लहान मुलांमध्ये गळू(अब्सेस) | Abscess in Children in marathi

लहान मुलांमध्ये (अब्सेस) गळू (abscess in children in marathi) होणे ही खूप सामान्य समस्या आहे. कारण बऱ्याचदा मुले खेळत असताना त्यांना कुठेतरी जखम होत असते अशा वेळी जखमेतून जर जंतू आत शिरले तर त्याठिकाणी (अब्सेस) गळू तयार होत असतो.

अब्सेसला गळू असेसुद्धा म्हटले जाते. चला तर मग जाणून घेऊया गळूबद्दल संपूर्ण माहिती.

Table of Contents

लहान मुलांमध्ये गळू म्हणजे काय? ( What is abscess in children in marathi?)

गळू म्हणजे त्वचेखाली होणारा संसर्ग असतो. सामान्यतः त्वचेवर बॅक्टेरिया असतात. परंतु त्या त्वचेसाठी धोकादायक नसतात परंतु मुले खेळत असताना त्यांना त्वचेवर कोणत्या ही भागावर जखम झाली किंवा चिरा पडला ,काही चावले असेल किंवा केस अचानक ओढला गेला असेल अशावेळी त्वचेवरील बॅक्टेरिया यांना शरीरात शिरण्याचा मार्ग मोकळा होतो व ते त्वचेखाली शिरतात आणि त्या ठिकाणी संसर्ग तयार होण्यास सुरुवात होते.

तसेच हे अंगावर केस असलेल्या भागात घाम येणाऱ्या जागेत म्हणजे काखेत मानेखाली, जांघेत व ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात घर्षण होत असते. अशा जागेवर जास्त प्रमाणात तयार होत असतात. तसे पाहिले तर (अब्सेस) गळू हे शरीराच्या कोणत्याही भागावर तयार होऊ शकते.

गळू तयार होण्याची मुख्य कारणे काय असतात? (What are causes of abscess in children in marathi?)

गळू तयार होण्याचे कारण काही स्पष्ट नसते, परंतु खालील कारणांमुळे लहान मुलांमध्ये (अब्सेस) गळू तयार होऊ शकतो.

  • लहान मुले ही बऱ्याचदा खेळत असताना त्यांना शरीरावर कुठे न कुठे इजा होत असते.अशा वेळेस त्वचेवर ओरखडा पडल्याने त्या ठिकाणी जखम होते व तेथून त्वचेवरील हे जंतू आत शिरतात व (अब्सेस) गळू होण्यासाठी कारणीभूत ठरतात.
  •  मुलाला जर अतिप्रमाणात घाम येत असेल तर त्याठिकाणी घाम बेंड येऊ शकते व त्याचे रूपांतर गळू मध्ये होऊ शकते.
  • कोणत्या किंवा रस्त्यावरील भटक्या प्राण्याने चावले असेल तरी अशा वेळेस ज्या ठिकाणी चावले आहे त्या त्वचेखाली (अब्सेस) गळू तयार होऊ शकते.
  • मुलांची प्रतिकारशक्ती ही इतर आजारांमुळे कमी झालेली असल्याने त्वचेखाली बॅक्टेरिया शिरल्याने शरीराची इम्युन सिस्टीम त्या ठिकाणी तो संसर्ग कमी होण्यासाठी पांढऱ्या पेशी पाठवत असते. त्यामुळे त्या ठिकाणी पू तयार होत असतो व हा पू त्या जागेवर वाढतच जातो त्या प्रमाणात त्या जागेवर दुखणे वाढत असते.

लहान मुलांमध्ये गळू झाल्यावर काय लक्षणे दिसून येतात ?(What are symptoms of abscess in children in marathi?)

गळू तयार होत असताना नेहमी ते छोटे असते अशा वेळेस त्या ठिकाणी गुलाबी रंगाचा फोड येत असतो व त्या भागावरील सूज काही दिवसात वाढण्यास सुरुवात होते व तो भाग लालसर होतो व दुखण्यास सुरुवात होते काही वेळेस ती त्या ठिकाणी फुटून पांढरा किंवा पिवळसर रंगाचा पस बाहेर येऊ शकतो.

लहान मुलांमध्ये (अब्सेस) गळू जर जास्त प्रमाणात वाढलेले असेल तर त्यांना भरपूर प्रमाणात ताप व थंडी सुद्धा वाजून येत असते कारण अशावेळी रक्तामध्ये संसर्ग पसरण्याची शक्यता असते.

लहान मुलांमध्ये गळू चे निदान कसे करण्यात येते ? ( How abscess in children is diagnosed?)

बाळाला असलेल्या लक्षणांवरून व बाळाच्या पस तयार झालेल्या जागेच्या तपासणीवरून डॉक्टर बाळाला (अब्सेस) गळू झाल्याचे निदान करतात.

लहान मुलांमध्ये गळू चा काय उपचार असतो ? (What is treatment of abscess in children in marathi?)

जर लहान मुलाला गळू असेल तर काही काळजी घेतल्याने ते कमी होण्यास मदत होते.

