4 मॅक्सट्रा सिरप चे उपयोग | Maxtra Syrup Uses in Marathi

मॅक्सट्रा सिरप चा वापर ( Maxtra Syrup Uses in Marathi) जास्त करून सर्दीसाठी केला जातो. हे औषध बऱ्याच मेडिकल वर सहजपणे उपलब्ध असते. चला तर मग जाणून घेऊया मॅक्सट्रा सिरप बद्दल माहिती.

Table of Contents

मॅक्सट्रा सिरप म्हणजे काय ?

मॅक्सट्रा सिरप ( Maxtra Syrup in Marathi) हे एक प्रकारचे अँटी कोल्ड सिरप आहे जे जाम झालेली सर्दी, वाहणारी सर्दी, शिंका, डोळ्यातून पाणी येणे अश्या आजारात वापरण्यात येत असते. मॅक्सट्रा सिरप हे Zuventus या कंपनी ने बनवलेले औषध आहे.

कोणत्या प्रकारचे मॅक्सट्रा सिरप हे मार्केट मध्ये उपलब्ध आहे ?

 • मॅक्सट्रा सिरप
 • मॅक्सट्रा पी सिरप
 • मॅक्सट्रा पी डी एस सिरप
 • मॅक्सट्रा ड्रॉप
 • मॅक्सट्रा पी ड्रॉप

मॅक्सट्रा सिरप चे कन्टेन्ट काय असते ?

मॅक्सट्रा सिरप मध्ये Phenylephrine and Chlorpheniramine असते. प्रत्येक ५ मिली औषधात ५ मिलिग्रॅम Phenylephrine व २ मिलिग्रॅम Chlorpheniramine औषध असते.

maxtra syrup in marathi

मॅक्सट्रा पी सिरप चे कन्टेन्ट काय असते ? ( Maxtra P Syrup in Marathi)

मॅक्सट्रा पी सिरप मध्ये Phenylephrine and Chlorpheniramine सोबत Paracetamol असते प्रत्येक ५ मिली औषधात ५ मिलिग्रॅम Phenylephrine व २ मिलिग्रॅम Chlorpheniramine तसेच १२५ मिलिग्रॅम Paracetamol औषध असते.

maxtra p syrup in marathi

मॅक्सट्रा पी डी एस सिरप चे कन्टेन्ट काय असते ? (Maxtra PDS Syrup in Marathi)

मॅक्सट्रा पी डी एस सिरप मध्ये Phenylephrine and Chlorpheniramine सोबत Paracetamol असते प्रत्येक ५ मिली औषधात ५ मिलिग्रॅम Phenylephrine व २ मिलिग्रॅम Chlorpheniramine तसेच १२५ मिलिग्रॅम Paracetamol औषध असते.

maxtra pds syrup in marathi

मॅक्सट्रा ड्रॉप चे कन्टेन्ट काय असते ? ( Maxtra Drops in Marathi)

मॅक्सट्रा ड्रॉप मध्ये Phenylephrine and Chlorpheniramine असते. प्रत्येक १ मिली औषधात ५ मिलिग्रॅम Phenylephrine व २ मिलिग्रॅम Chlorpheniramine औषध असते.

maxtra drop in marathi

मॅक्सट्रा पी ड्रॉप चे कन्टेन्ट काय असते ? ( Maxtra P Drops in Marathi)

मॅक्सट्रा पी ड्रॉप मध्ये Phenylephrine and Chlorpheniramine सोबत Paracetamol असते प्रत्येक १ मिली औषधात ५ मिलिग्रॅम Phenylephrine व २ मिलिग्रॅम Chlorpheniramine तसेच १२५ मिलिग्रॅम Paracetamol औषध असते.

maxtra p drops in marathi

मॅक्सट्रा सिरप चे कार्य काय आहे ? ( Action of Maxtra Syrup in Marathi)

मॅक्सट्रा सिरप चे कार्य खालीलप्रमाणे आहे.

 • Phenylephrine हे एक प्रकारचे औषध आहे जे नाकातील रक्तवाहिन्या आकुंचन करतो त्यामुळे नाकातील सूज कमी होत असते
 • Chlorpheniramine हे एक प्रकारचे अँटी एलर्जिक औषध आहे जे श्वास नलिकेतील एलर्जी कमी करत असते त्यामुळे सर्दी कमी होण्यास मदत होते.
 • Paracetamol हे एक प्रकारचे अँटी पायरेटिक म्हणजे ताप कमी करण्यात वापरण्यात येणारे व अनलजेसिक औषध आहे म्हणजे दुखण्यावर काम करते

