लहान मुलांनी फ्लू शी कसे लढावे | Flu in Children in marathi

इन्फल्युएंझा (Flu in children in marathi) हा खूप वेगाने पसरणारा श्वासनलिकेच्या आजार आहे. 

फ्लू चा संसर्ग हा दरवर्षी पावसाळा व हिवाळ्यात दिसून येत असतो. फ्लू मुळे लहान मुले लगेच आजारी पडतात व काही वेळेस छातीत संसर्ग (न्यूमोनिया) झाल्याने त्यांना ऍडमिट सुद्धा करावे लागते. कारण फ्लू (न्यूमोनिया) वाढला तर तो जिवाला धोकादायक असतो.

इन्फल्युएंझा व्हायरस हा दरवर्षी बदलत राहतो व लहान मुले किंवा मोठी माणसांमध्ये इतकी रोगप्रतिकार शक्ती नसते. त्यामुळे फ्लू वारंवार होऊ शकतो अशा फ्ल्यूला सीजनल फ्लू (Seasonal Flu in marathi) असे म्हणतात. या विषाणूच्या संसर्गामुळे आपण इतिहासात 1889 ,1918 1957,1968, 2009, 2020 साली पँडेमिक झालेला पहिला आहे.

Table of Contents

फ्लू च्या विषाणूचे प्रकार कोणते असतात ?(What are types of flu in children in marathi?)

फ्लूच्या विषाणू चे हे तीन प्रकारचे असतात.

इन्फ्ल्यूंझा ए व इन्फ्लुएंझा बी या दोन प्रकारच्या विषाणूमुळे दरवर्षी पावसाळ्यात फ्ल्यूचा आजार पसरत असतो. या विषाणूंमुळे होणाऱ्या फ्लूमुळे लहान मुलांना हॉस्पिटल मध्ये अँडमिट करण्याची वेळ येते व जिवाला धोका सुद्धा असतो

हे दोन्ही प्रकारचे विषाणू दरवर्षी म्युटेशन मुळे बदलत असतात. ज्याला जेनेटिक शिफ्ट असे म्हणतात. त्यामुळे लहान मुले दरवर्षी नवीन विषाणूच्या संपर्कात येतात.

इन्फ्लूएंजा-सी या फ्लू विषाणूमुळे कमी लक्षणे असलेला किंवा लक्षणे नसलेला आजार होतो. हा विषाणू इन्फ्ल्यूंझा ए व इन्फ्लुएंझा बी सारखा पसरत नसतो.

फ्लूचा विषाणू हा कसा पसरतो ? (How flu in children spreads ?)

फ्लूचा विषाणू हा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या नाकातोंडात असतो. लहान मुलांमध्ये फ्लूचा विषाणु हा त्यांच्या भावंडांकडून, आई-वडिलांकडून, सोबत खेळणाऱ्या मित्रांकडून पसरू शकतो. विषाणू हा तीन प्रकारे पसरू शकतो.

 • थेट संपर्कात आल्याने– बऱ्याचदा लहान मुलांना मोठी माणसे मुका घेतात, कढेवर घेतात व हे करणाऱ्या माणसाला फ्लूचा संसर्ग असेल तर तो त्या लहान मुलांमध्ये पसरतो.
 • अप्रत्यक्ष संपर्कात आल्याने– दरवाजाच्या कड्या खेळणी जर फ्लू झालेल्या माणसाने हाताळले असतील व त्यालाच लहान मुलांनी स्पर्श केला की फ्लूचा संसर्ग पसरतो कारण फ्लूचा विषाणू निर्जीव वस्तूंवर काही वेळासाठी जिवंत राहत असतो.
 • हवेतून पसरल्याने– जेव्हा संसर्ग झालेला व्यक्ती शिंकतो किंवा त्याला खोकला येतो अशा वेळी त्याच्या शरीरातील जिवंत विषाणू हे त्याच्या थुंकी द्रव्यातून  हवेत पसरतात व जवळील निरोगी व्यक्तीच्या नाकातोंडात प्रवेश करतात त्यामुळे त्या निरोगी व्यक्तीला सुद्धा संसर्ग होतो.