  • आंघोळ करताना त्वचा साबणाने स्वच्छ करणे आवश्यक असते जेणेकरून त्वचेवरील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते.
  •  बाळाचे नखे काढून घेणे आवश्यक असते कारण ते त्या नखांनी त्यांना होणाऱ्या खाज मुळे पस (पू) झालेला फोड फोडू शकतात.

पस (पू) झालेला फोड फोडण्याचा प्रयत्न करू नये कारण ते तुमच्या मुलासाठी वेदनादायी ठरू शकते. तसेच ते फुटल्याने बाजूच्या नॉर्मल त्वचेवर पस पसरतो व तो संसर्ग इतर जागी पसरू शकतो. मुलाचे हात व तुमचे हात वारंवार धुणे खूप आवश्यक असते. त्यामुळे जंतुसंसर्ग होण्यास आळा घालता येतो.

काही वेळेस बाळाला ताप येत असेल तर आपल्या बालरोग तज्ज्ञाशी संपर्क करणे अत्यावश्यक असते ते बाळाला दुखण्यावर व संसर्ग कमी करण्यासाठी औषधे देऊ शकतात.  

जर लहान मुलाचे (अब्सेस) गळू हे खूप मोठे झालेले असेल तर प्रथम डॉक्टरांशी संपर्क करणे महत्त्वाचे असते.

काही वेळेस औषधे देऊन सुद्धा (अब्सेस) गळू कमी होत नाही किंवा ते वाढत राहते अशा वेळेस सर्जन डॉक्टर त्या जागेचे छोटे ऑपरेशन करण्यास सांगू शकतात. या ऑपरेशनला इन्सिजन अँड ड्रेनेज असे म्हणतात.

इन्सिजन अँड ड्रेनेज (Incision & Drainage in Marathi) या ऑपरेशन मध्ये बाळाला भूल दिल्यानंतर बाळाच्या अब्सेस झालेल्या जागेवर चिरा मारण्यात येतो व त्यातील संपूर्ण पस (पू)  बाहेर काढण्यात येतो. काही वेळेस अशा अब्सेस मध्ये पॉकेट्स बनत असतात. त्यांनासुद्धा मोकळी करण्यात येतात.

पस मुळे तयार झालेल्या जखमेची स्वच्छता करून ड्रेसिंग करण्यात येते. बऱ्याचदा ही जखम खोलगट असते त्यामुळे ते भरण्यासाठी सुरुवातीला दररोज व काही दिवसांसाठी एक दिवस आड ड्रेसिंग करणे गरजेचे असते असे केल्यावरच ती जखम पूर्णपणे भरून येते.

या ऑपरेशन नंतर डॉक्टर दुखणे कमी करण्यासाठी तसेच संसर्ग कमी होण्यासाठी अँटिबायोटिक औषध देतात.

वरील संपूर्ण लेख वाचल्यावर तुम्हाला समजून आले असेल की ,जर तुमच्या मुलाला (अब्सेस) गळू झाले तर तुम्ही काय केले पाहिजे. वेळेवर घेतलेला उपचार हा नेहमी बरा असतो.

बऱ्याचदा विचारण्यात येणारे प्रश्न

(अब्सेस) गळू झाले तर सर्वोत्तम उपचार काय असतो?

(अब्सेस) गळू जर छोटी असेल तर ते औषध देणे बरे होऊ शकते. परंतु ते मोठे झालेले असेल तर ते चिरा मारल्याने त्यातील पस बाहेर काढल्याने लगेच बाळाचा त्रास कमी होतो.

(अब्सेस) गळू झाले तर बाळाला काय त्रास होतो?

(अब्सेस) गळू झाले, तसेच  मोठे झालेले असेल तर त्या ठिकाणी बाळाला दुखून येत असल्याने बाळ चिडचिड करते व जास्त प्रमाणात रडते. तसेच त्याला जास्त प्रमाणात ताप सुद्धा येऊ शकतो.

(अब्सेस) गळू  हे कोणत्या बॅक्टेरियामुळे होऊ शकते?

स्टॅफायलोकॉकस तसेच स्ट्रेप्टोकोकस या बॅक्टेरिया मुळे बऱ्याचदा (अब्सेस) गळू तयार होते.

ऑपरेशन झाल्यानंतर बाळाला जेवणामध्ये काय द्यावे?

जेवणात नेहमी जे घरात जेवण बनवतात ते खाऊ घालावे. तसेच जेवणात लिंबू, संत्री, मोसंबी अशा फळांचा रस सुद्धा बाळाला दिल्याने बाळाची जखम लवकर भरण्यासाठी मदत होते.

ऑपरेशन नंतर बाळाला काही त्रास होतो का?

ऑपरेशन नंतर उलट बाळाला असणारा ऑपरेशन आधीचा त्रास कमी होतो व बाळाचे चिडचिड व रडणे सुद्धा लगेच कमी होते.

Rate this post

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

1 thought on “लहान मुलांमध्ये गळू(अब्सेस) | Abscess in Children in marathi”

Leave a Comment