मॅक्सट्रा सिरप चे उपयोग काय आहेत ? ( Maxtra Syrup Uses in Marathi)

 • सर्दी : सर्दी होण्याचे जास्त प्रमाण हे व्हायरस मुले असते. अश्या पेशंट मध्ये नाक वाहणे, शिंका येणे, डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणे दिसून येत असतात. मॅक्सट्रा सिरप हे नाकातील सर्दी व शिंका कमी करण्याचे काम करत असते. सोबत जर नेझल सलाईन ड्रॉप चा वापर केला तर रुग्णाला लवकर फरक पडत असतो.
 • सर्दी ताप : सर्दी सोबत जर ताप असेल तर पॅरासिटामोल असलेले मॅक्सट्रा सिरप वापरले तर लवकर फायदा होत असतो.
 • फ्लू : फ्लू हा एक प्रकारचा व्हायरल आजार आहे जो इन्फ्लुएंझा व्हायरस मुळे पसरत असतो. फ्लू आजारात सर्दी खोकल्यासोबत ताप सुद्धा येत असतो अश्या वेळेस मॅक्सट्रा सिरप चा वापर करण्यात येऊ शकतो. जर लहान बाळाला वारंवार सर्दी खोकला होत असेल अश्या वेळेस त्या बाळाला फ्लू ची लस देऊन घेणे फार फायद्याचे असते ज्यामुळे त्याचे सर्दी होण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होते.
 • एलर्जीची सर्दी : एलर्जीच्या सर्दीमधे परागकणांमुळे नाकामध्ये सूज आलेली असते. मॅक्सट्रा सिरप हे नाकातील सूज कमी करण्याचे काम करत असते.

मॅक्सट्रा सिरप चे दुष्परिणाम काय आहेत ? ( Side Effects of Maxtra Syrup in Marathi)

 • मळमळ
 • उलटी
 • झोप लागणे
 • तोंड कोरडे पडणे
 • अंगदुखी
 • रक्तदाब वाढणे

सर्व दुष्परिणाम एकाच पेशंट मध्ये दिसून येत नाही परंतु यातील काही दुष्परिणाम दिसून आले तर डॉक्टर शी संपर्क करावा.

कोणत्या आजारात मॅक्सट्रा सिरप प्रतिबंधित आहे ?

 • मॅक्सट्रा सिरप मधील कन्टेन्ट ची एलर्जी असेल तर
 • क्लोज अँगल ग्लुकोमा ( Close Angle Galucoma)
 • हायपरथायरॉईडीसम ( Hyperthyroidism)
 • फिओक्रोमोसायटोमा ( Pheochromocytoma)
 • प्रोस्ट्रेट (Prostate)

जर तुम्हाला वरील आजार असतील व तुम्ही मॅक्सट्रा सिरप घेतले तर लागलीच डॉक्टरांशी संपर्क करावा.

मॅक्सट्रा सिरप कसे घ्यावे ?

मॅक्सट्रा, मॅक्सट्रा पी मॅक्सट्रा पी डी यस सिरप सोबत मेझरिंग कॅप दिलेली असते ज्यावर २.५ मिली, ५ मिली, ७.५ मिली, १० मिली असे मार्किंग दिलेले असते.

मॅक्सट्रा ड्रॉप व मॅक्सट्रा पी ड्रॉप्स सोबत ड्रॉपर दिलेले असते त्यावर ०.१ मिली ते १ मिली पर्यंत मार्किंग असते.

मॅक्सट्रा सिरप हे डॉक्टरांनी सांगितलेल्या डोस नुसार पाजावे. हे औषध जेवणासोबत किंवा जेवणाशिवाय घेऊ शकतात.

 • वापर करण्याआधी दर वेळेस बॉटल नीट हलवून घ्यावी
 • वेळेवर औषध घेणे फार महत्वाचे असते.
 • लहान मुलांपासून औषध दूर ठेवावे.
 • सिरप ची बॉटल खोलीच्या तापमानात ठेवावी. फ्रिज मध्ये ठेवू नये.
 • डॉक्टर ने सांगितलेल्या डोस नुसार औषध द्यावे.

मॅक्सट्रा सिरप चा डोस काय आहे ? ( Dose of Maxtra Syrup in Marathi)

मॅक्सट्रा सिरप चा डोस ( Maxtra Syrup Dosage in Marathi) हा तुमच्या डॉक्टर ने सांगितल्याप्रमाणे द्यावा.