कोणत्या मुलांना फ्लू होण्याची शक्यता जास्त असते ? 

जर लहान मुले संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले असतील, जर त्यांनी फ्लूची लस घेतलेली नसेल किंवा त्यांचे हात वारंवार धुतलेले नसतील कारण ते खेळत असताना खूप साऱ्या वस्तूंना स्पर्श करतात व त्या वस्तूंवर विषाणूचे थुंकी द्रव्य असतील तर त्या मुलांमध्ये फ्लू होऊ शकतो.

ज्या मुलांना सुरुवातीपासून गंभीर आजार असतो. अश्या मुलांमध्ये फ्लू होण्याचे प्रमाण जास्त असते व अशा मुलांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट सुद्धा करावे लागते.

लहान मुलांमध्ये फ्लू ची लक्षणे काय असतात ? (What are symptoms of Flu in children in marathi?)

फ्लू हा मुख्यत: श्वसनाचा आजार असतो. परंतु तो संपूर्ण शरीराला सुद्धा प्रभावी करतो. लहान मुलांमध्ये साधा सर्दी-खोकला असेल तर ती मुले खेळत असतात.परंतु जर लहान मुलांना सर्दी, खोकला असेल व ते बिछान्यावर सुस्त पडून असतील तर त्यांना फ्लूचा संसर्ग झालेला असतो.

फ्लूमध्ये खालील प्रकारची लक्षणे (Symptoms of flu in marathi) दिसून येतात.

 1.  जास्त प्रमाणात ताप येणे 103 डिग्री फॅरेनहाईट च्यावर.
 2.  खूप अंग दुखणे येणे.
 3.  डोके दुखणे.
 4.  स्नायू दुखणे येणे.
 5.  भूक न लागणे कोरडा खोकला येणे.
 6.  नाक सर्दीने वाढणे.  

फ्लू मध्ये वरील सर्व लक्षणे संसर्ग झाल्याच्या पहिल्याच दिवशी दिसून येतात.   

सामान्यतः लहान मुले फ्लूच्या संसर्गातून चार ते पाच दिवसात बरे होतात.

साधा सर्दी खोकला व फ्लू मध्ये काय फरक असतो ?

लहान मुलांना बऱ्याचदा वारंवार सर्दी-खोकला होत असतो त्यामुळे पालकांनी नेमके आपल्या मुलाला सर्दी खोकला कशामुळे झाला आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे असते.

साध्या सर्दी खोकल्या मध्ये ताप हा कमी प्रमाणात असतो. नाकातून सर्दी वाहत असते थोड्या प्रमाणात डोकेदुखी व अंगदुखी असते. खोकला कमी प्रमाणात असतो. शिंका येत असतात व या प्रकारची लक्षणे हळूहळू दिसून येतात.

फ्लूमध्ये जास्त प्रमाणात ताप येतच असतो. तीव्र अंगदुखी व डोकेदुखी असते. सर्दी कमी प्रमाणात असते परंतु कोरडा खोकला वारंवार येत असतो आणि खूप प्रमाणात थकवा असल्याने फ्लू झालेले मुले अंथरुणात पडून असतात. फ्लूची लक्षणेही 24 तासाच्या आत दिसून येतात.

साध्या सर्दी खोकला चा उपचार बाह्यरुग्ण विभागात होतो पण काही वेळेस फ्लू मध्ये लहान मुलांना ऍडमिट करण्याची वेळ येते कारण फ्लू मध्ये न्यूमोनिया होण्याचे प्रमाण अधिक असते.

लहान मुलांमध्ये फ्लू चे निदान कसे करण्यात येते? (How Flu in children is diagnosed?

डॉक्टर तुमच्या मुलाच्या तपासणी वरून व तुम्ही सांगितलेल्या मुलाच्या लक्षणांवरून फ्लूचे निदान करतात. मुलाच्या लक्षणानुसार इतर तपासण्या करण्याची गरज पडत असते.

