पित्ताशयाचा त्रास झाला तर काय करावे | Pittashay Infection

पित्ताशय (pittashay) हे पित्त जमा ठेवण्याचा अवयव असतो. काही वेळेस या पित्ताशयावर काही कारणांमुळे सूज येत असते ज्यामुळे पोटात दुखून येणे, उलट्या होणे, जेवण कमी जाणे असे लक्षणे दिसून येतात. चला तर मग जाणून घेऊया पित्ताशय व त्याला होणाऱ्या संसर्गाबाबत आवश्यक ती माहिती.

Table of Contents

पित्ताशय म्हणजे काय? (What is Gall Bladder {pittashay}?)

पित्ताशय (pittashay) हे पेर च्या आकाराचे अवयव असते. पित्ताशय हे पोटाच्या उजव्या बाजूला यकृताखाली असते. पित्ताशय हे पित्त जमा ठेवते जे अन्न पचण्यासाठी आवश्यक असते. पित्ताशयातून पित्त पित्ताशयाच्या नळीतून लहान आतड्यामध्ये येते.

कोलेसिस्टायटिस म्हणजे काय? (What is cholecystitis in marathi?)

कोलेसिस्टायटिस म्हणजे पित्ताशयावर आलेली सूज असते. यात लहान आतडयांमध्ये जाणारे पित्त काही कारणाने थांबते व पित्ताशयात जमा झाल्याने पित्ताशयाला सूज येते व संसर्ग तयार होतो.

कोलेसिस्टायटिस कशामुळे होतो? (What are causes of cholecystitis in marathi?)

बऱ्याचदा पित्ताशयात तयार झालेला खडा (pittashay khade) हा पित्त लहान आतड्यांमध्ये नेणाऱ्या नळीत अडकल्याने कोलेसिस्टायटिस चा त्रास होतो. पित्ताशयात असणाऱ्या कोलेस्टेरॉल मुळे खडे तयार होतात व हे खडे कडक असतात व न विरघळणारे असतात.

पित्त वाहणारी नळी पित्ताशयाच्या खड्यामुळे झालेल्या इजेमुळे निकामी होते व बंद पडते त्यामुळे सुद्धा कोलेसिस्टायटिस चा त्रास होतो  संसर्ग किंवा पोटाला इजा झाल्याने सुद्धा कोलेसिस्टायटिस चा त्रास होऊ शकतो.

कोलेसिस्टायटिस चे प्रकार कोणते असतात? (What are types of cholecystitis in marathi?)

  • अकूट कोलेसिस्टायटिस (Acute cholecystitis in marathi) – जेव्हा पित्ताशयाला कमी वेळातच सूज येत असेल त्याला अकूट कोलेसिस्टायटिस असे म्हणतात.
  • क्रोनिक कोलेसिस्टायटिस (Chronic cholecystitis in marathi) – जेव्हा पित्ताशय हे काही आठवडे व महिन्यात सूज येते त्याला क्रोनिक कोलेसिस्टायटिस असे म्हणतात. अश्या वेळेस पित्ताशया हळूहळू निकामी होण्यास सुरवात होते.

कोलेसिस्टायटिस चे लक्षणे काय असतात? (What are symptoms of cholecyatitis in marathi?)

  • सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे पोटाच्या वरील उजव्या बाजूला दुखून येणे. हे दुखणे कमी जास्त होत असते.हे दुखणे कमरेत उजव्या बाजूच्या खांद्याला सुद्धा पसरते. पोट दुखणे बऱ्याचदा जेवणाच्या ६ तासांनी दिसून येते.
  • ताप येणे मळमळ व उलटी होणे अंगावर व डोळ्यावर पिवळसरपणा येणे.

पित्ताशयाचे खडे होण्याची शक्यता कशामुळे वाढते ?

  • चरबीयुक्त खाण्यामुळे
  • शरीराचे वजन ज्यास्त असल्याने
  • गर्भधारणेत
  • एकदम वजन कमी झाले असेल तर

कोलेसिस्टायटिस चे कॉम्प्लिकेशन काय असतात? (What are complications of cholecystitis in marathi?)

  • पित्ताशयावर सूज आल्याने पित्त हे पित्ताशयात जमा राहते त्यामुळे तिथे संसर्ग होण्यास सुरवात होते.
  • काही वेळेस पित्ताशयाच्या त्रास होत असताना सुद्धा रुग्ण उपचार घेत नाही अश्या वेळेस वेळेस पित्ताशय हे नष्ट होऊ शकते तसेच पित्ताशय फुटण्याची सुद्धा भीती असते.
  • काही रुग्णांमध्ये कावीळ होत असतो.
  • यकृतात किंवा स्वादुपिंडात संसर्ग होऊ शकतो.
  • पित्ताशय हे यकृताला चिपकण्याची भीती सुद्धा असते.