 • २ ते ५ वर्षातील मुलांमध्ये मॅक्सट्रा सिरप चा डोस २.५ मिली दर ८ तासांनी देण्यात येऊ शकतो.
 • ५ ते ११ वर्षातील मुलांमध्ये मॅक्सट्रा सिरप चा डोस ५ मिली दर ८ तासांनी देण्यात येऊ शकतो.
 • ११ वर्षावरील मुलांमध्ये मॅक्सट्रा सिरप चा डोस १० मिली दर ८ तासांनी देण्यात येऊ शकतो.
बाळाचे वयमॅक्सट्रा सिरप चा डोस
२ वर्ष२.५ मिली
३ वर्ष२.५ मिली
४ वर्ष२.५ मिली
५ वर्ष५ मिली
६ वर्ष५ मिली
७ वर्ष५ मिली
८ वर्ष५ मिली
९ वर्ष५ मिली
१० वर्ष५ मिली
११ वर्ष५ मिली
 • १ वर्ष वयाखालील बाळांमध्ये मॅक्सट्रा ड्रॉप चा डोस ०.५ मिली दर ८ तासांनी देण्यात येऊ शकतो
 • १ ते २ वर्षातील मुलांमध्ये मॅक्सट्रा ड्रॉप चा डोस १ मिली दर ८ तासांनी देण्यात येऊ शकतो.
बाळाचे वयमॅक्सट्रा ड्रॉप चा डोस
१ वर्ष खालील०.५ मिली
१ वर्ष ते २ वर्ष१ मिली

औषधाचा वापर ३ ते ४ दिवसासाठी करावे परंतु डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे.

पॅरासिटामोल असलेल्या मॅक्सट्रा सिरप व ड्रॉप चा डोस सुद्धा सारखा असतो.

 • दोन वर्षाखालील बाळामध्ये औषध देण्यासाठी ड्रॉपर चा वापर करावा.
 • दोन वर्षावरील मुलांमध्ये औषध देण्यासाठी मेझरिंग कॅप चा वापर करावा
 • मेझरिंग कॅप व ड्रॉप हे नेहमी स्वच्छ ठेवावी
 • औषध दिल्यावर बाळाने लगेच औषध काढून टाकले तर औषधाचा डोस १० ते १५ मिनिटांनी परत देऊ शकतात.

मॅक्सट्रा सिरप घेण्याआधी काय खबरदारी घ्यावी ?

 • ड्रायविंग : जर तुम्हाला गाडी चालवायची असेल तर मॅक्सट्रा सिरप चा डोस घेणे टाळावे कारण या औषधाने काही प्रमाणात झोप लागत असते.
 • गर्भ अवस्थेत : जर तुम्ही प्रेग्नन्ट असाल तर हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.
 • स्तनपान करतांना : स्तनपान करत असतांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या औषधाचा वापर करावा.
 • किडनी व लिव्हर विकार : जर तुम्हाला किडनी किंवा लिव्हर चा आजार असेल तर तुमच्या डॉक्टर च्या सल्ल्यानेच या औषधाचा वापर करावा
 • मद्यसेवन : मद्यसेवन केलेले असेल अश्या वेळेस या औषधाचा वापर टाळावा कारण या औषधाने काही प्रमाणात झोप लागत असते.

बऱ्याचदा विचारण्यात येणारे प्रश्न

मॅक्सट्रा सिरप चा वापर खोकल्यासाठी होतो का ?

मॅक्सट्रा सिरप चा वापर सर्दी साठो होतो पण काही प्रमाणात हे औषध खोकला सुद्धा कमी करत असते कारण त्यात खोकला कमी होण्याचे कन्टेन्ट आहे

मॅक्सट्रा सिरप आणि मॅक्सट्रा ड्रॉप मधील फरक काय ?

मॅक्सट्रा सिरप २ वर्षावरील मुलांमध्ये वापरण्यात येते तसेच मॅक्सट्रा ड्रॉप २ वर्षाखालील मुलांमध्ये वापरले जाते. मॅक्सट्रा ड्रॉप चे १ मिली चे कन्टेन्ट व मॅक्सट्रा सिरप चे ५ मिली चे कन्टेन्ट सारखे असते.

मॅक्सट्रा सिरप आणि मॅक्सट्रा पी सिरप मध्ये काय फरक असतो ?

मॅक्सट्रा पी सिरप मध्ये मॅक्सट्रा सिरप पेक्षा पॅरासिटामोल चे प्रमाण असते जे मॅक्सट्रा सिरप मध्ये नसते.

मॅक्सट्रा सिरप मोठ्या माणसांमध्ये वापरण्यात येऊ शकते का ?

मॅक्सट्रा सिरप मोठ्या माणसांमध्ये वापरू शकतात परुंतु त्याचा डोस (१० मिली) हा जास्त प्रमाणात घ्यावा लागतो

3.7/5 - (3 votes)

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

Leave a Comment