रक्ताची तपासणी, छातीचा एक्स-रे हा काढावा लागू शकतो कारण फ्लूमध्ये लहान मुलांना न्यूमोनिया तयार होत असतो. एक्स-रे वरून मुलाला किती प्रमाणात न्यूमोनियाचा संसर्ग झालेला आहे हे समजून येते. 

लहान मुलांमध्ये फ्लू चा उपचार कसा करण्यात येतो? (What is treatment of Flu in children in marathi?)

लहान मुलांमध्ये फ्लूचा उपचार हा काही ठराविक नसतो परंतु त्यांच्या लक्षणानुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येतो जेणेकरून मुलाला होणारा त्रास कमी होईल.

 • तुमच्या मुलाला ताप आला असेल तर पॅरासिटेमॉल सिरप हे बाळाच्या वजनाप्रमाणे द्यावे. 15 मिलीग्राम/ किलोग्रॅम जेणेकरून त्यामुळे त्याला आलेला ताप कमी होईल व अंगदुखी सुद्धा कमी होण्यास मदत होईल.
 • तुमच्या मुलाला भरपूर प्रमाणात पाणी पाजावे. ज्यामुळे त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही.
 • कोमट पाणी पाजल्याने घश्यातील खवखव सुद्धा कमी होते.
 • तुमच्या मुलाला जेवण करण्यासाठी जबरदस्ती करू नका. जेव्हा त्याचा आजार बरा होईल. तेव्हा तो/ती आपोआप खाण्यास सुरुवात करेल पण त्याला पातळ पदार्थ (लिक्विड डाएट) देत राहा. तुमच्या मुलाला आजारात खेळावेसे वाटले तर खेळू द्या. त्याला बरे वाटत नसेल तेव्हा तो अंथरुणात पडून राहील.
 • फ्लू ची लक्षणे जर तीव्र वाटत असतील तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
 • डॉक्टर अँटी व्हायरस औषध जर बाळाचा आजार जास्त असेल तर देऊ शकतात. परंतु हे औषध आजाराच्या प्रथम दोन दिवसात सुरू करणे फायद्याचे असते.
 • फ्लू मध्ये अँटिबायोटिक्सचा वापर हा फायद्याचा नसतो परंतु काही वेळेस मुलाला दुसरा संसर्ग होऊ नये म्हणून ते देण्यात येतात कारण अशा वेळी बाळाची प्रतिकारशक्ती खूप कमी झालेली असते त्यामुळे दुसरा संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त असते

फ्लूचा प्रसार टाळण्यासाठी कोणते उपाय करणे महत्त्वाचे असते ? 

flu in children in marathi
 • सर्वात महत्त्वाचे म्हणजे हात स्वच्छ साबणाने धुवावी जेणेकरून आपल्याकडून दुसऱ्याकडे किंवा दुसऱ्याकडून संसर्ग आपल्याकडे पसरणार नाही.
 • खोकला शिंक किंवा नाका तोंडाला हात लावल्यानंतर हात धुणे महत्त्वाचे असते. फ्ल्यूची लक्षणे असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर हात धुणे. बाळाचे नाक साफ केल्यानंतर आपले हात धुऊन घेणे.
 • सहा महिन्यांत खालील बाळाला सर्दी खोकला असणाऱ्या व्यक्ती पासून दूर ठेवावे.
 • बाळाची खेळणी कधीकधी धुऊन घेणे महत्त्वाचे असते कारण तेसुद्धा संसर्ग पसरविण्यास कारणीभूत असतात.
 • तुमच्या मुलाला शिंक येत असेल तर रुमाल कसा नाकातोंडावर वापरावा हे शिकवावे.
 • बाळाचे कपडे स्वच्छ धुऊन घ्यावे.
 • फ्लू ची लस घेतली असेल तर तुमचा मुलगा फ्लूने आजारी पडण्याचे प्रमाण कमी असते. फ्लू ची लस ही सहा महिन्यांवरील बाळाला देता येते व या लसीचा डोस दरवर्षी देण्यात येतो. ही लस दरवर्षी बदलत असते कारण चा विषाणू सुद्धा बदलत असतो.
 • फ्लू लसीचे लसीकरण हे सर्वात जास्त धोका असणाऱ्या मुलांना म्हणजे हृदयाचा आजार किंवा फुफ्फुसांचा आजार असणाऱ्यांना देणे खूपच आवश्‍यक असते.

