लहान मुलांमध्ये अँपेंडिक्सचा त्रास | Appendicitis in children in Marathi

लहान मुलांमध्ये अँपेंडिक्सचा त्रास (appendicitis in children in marathi) अचानकच चालू होऊ शकतो. हे दुखणे असे असते की ते मुल खूप शांत पडून राहते व कण्हत असते. अश्या वेळेस पालक सुद्धा चिंतेत पडतात. ही एक प्रकारची इमर्जनसी असते कारण जर अँपेंडिक्स फाटले तर मुलाच्या/मुलीच्या जीवाला धोका असतो. म्हणूनच असा त्रास तुमच्या मुलाला/मुलीला झाला तर काय उपाय केला पाहिजे व अँपेंडिक्स चा त्रास कशामुळे होतो ते या लेख मध्ये जाणून घेवुया.

Table of Contents

अपेंडिक्स म्हणजे काय ?

अपेंडिक्स हा गांडुळाच्या आकारासारखा अवयव असतो. छोटे आतडे व मोठे आतडे यांच्या जोडणाऱ्या भागाजवळ हा अवयव असतो. अपेंडिक्सची जागा बेंबीच्या खाली व उजवीकडे असते.

अपेंडीक्सला व्हेस्टिजियल अवयव म्हणतात कारण या अवयवाचे शरीरात काही महत्त्व नसते. हा अवयव नसेल तरी आपण सामान्य जीवन जगू शकतो.

अपेंडिसाइटीस म्हणजे काय ? (Appendicitis meaning in marathi)

अपेंडिसाइटीस म्हणजे अपेंडिक्सला सूज येणे याचे मुख्य कारण म्हणजे अपेंडिक्स मध्ये संसर्ग झालेला असणे. किंवा आतड्यांमधील मल अपेंडिक्समध्ये शिरल्यानंतर तो तिथे कुजू लागतो त्यामुळे तेथे जंतुसंसर्ग होतो व अपेंडिक्सला सूज येते.

अपेंडिसाइटीसची लक्षणे (Symptoms of appendicitis in children in marathi )

अपेंडिसाइटीस मध्ये सर्वप्रथम ताप येतो व बेंबीजवळ पोटात दुखून येत असते. काही वेळाने हा पोटदुखीचा त्रास अजून वाढतो आणि बेंबीच्या खाली उजव्या बाजूला सुद्धा पोट दुखीचा त्रास होण्यास सुरुवात होते.

जर तुमच्या मुलाला बेंबी जवळ दुखून येत असेल तर तुम्ही अपेंडिसाइटीसची इतर लक्षणे जाणून घेणे महत्त्वाचे असते.

  • बेंबीजवळ पोट दुखणे व पोटाच्या उजव्या भागात पोट दुखणे वाढणे.
  • कमरेत वाकून चालणे.
  • भूक न लागणे.
  • मळमळ होणे व उलटी होणे.
  • जर अपेंडिक्स फाटले असेल तर पोटातील दुखणे हे अधिक तीव्र होते व तापाची तीव्रता सुद्धा वाढते .अशावेळी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करणे महत्त्वाचे असते.

अपेंडिक्स जर फाटले असेल तर त्या परिस्थितीला  Ruptured अपेंडिक्स असे म्हणतात. ही वेळ अत्यंत महत्त्वाची असते कारण या परिस्थितीत पेशंटच्या जीवाला खूप मोठा धोका असतो.

अपेंडिसाइटीस मध्ये कोणत्या प्रकारच्या समस्या येऊ शकतात? (What are complications of appendicitis in children in marathi ?)

जर संसर्ग झालेले अपेंडिक्स काढले नाही तर ते लक्षणे सुरू होण्याच्या 48 ते 72 तासात फुटण्याची शक्यता वाढते, यामुळे संपूर्ण पोटामध्ये जंतू संसर्ग पसरण्याचा धोका असतो व त्यासोबत पोटात पू (पस) सुद्धा तयार होऊ शकतो या पू (पस) मुळे आतडे  एकमेकांना चिपकण्याची शक्यता असते.

अपेंडिक्सचा त्रास कोणामध्ये होऊ शकतो ?

अपेंडिक्सचा आजार हा जास्तकरून वयाच्या तीन वर्षापासून कोणालाही होऊ शकतो. तसे पाहिले तर अँपेंडिक्स चा त्रास होण्याचे काही वय नसते.

अपेंडिक्सचे निदान कसे करण्यात येते ? (How appendicitis in children in marathi is diagnosed?)

अपेंडिक्सचे लक्षणे ही डायरिया, लघवीचा संसर्ग,मुतखडा या आजारासारखे असतात. म्हणून डॉक्टरांकडे अपेंडिक्स निदान करणे हे आव्हानच असते.

अपेंडिक्स दुखणे हे पोटाच्या उजव्या व खालच्या बाजूला असल्याचे डॉक्टरांकडून तपासले जाते व रक्ताच्या काही चाचण्या ,पोटाची सोनोग्राफी (Abdominal Sonography), क्ष -किरण (X-ray) व क्वचित पोटाचा सिटीस्कॅन ( CT Scan abdomen) करावा लागू शकतो.

रक्तामध्ये जंतुसंसर्ग पसरला असेल तर पांढऱ्या पेशी वाढलेल्या असतात.

पोटाच्या सोनोग्राफीमध्ये अपेंडिक्सवर किती सूज आहे? ते किती लांब आहे? व ते फुटलेले तर नाही ना ? या गोष्टी समजून येतात. जर अपेंडिक्स फाटलेले असेल तर सिटीस्कॅनची गरज भासू शकते.

अपेंडिक्सचा उपचार काय असतो ? (What is treatment of appendicitis in children in marathi ?)

