून लाल रंगाचे फोड येत असतात. प्रामुख्याने अशी पुरळ हातापायावर येत असते.

तोंडामध्ये सुद्धा अशा प्रकारचे फोड येत असतात व त्या ठिकाणी छाले येत असतात. प्रामुख्याने हिरडया, जीभ  व गालाच्या आतील बाजूस तसेच टाळूवर अशा प्रकारचे अनेक छाले येत असतात. त्यामुळे बाळाला अन्न गिळण्यास त्रास होत असतो. त्यामुळे बाळ जेवण करत नाही.

बाळ जास्त प्रमाणात चिडचिड करत असते. बाळ जास्त प्रमाणात लाळ गाळत असते. काहीच खात नसल्याने सुस्त पडून राहते.

हॅन्ड फूट आणि माऊथ डिसीजचे निदान तसे करण्यात येते?

हॅन्ड ,फूट आणि माऊथ डिसीजचे (hand foot mouth disease in marathi) निदान बाळाच्या शारीरिक तपासणी वरून करतात. डॉक्टर तुमच्या मुलाला असलेल्या लक्षणांवरून या आजाराचे निदान करतात. निदान निश्‍चित करण्यासाठी घश्यातील स्वॅब टेस्ट करण्यात येते. परंतु ही तपासणी क्वचितच करण्यात येते.

हॅन्ड फूट आणि माऊथ डिसीजचा उपचार कसा करण्यात येतो.?

हाथ पाय तोंड आजार हा आजार (hand foot mouth disease in marathi) सात ते आठ दिवसात आपण होऊन निसर्गतः बरा होत असतो. डॉक्टर तुमच्या मुलाला त्याला असलेल्या लक्षणांनुसार उपचार सांगू शकतात.

  • बाळाचा ताप व डोकेदुखी कमी होण्यासाठी पॅरासिटॅमॉल किंवा आयबुप्रोफेन नावाचे औषध देतात.
  • अंगावर पुरळ कमी होण्यासाठी काही लोशन देऊ शकतात.
  • सर्दी ,खोकला कमी होण्यासाठी औषधी देण्यात येत असतात.
  • तोंडात आलेल्या छाल्यांसाठी त्या जागेवर लावण्यासाठी जेल देऊ शकतात.

खालील प्रकारचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात.

  • बाळाला भरपूर प्रमाणात पाणी पाजावे.
  • बाळाला थंड पेय किंवा आईस्क्रीम सुद्धा देऊ शकतात. परंतु बाळाला सर्दी खोकला असल्यास हेही टाळावे.
  • बाळाला गरम पदार्थ देऊ नयेत. तसेच तिखट व खारट पदार्थ देणे सुद्धा टाळावे. 
  • पालकांनी आपल्या बाळाची काळजी घेतल्यावर म्हणजे बाळाचे नाक साफ केल्यावर बाळाला हात लावल्यानंतर बाळाचे डायपर बदलल्यानंतर आपले हात साबणाने स्वच्छ धुवावे. जेणेकरून हा संसर्ग घरातील इतर व्यक्तींमध्ये पसरणार नाही.
  • बाळाचे कपडे तसेच भांडीही वेगळे ठेवणे आवश्यक असते. बाळाची खेळणी तसेच वारंवार संपर्कात येणारा घरातील भाग स्वच्छ ठेवणे फार महत्वाचे असते.
  • मुलाला शाळेत पाठवू नये जोपर्यंत त्याची पुरळ पूर्णपणे कोरडी पडत नाही.

बाळाला कोणत्या प्रकारची लक्षणे दिसून आली तर हॉस्पिटलमध्ये अँडमिट करावे लागू शकते.

  • बाळ काहीच खात नसल्याने, किंवा पाणी सुद्धा पीत नसल्याने, बाळाच्या शरीरातील पाणी कमी होण्यास सुरुवात होते व बाळ सुस्त पडत असते.
  • बाळाला ताप हा तीन दिवसांपेक्षा अधिक असेल व बाळ तोंडाने काहीच खात नसेल तर
  • बाळाला आजाराचे इतर कॉम्प्लिकेशन झालेले असेल तर
  • बाळ खूप प्रमाणात रडत असेल व काहीच खात नसेल तर

हॅन्ड फूट आणि माऊथ या आजाराचे काय कॉम्प्लिकेशन असतात ?

या आजाराचे कॉम्प्लिकेशन हे डिहायड्रेशन ,विषाणूचा मेंदुज्वर, एन्केफलायटिस असतात.

