लहान मुलांचा हेल्थ इन्शुरन्स (Health insurance in marathi) काढणे हे आपण क्वचितच ऐकले असेल कारण आपल्याला वाटते की मोठा आजार हा फक्त वयस्कर असताना होऊ शकतो. परंतु आपल्याला हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की नवजात बाळाच्या वयापासून सुद्धा मोठा आजार होऊ शकतो अशा वेळेस पालकांना आपल्या मुलाच्या आजारावरील खर्च पाहून बरेचदा तो नकोसा वाटतो. परंतु अशा वेळेस जर त्या पाल्याचा हेल्थ इन्शुरन्स काढलेला असेल तर तो फार फायद्याचा असतो चला तर मग या लेखमध्ये जाणून घेऊया लहान मुलांमध्ये हेल्थ इन्शुरन्स काढणे का महत्वाचे असते
हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय ? (What is health insurance in marathi?)
हेल्थ इन्शुरन्स या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे हेल्थ म्हणजे तब्येत व इन्शुरन्स म्हणजे सुरक्षा. तब्येतीची काळजी घेण्यासाठी काढण्यात येणारे सुरक्षा कवच म्हणजे हेल्थ इन्शुरन्स किंवा आरोग्य विमा असते. हेल्थ इन्शुरन्स हा अशा प्रकारचा इन्शुरन्स असतो ज्यामध्ये इन्शुरन्स काढलेला व्यक्ती जर आजारी पडलेला असेल तर त्या व्यक्तीचा हॉस्पिटलचा खर्च,औषधींचा खर्च, तपासण्यांचा खर्च तसेच डॉक्टरांची तपासणी फी या प्रकारचा खर्च कव्हर करण्यात आलेला असतो त्यामुळे त्या व्यक्तीला आर्थिक फटका बसत नाही.
हेल्थ इन्शुरन्स (Health insurance in marathi) हा एक प्रकारचा करार असतो ज्यामध्ये तो खरेदी करणारा व्यक्ती व इन्शुरन्स देणारी कंपनी यांच्यात हा करार झालेला असतो ज्यामध्ये जर ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचा परिवार जर आजारी पडला तर त्या आजाराचा खर्च घेतलेला इन्शुरन्स प्रमाणे ती कंपनी करत असते परंतु अशा इन्शुरन्स साठी कंपनीने ठरवलेली रक्कम दर वर्षी त्या व्यक्तीला प्रीमियम म्हणून भरावी लागत असते. ती रक्कमही परत मिळणारी नसते कारण तो एक प्रकारचा करार असतो.
लहान मुलांमध्ये हेल्थ इन्शुरन्स काढणे का महत्त्वाचे असते ?
पालकांना असे वाटत असते की आपले मूल चांगले आहे व त्याच्या तब्येतीला काही त्रास होणार नाही. परंतु असा विचार करणे योग्य नसते कारण कोणत्या व्यक्तीला कोणता आजार केव्हा होईल हे सांगता येत नाही म्हणूनच लहान मुलांचा सुद्धा हेल्थ इन्शुरन्स काढणे फार महत्त्वाचे असते. लहान मुलांमध्ये हेल्थ इन्शुरन्स काढणे हे खालील कारणांसाठी महत्त्वाचे असते
जन्मजात आजार असणे
नवजात बाळांना बऱ्याचदा जन्मापासून कोणत्या प्रकारची विकृती असू शकते अशा वेळेस नवजात बाळाला मोठा उपचारापासून जावे लागू शकते व त्या उपचाराचा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात असतो व बऱ्याचदा अशा नवजात बाळांना ऑपरेशनची गरज सुद्धा पडत असते त्यामुळे खर्च खूप प्रमाणात वाढत असतो त्यामुळे नवजात बाळाला गृहीत धरून हेल्थ इन्शुरन्स काढलेला असेल तर तो कधीही फायद्याचा ठरत असतो
प्रतिकारशक्ती कमी असणे
लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्तीही कमी असते त्यामुळे लहान मुले ही लगेच सर्दी, खोकला, ताप, जुलाब अशा आजारांना बळी पडत असतात परंतु आजाराची तीव्रता जास्त प्रमाणात वाढली तर मुलाला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावे लागू शकते अशा लहान मुलांचा सुद्धा हेल्थ इन्शुरन्स काढलेला असला तर आर्थिक दृष्ट्या पालकांना खूप मोठ्या प्रमाणात मदत होत असते
खेळत असताना इजा होणे
लहान मुले खेळत असताना भान नसल्याने किंवा समज नसल्याने त्यांना इजा होत असते अशा वेळेस लहान मुलाचा उपचार घेण्याचा खर्च वाढू शकतो परंतु लहान मुले खेळत असताना त्यांना कोणत्याही जागेवर इजा झाली म्हणजे काटले गेले तर मारण्याची गरज पडत असते अशा वेळेस खर्च वाढत असतो त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स असेल तर खूप फायद्याचे असते
वारंवार आजारी पडणे
सध्याच्या काळात लहान मुलांचा आहार हा खूप मोठ्या प्रमाणात बदललेला आहे व लहान मुलांना खाण्याच्या सवयी या फायदेशीर नसल्याने ते नेहमी आजारी पडत असतात अशा वेळेस खर्चाला कव्हर करण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स असलेला कधीही बरा.