कोलेसिस्टायटिस चे निदान कसे करण्यात येते ? (How cholecystitis is diagnosed?)

डॉक्टर हे रुग्णाला असणाऱ्या लक्षणावरून व तपासणीवरून कोलेसिस्टायटिस चे निदान करतात.

डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर खालील तपासण्या कराव्या लागतात. त्यानंतर कोलेसिस्टायटिस चे निदान निश्चित होते.

  • रक्त तपासणी – रक्तामध्ये संसर्ग झालेला आहे का किंवा पित्ताशयाचे काही मार्कर वाढलेले आहे का हे तपासून घेण्यासाठी रक्ताची तपासणी करणे महत्वाचे असते.
  • सोनोग्राफी  – पित्ताशयाला किती सूज आलेली आहे किंवा पित्ताशयाचे नळीत खडा तर अडकला नाही ना हे समजून घेण्यासाठी सोनोग्राफी केली जाते.
  • सिटी स्कॅन – सिटी स्कॅन मध्ये पित्ताशयाच्या आकार व त्यात झालेले बदल हे स्पष्टपणे दिसून येतात.
  • मॅग्नेटिक रेझोनन्स कोलैंजीवपंक्रीटोग्राफी – ही तपासणी पित्ताशयाच्या नळीत काही बाधा आहे का हे तपासण्यासाठी केली जाते
  • हेपॅटॉबिलिअरी इमिनोडायसिटीक स्कॅन – या स्कॅन मध्ये यकृतातील पित्ताशयाच्या नळ्या तपासण्यासाठी केला जातो.

प्रत्येक रुग्णामध्ये सर्व तपासण्या केल्या जात नाही. परंतु रुग्णावर आवश्यक अश्या तपासण्या केल्या जातात.

कोलेसिस्टायटिस चा उपचार काय आहे? (What is treatment of cholecystitis in marathi?)

जर तुमच्या मुलाला अकूट कोलेसिस्टायटिसचे निदान झाले असेल तर त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागू शकते.

जर तुमच्या मुलाला क्रोनिक कोलेसिस्टायटिसचे निदान झाले असेल व पोटदुखी औषधाने ठीक होण्यासारखी असेल तर बाह्य रुग्ण विभागातच औषधी दिली जातात व काही वेळेस ऑपरेशन चा सल्ला सुद्धा देण्यात येऊ शकतो.

रुग्णाला जर हॉस्पिटल मध्ये भरती करण्याची गरज पडत असेल तर त्याचा उपचार खालीलप्रमाणे केला जातो.

१) रुग्णाला काही काळ तोंडाने खाण्यासाठी काहीच देता येत नाही. यामुळे सूज आलेल्या पित्ताशयाला आराम पडतो

२) रुग्णाला सलाइन लावण्यात येते जेणेकरून रुग्णाला आवश्यक तो आहार सलाइन द्वारे मिळत राहतो व उपाशी असल्याने शरीरातील पाणी सुद्धा कमी होत नाही.

३) पोटदुखी कमी होण्यासाठी इंजेक्शन देण्यात येतात.

४) पोटातील संसर्ग कमी होण्यासाठी एन्टीबायोटिक औषधी देण्यात येऊ शकतात.

जर तुमच्या मुलाला कोलेसिस्टायटिसचे निदान झाले असेल तर डॉक्टर ऑपरेशन करून त्याचे पित्ताशय काढून टाकण्याचा सल्ला देतात. या ऑपरेशन ला कोलेसिस्टेक्टॉमी असे म्हणतात.

पित्ताशय (pittashay in marathi) काढून टाकल्याने कोलेसिस्टायटिस चा त्रास पूर्णपणे कमी होतो. पित्ताशय काढून टाकल्यावर पित्त जमा राहण्यासाठी जागा नसते म्हणून यकृतातून पित्त हे लहान आतड्यामध्ये सोडले जाते.

पित्ताशयाचे ऑपरेशन कसे केले जाते?

पित्ताशयाचे ऑपरेशन हे पारंपरिक पद्धतीने (ओपन) किंवा लॅपरोस्कोपी ने केले जाते.