हा आजार स्वतःहून कमी होणारा असल्याने सात ते दहा दिवसांत रुग्ण बरा होतो. त्यासाठी नीट घरगुती काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. जर नीट काळजी घेतली व डॉक्टरांचा सल्ला घेतला तर हॉस्पिटल मध्ये अँडमिट करण्याची वेळ येत  नाही.

हॅन्ड फूट माऊथ आजाराचा घरगुती उपचार

लहान मुलांची काहीच खाण्याची इच्छा नसल्याने त्यांना द्रव्य पदार्थ देणे फार महत्वाचे असते. नारळ पाणी, हिरव्या भाज्यांचे सूप, दही भात, वरण भात असे सॉफ्ट अन्न देणे गरजेचे असते.

बरेचदा विचारण्यात येणारे प्रश्न

हॅन्ड फूट आणि माऊथ डिसीज हा आजार दोन वेळा होऊ शकतो का ?

हो, हा आजार दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस होऊ शकतो. हा आजार वेगवेगळ्या विषाणूमुळे होत असतो. त्यामुळे दर वेळेस वेग वेगळ्या विषाणूमुळे हा आजार होत असतो.

हॅन्ड फूट आणि माऊथ डिसीज या आजारात मेंदूज्वर होऊ शकतो का ?

हॅन्ड ,फूट आणि माऊथ आजार विषाणुजन्य असल्याने पण खूपच क्वचित मेंदूज्वर होऊ शकतो.

हॅन्ड फूट आणि माऊथ डिसीज हा आजार हा आजार बाळाला झालेला असेल तर  पालकांना होऊ शकतो का?

हा आजार संसर्गजन्य असल्याने विशेष काळजी घेतली नाही तर, पालकांमध्ये      बाळाकडून पसरू शकतो. तसेच पालकांकडून सुद्धा  मुलांना होऊ शकतो.

हॅन्ड फूट आणि माऊथ डिसीज आजाराचा विषाणू किती दिवस पृष्ठभागावर राहू शकतो ?

हॅन्ड ,फूट आणि माऊथ आजाराचा विषाणू बरेच दिवस पृष्ठभागावर राहत असतो. त्यामुळे स्वच्छता ठेवल्यास या आजाराचा प्रसार कमी करण्यात येतो. 

हॅन्ड फूट आणि माऊथ डिसीज वर लस उपलब्ध आहे का?

हॅन्ड फूट आणि माऊथ डिसीज वर लस उपलब्ध नाही.

हॅन्ड फूट माऊथ आजार किती दिवस शरीरात राहू शकतो ?

हॅन्ड फूट माऊथ आजार शरीरात ७ ते १० दिवस राहत असतो.

हॅन्ड फूट माऊथ आजार रुग्णाच्या आई वडिलांना होऊ शकतो का?

हॅन्ड फूट माऊथ आजार हा संसर्गजन्य आजार असल्याने तो घरातील इतर व्यक्तींना होऊ शकतो. त्यामुळे वारंवार हाथ धुणे, स्वच्छता ठेवणे महत्वाचे असते..

हॅन्ड फूट माऊथ आजारामध्ये आंघोळ केली तर चालते का ?

हॅन्ड फूट माऊथ आजारामध्ये आंघोळ केली तर चालते परंतु शरीरावरील फोडी फुटू नये याची काळजी घेणे आवश्यक असते.

हॅन्ड फूट माऊथ आजारात कोणते व्हिटॅमिन घेतले पाहिजे ?

हॅन्ड फूट माऊथ आजार हा वारंवार होऊ शकतो. एकदा आजार झाल्याने त्या आजाराची इम्युनिटी पूर्णपणे येत नसते, त्यासाठी झिंक, व्हिटॅमिन क असलेले पदार्थ खाणे आवश्यक असते.

हॅन्ड फूट माऊथ आजारात तोंडामध्ये पांढरे द्रव्य दिसून येते का ?

हॅन्ड फूट माऊथ आजारात तोंडामध्ये पांढरे द्रव्य दिसून येत असते. त्यासाठी गरम पाण्याच्या गुळण्या किंवा बीटाडीन च्या गुळण्या करणे आवश्यक असते. त्यामुळे ते द्रव्य कमी होण्यास मदत होते.

हॅन्ड, फूट आणि माऊथ डिसीज हा व्हायरल आजार असल्याने तो बरा होण्यास ५-७ दिवस घेऊ शकतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाची व्यवस्थित काळजी घेतली तर हॉस्पिटल मध्ये भरती करण्याची वेळ येत नाही.

वरील लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेयर करा किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर कंमेंट करा.

Rate this post

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

Leave a Comment