वरील सर्व कारणा व्यतिरिक्त इतर आजार सुद्धा कोणत्या वेळेस येतील हे काही सांगता येत नाही जसे आपण पाहिलेच आहे की 2020 साली कोरोना नावाची महामारी आली ज्यामध्ये बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला तसेच हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्याचा खर्च हा खूपच जास्त प्रमाणात लागला त्यामुळे आपल्याला हे समजणे फार महत्वाचे आहे की आपल्याला कोणताही आजार केव्हाही उद्भवू शकतो त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स असेल तर आर्थिक नियोजन हे बिघडत नाही त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स काढलेला कधीही बरा.
लहान मुलांमध्ये हेल्थ इन्शुरन्स काढणे टाळता येऊ शकते का ?
मनुष्य जन्माला आला की त्याला केव्हाही काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे लहान मुलांसाठी हेल्थ इन्शुरन्स काढलेला कधीही बरा परंतु पालकांनी आपल्या पाल्याची व्यवस्थित काळजी घेतली तर मुलांचे आरोग्य निरोगी राहू शकते यासाठी पालकांनी खालील उपाय करणे फार महत्त्वाचे असते
योग्य आहार खाऊ घालावा
लहान मुलांना जर योग्य आहार देण्यात आला तर लहान मुलांची प्रतिकारशक्ती ही नियमित राहते त्यामुळे लहान मुलांना आजार होण्याची शक्यता फारच कमी असते योग्य आहार म्हणजे भाजी पोळी वरण भात असा असावा लहान मुलांना कुरकुरे चिप्स काढायची सवय टाळावी कारण असे खाल्ल्याने काहीच फायदा शरीराला होत नसतो घरात असलेला नियमितपणा हे मुलाला निरोगी ठेवण्यास उपयोगी ठरू शकते
नियमित व्यायाम करण्याची सवय लावावी
पालकांना आपल्या मुलाला निरोगी ठेवायचे असल्यास त्यांना नियमित व्यायाम करण्याची सवय लावणे आवश्यक असते त्यामुळे मुलांची तब्येत ठणठणीत राहते व आजार अशा मुलांपासून दूर राहतो
बाहेरून आल्यावर हात पाय धुणे
लहान मुले बाहेरून आल्यावर किंवा खेळून आल्यावर त्यांचे हात धुत नाही व तसेच ते जेवताना त्याचा वापर करतात अशा मुळे त्यांच्या हातातील जंतू हे पोटात शिरतात व त्यांना संसर्ग होण्याची शक्यता वाढते म्हणून लहान मुलांना बाहेरून खेळून आल्यावर हात पाय धुण्याची सवय लावणे फार महत्त्वाचे असते असे केल्याने लहान मुलांना होणारा संसर्ग हा टाळण्यात येऊ शकतो
लहान मुलांमध्ये कोणते आजार जास्त प्रमाणात दिसून येतात ?