पारंपरिक पद्धतीमध्ये पोटावर चिरा मारून पित्ताशय हे काढून टाकण्यात येत असते. परंतु लॅपरोस्कोपी पद्धतीमध्ये पोटावर दोन ते चार छोटे चिरे लावून दुर्बीणीच्या साहाय्याने पित्ताशय हे काढून टाकण्यात येते. त्याला लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी असे म्हणतात.

लॅपरोस्कोपी पद्धतीने पित्ताशय काढणे हे ओपन सर्जरीपेक्षा कधीही फायदेशीर असते.

ओपन सर्जरीमध्ये रुग्णाला पूर्ण भूल देण्यात येते, पोटावर मोठा चिरा मारण्यात येतो तसेच हॉस्पिटल मध्ये ५-६ दिवस भरती राहावे लागते ज्यामुळे हॉस्पिटलमध्ये राहण्याचा खर्च जास्त प्रमाणात होतो.

लॅपरोस्कोपी सर्जरी मध्ये रुग्णाला पूर्ण भूल देण्यात येते, पोटावर २-४ छोटे चिरे मारण्यात येतात, हॉस्पिटल मध्ये २ दिवसच भरती राहावे लागते ज्यामुळे हॉस्पिटलचा राहण्याचा खर्च सुद्धा कमी होतो.

जर लॅपरोस्कोपी ऑपरेशन करत असतांना पित्ताशयात खूप गंतागुंत वाटत असेल तर ओपन सर्जरी करावी लागू शकते. पण हे होण्याचे प्रमाण खूपच कमी असते.

ऑपरेशन नंतर झालेली जखम ही कोरडी ठेवावी लागते. डॉक्टरांनी दिलेल्या औषधी वेळेवर घेणे महत्वाचे असते. आराम करणे व जाड वजन न उचलणे व ७-८ दिवसांनी ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना परत दाखवावे.

पित्ताशयाबद्दल (Pittashay) वरील सर्व माहिती समजल्यावर सुद्धा तुम्हाला काही शंका असतील तर कंमेंट करा. पित्ताशया बद्दल लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेयर करा.

बरेचदा विचारण्यात येणारे प्रश्न 

पित्ताशयातील खडे हे विरघळणारे असतात का?

पित्ताशयातील खडे हे विरघळणारे नसतात. ते विरघळण्यासाठी खूप महिने औषधांचा उपचार घ्यावा लागतो. व ते अत्यंत खर्चिक असते.

पित्ताशयाच्या त्रास असेल तर ऑपरेशन करणे हाच उपचार असतो का ?

बऱ्याचदा पित्ताशयाच्या संसर्ग वारंवार होत असतो व हा वारंवार होणार त्रास न होण्यासाठी पित्ताशयाचे ऑपरेशन करणे महत्वाचे असते.

पित्ताशयात खडे असतील व काहीच त्रास नसेल तर काय उपचार असतो?

अश्या वेळी डॉक्टर रुग्णाला औषधी चालू ठेवतात पण जर त्रास चालू झाला तर डॉक्टरांना तपासणीसाठी दाखवणे महत्वाचे असते.

पित्ताशय काढून टाकल्यावर शरीरात काय बदल होतात?

काहीच नाही.पित्ताशय के जीवनावश्यक अवयव नाही त्यामुळे ते काढून टाकल्यावर शरीरावर काही दुष्परिणाम होत नाही. अश्यावेळी यकृतामध्ये तयार होणारे पित्त थेट लहान आतड्यांमध्ये जाते.

पित्ताशयाच्या ऑपरेशनचा काही त्रास होतो का ?

नाही. पित्ताशयाचे ऑपरेशन हे भूल देऊनच करण्यात येते त्यामुळे त्याचा काही त्रास होत नाही. ऑपरेशन नंतर पोटात थोडे दुखून येऊ शकते. परंतु हे दुखणे कमी करण्यासाठी औषधी दिल्या जातात.

पित्ताशयाच्या ऑपरेशनमध्ये काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का ?

क्वचितच पित्ताशयाचे ऑपरेशन केल्यानंतर जर खडा पित्ताच्या मोठ्या नळीत राहिला असेल तर तो काढण्यासाठी एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कोलैंजीओ पॅनक्रियाटोग्राफी ची गरज पडू शकते.

पित्ताशयाच्या ऑपरेशन नंतर काय आहार असावा?

पाणी भरपूर प्रमाणात पिणे.
फायबरयुक्त आहार घेणे
कमी चरबी असलेले पदार्थ खाणे
मैद्याचे पदार्थ खाणे टाळावे

Rate this post

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

Leave a Comment