बरेचदा विचारण्यात येणारे प्रश्न

बाळाला फ्लू झालेला आहे हे कसे ओळखावे ?

बाळाच्या लक्षणांवरून म्हणजे जास्त प्रमाणात ताप, खोकला,अंगदुखी वरून बाळाला फ्लू झाल्याचे निदान होते.

फ्लूचा ताप किती दिवसापर्यंत राहू शकतो ?

शक्यतो फ्लूचा ताप आठवडाभर राहतो. प्रत्येक बाळाचे शरीर व प्रतिकारशक्ती वेगवेगळी असते त्यामुळे काही बाळांमध्ये कमी तर काहींमध्ये जास्त दिवस ताप राहू शकतो. 

कोणत्या स्टेज ला फ्लू पसरू शकतो ?

लक्षणे येणाच्या १ दिवस अगोदर व लक्षण आल्यापासून ५ दिवसापर्यंत फ्लू असलेला रुग्ण त्याचे विषाणू पसरवू शकतो.

फ्लू मधून लवकरात लवकर बरे कसे होता येते ?

आराम केल्याने, भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने, गरम पाण्याची वाफ घेतल्याने, वेळेवर औषधी घेतल्याने फ्लू लवकर बरा होऊ शकतो.

फ्लू झाल्यावर वास येण्याची क्षमता कमी होते का ?

फ्लू चा विषाणू नाकातील नसांमध्ये पसरल्याने काही दिवस वास येण्याची क्षमता कमी होऊ शकते.

ताप नसलेला फ्लू चा रुग्ण फ्लू चा विषाणू पसरवू शकतो का ?

हो. ताप नसेल तरी फ्लू चा रुग्ण फ्लू पसरवू शकतो.

फ्लू हा आजार रात्री का वाढतो ?

रात्रीच्या वेळेस रक्तातील कॉर्टिसॉल या हार्मोन चे प्रमाण कमी होत असते त्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशी वाढतात व त्यामुळेच रात्रीच्या वेळेस फ्लू ची लक्षणे जास्त प्रमाणात दिसून येतात.

लहान मुलांना डॉक्टरांकडे कधी दाखवावे ?

लहान मुलांना फ्लू ची लक्षणे दिसून आली व ते सुस्त पडत असेल अश्या वेळेस डॉक्टरांशी संपर्क केलेला बरा.

फ्लू झालेला असेल त्या वेळेस आंघोळ केली पाहिजे का?

फ्लू मध्ये ताप येत असतो तरी पण दररोज आंघोळ केलेली बरी. कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीरावरील जंतू कमी होऊन जातात तसेच शरीराचे तापमान सुद्धा सामान्य राहते.

फ्लू असतांना संत्रीचा रस तसेच इतर फळे खाणे चांगले असते का ?

संत्रीच्या रस मध्ये व्हिटॅमिन क असते जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ति लवकर वाढवते. तसेच इतर फळे खाणे सुद्धा फायद्याचे असते.

फ्लू झालेला असेल तर बाळाला कसे झोपवावे ?

फ्लू असलेल्या बाळाला डोक्याकडील भाग उंच असेल असे झोपवावे ज्यासाठी तुम्ही खांद्याखाली उशीचा वापर करू शकतात. असे केल्याने बाळाला श्वास घेण्याचा त्रास कमी होतो.

फ्लू झालेला असतांना वेळेत उपचार घेतलेला बरा कारण फ्लू चे रूपांतर निमोनिया मध्ये होत असते. वेळेत घेतलेल्या उपचाराने लवकरात लवकर बरे होता येते तसेच हॉस्पिटल मध्ये लागणारा खर्च सुद्धा वाचवता येतो.

या लेख मध्ये फ्लूवरील जास्तीत जास्त प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे तरी तुमचे काही प्रश्न असतील तर कंमेंट करा. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेयर करा.

Rate this post

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

Leave a Comment