लहान मुलांमध्ये मोठा आजार होऊ शकत नाही हा सर्वात मोठा गैरसमज असतो त्यामुळे पालकांनी मुलांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे फार महत्वाचे असते. लहान मुलांना खालील प्रकारचे आजार सामान्यपणे दिसून येत असतात
निमोनिया
लहान मुलांना वातावरणात बदल झाला की नेहमी सर्दी खोकला होत असतो या सर्दी खोकला चे रूपांतर बऱ्याचदा निमोनिया मध्ये होत असते बऱ्याचदा पालक सर्दी खोकल्याचा उपचार घरीच करत असतात त्यामुळे लहान मुलांना निमोनिया होण्याची शक्यता भरपूर प्रमाणात वाढून जाते लहान मुलाला निमोनिया झालेला असेल तर त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागू शकते
डायरिया
लहान मुलांना जुलाब होण्याचे प्रमाण भरपूर असते कारण लहान मुले खेळत असताना घरातील कोणत्याही वस्तूला हात लावतात व तेच हाथ जेवणासाठी वापरतात अशा वेळेस लहान मुलांचे हात वारंवार साबणाने स्वच्छ होणे फार महत्त्वाचे असते जुलाब सोबत बऱ्याचदा उलट्या व ताप येत असतो अशा वेळेस पोटात संसर्ग झालेला असण्याची शक्यता असते असा संसर्ग हा डायरिया असू शकतो व लहान मुले शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे खूप जास्त प्रमाणात सुस्त पडत असतात त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागू शकते
बालदमा
वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे बालदम्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये भरपूर वाढले आहे. बालदम्यामध्ये लहान मुलांना जास्त करून रात्रीच्या वेळी केवळ सकाळच्या वेळी श्वास घेण्यास त्रास होत असतो अशावेळी पालक सुद्धा घाबरून जातात व हा त्रास जास्त प्रमाणात असेल किंवा वाढत असेल अशावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागू शकते
डेंग्यू
डेंग्यू हा आजार आजारी रुग्णापासून निरोगी रुग्णामध्ये डासांमार्फत पसरत असतो डेंग्यू आजारात भरपूर प्रमाणात अंगदुखी अशक्तपणा अशी अशी लक्षणे दिसून येतात. या आजारात रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट कमी होत असतात जर प्लेटलेट एक लाखापेक्षा कमी होत असतील तर हा आजार धोकादायक ठरू शकतो अशा रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागू शकते
टायफाईड
सध्याच्या काळात टायफाईड या आजाराचे प्रमाण कमी झालेले आहे कारण आपण पिण्याचे पाणी हे स्वच्छ करूनच पितो व लसीकरण उपलब्ध असल्याने टायफाईड चे प्रमाण फारच कमी आहे. या आजारात तीव्र प्रमाणात ताप येणे, भूक न लागणे, पोटात दुखणे येणे अशी लक्षणे दिसून येतात. बऱ्याचदा टायफाईड उपचार ओपीडी वर होतो परंतु लक्षणे जर तीव्र असतील तर हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागू शकते
युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन
लहान मुलांमध्ये जास्त करून मुलींमध्ये लघवी चा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असते या आजारात लघवीच्या थैलीला सूज आलेली असते व संसर्ग झालेला असतो. हा संसर्ग किडनी पर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे वेळेतच हॉस्पिटलमध्ये भरती करून उपचार केला तर हा आजार लवकर बरा होतो. या आजारात तीव्र प्रमाणात ताप येणे व थंडी वाजून येणे अशी लक्षणे दिसून येत असतात
हर्निया
लहान मुलांमध्ये हर्नियाचे प्रमाण सुद्धा जास्त असते त्यात जास्त करून जन्मापासूनच त्यांना हर्नियाचा त्रास असतो परंतु तो मुले मोठी झाल्यावर समजून येत असतो हर्निया या आजारात जांघेतील इंगवायनल कॅनॉल या भागातून पोटातील आतडे बाहेर येत असल्याने जांगेत सूज येत असते ही सूज कमी जास्त होत असते परंतु जर आतडे त्या मार्गात फसले तर ती एक प्रकारची इमर्जन्सी असते अशा वेळेस इमर्जन्सी ऑपरेशनची गरज पडू शकते त्यासाठी मुलाला हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागू शकते
हायड्रोसिल
काही लहान मुलांमध्ये लिंगाच्या खाली असलेल्या थैलीला जन्मतः सूज आलेली असते व ती सूज. वाढत जात असते अशा आलेल्या सुजला हायड्रोसिल म्हणतात. या आजारात मुलाच्या अंडाशयाभोवती पाणी जमा होत असते. काही मुलांमध्ये ही सूज कालांतराने कमी होत असते. परंतु जर ती सूज कमी होत नसली तर ऑपरेशनची गरज पडत असते
गळू तयार होणे
लहान मुलांना वरील कोणत्याही भागावर इजा झाल्याने किंवा इतर कारणांमुळे पस तयार होत असतो अशावेळी औषधे जर ते कमी करण्यासाठी उपयोगी ठरत नसतील तर त्या जागेवर चिरा मारून तो पस बाहेर काढावा लागत असल्याने ऑपरेशनची गरज पडत असते
नवजात बालकांमध्ये जन्मजात मोठे आजार होत असतात. बऱ्याचदा हे आजार आपल्याला आईच्या सोनोग्राफी मध्ये समजून येत असतात अशा वेळी नवजात शिशु ला येणार एनआई सी यु मध्ये भरती ठेवण्याची गरज पडत असते वरील सर्व आजारांबद्दल माहिती वाचल्यानंतर तुम्हाला नक्की समजून आले असेल की लहान मुलांचा हेल्थ इन्शुरन्स असणे किती महत्त्वाचे असते कारण कोणता आजार मुलाला केव्हा उद्भवेल हे काही सांगता येत नाही