अपेंडिक्सचा संसर्ग झालेला असतो  तेव्हा ते काढून टाकणे हाच उपचार असतो कारण जर अपेंडिक्स फाटले तर पोटात संसर्ग पसरण्याचा धोका असतो व त्यामुळे काही वेळेस आतड्यांमध्ये अडथळा (Intestinal Obstruction)सुद्धा येतो अशा वेळेस इमर्जन्सी ऑपरेशन करावे लागते कारण जीवाला धोका असतो.

अपेंडिक्स काढून टाकण्याच्या ऑपरेशनला अपेंडेक्टॉमी (Appendectomy) असे म्हणतात. हे ऑपरेशन पोटाला चिरा लावून ओपन सर्जरी किंवा दुर्बिणीद्वारे केले जाते.

ज्यावेळी अपेंडिसाइटीसमुळे काही गुंतागुंत झालेली नसते तेव्हा दुर्बिणीने ऑपरेशन केले जाते. दुर्बिणीने अपेंडिक्स काढण्याच्या ऑपरेशनला लॅप्रोस्कोपिक अपेंडेक्टॉमी (Laparoscopic appendectomy) असे म्हणतात. पण जेव्हा फुटलेल्या अपेंडिक्समुळे गुंतागुंत झालेली असते तेव्हा ओपन सर्जरीचा (Open Surgery) पर्याय असतो. ओपन सर्जरी ला लॅपरोटॉमी (Laparotomy) असे म्हणतात.

ऑपरेशनच्या आधी

सर्जन डॉक्टर हे आजारासंबंधी सर्व माहिती देतात व त्यामागील काही धोका सुद्धा सांगतात. बाळाला भूल दिल्यानंतरच ऑपरेशन केले जाते. ऑपरेशन आधी बाळाला तोंडाने काहीच देता येत नाही कारण भूल दिल्यावर बाळाला जर उलटी झाली तर बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो.

ऑपरेशन नंतर

ऑपरेशन नंतर सुद्धा बाळाला काही तास उपाशी ठेवावे लागते. बाळाला त्यासाठी सलाईन लावलेली असते. पोटातील संसर्ग कमी होण्यासाठी बाळाला अँटिबायोटिक दिले जातात व पोटातील दुखणे कमी करण्यासाठी सुद्धा इंजेक्शन दिली जातात.

हॉस्पिटलमधील भरती राहण्याचा वेळ हा पोटात काय सापडले आहे यावर निर्भर असतो. अपेंडिक्स जर फुटलेले नसेल व लॅप्रोस्कोपीने ऑपरेशन झाले असेल तर दोन दिवसात सुट्टी होते. परंतु काही कारणास्तव ओपन सर्जरी करावी लागली तर चार ते पाच दिवस लागू शकतात.

घरी घेण्याची काळजी

हॉस्पिटल मधून सुट्टी झाल्यावर घरी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.

  • एक आठवडा तरी आराम करावा व मैदानी खेळ खेळू नये.
  • जेवणातील आहार नेहमीप्रमाणे घ्यावा. 
  • आंघोळ नेहमीप्रमाणे करावी.
  • दुखणे येत असेल तर डॉक्टरांनी दिलेले औषध घ्यावे.
  • बऱ्याचदा टाके काढण्यासाठी सात दिवसांनी डॉक्टरांना दाखवावे.

बरेचदा विचारण्यात येणारे प्रश्न

अपेंडिक्स ऑपरेशनविना बरा होत नाही का ?

नाही.

अपेंडिक्स साठी ओपन सर्जरी चांगली का लेप्रोस्कोपिक सर्जरी ?

ओपन सर्जरीमध्ये पोटाला मोठा चिरा लावला जातो .भविष्यात अशा चिऱ्याजवळ पोटातील आतडे चिपकण्याची शक्यता जास्त असते. हॉस्पिटलमधील स्टे (मुक्काम) हा जास्त असतो.
लेप्रोस्कोपिक सर्जरी मध्ये बेंबीजवळ व पोटात आजूबाजूला दोन चिरा लावण्यात येतात ते पाच मिली.मी. इतके लहान असतात. आतडे चिपकण्याचे प्रमाण हे क्वचितच असते. हॉस्पिटलमधील स्टे खूप कमी असतो.

अँपेंडिक्सच्या ऑपरेशन मध्ये भूल कोणत्या प्रकारची दिली जाते ?

भूल देणे हे भूलतज्ज्ञांवर  निर्भर असते तरी बाळाला पूर्ण भूल देऊनच सर्जरी केली जाते.

ऑपरेशन नंतर बाळाला काही त्रास होतो का ?

नाही. बाळाचा ऑपरेशन आधीचा त्रास कमी होतो.
काही वेळेस अपेंडिक्सचा त्रास हा संसर्ग कमी करण्याच्या औषधांनी कमी होऊ  शकतो परंतु हा काही कायमचा उपचार नसतो. काही वेळा करिता त्रास कमी होतो पण शेवटी अपेंडिक्स काढल्यावर त्याचा त्रास पूर्णपणे बरा होतो.

अपेंडिक्सचा संसर्ग होण्याचे काय कारण असते ?

अपेंडिक्स हा त्रास बऱ्याच कारणांमुळे होऊ शकतो.
अपेंडिक्सचे तोंड पूर्णपणे बंद झाल्यामुळे.
अपेंडिक्समध्ये बॅक्टेरिया वाढण्यास सुरुवात होते व त्यात पू (पस) तयार होतो.
अपेंडिक्समध्ये शी चा खडा तयार होतो.
आतड्यांचा संसर्ग झालेला असेल तर.
पोटाला मार लागलेला असेल तर.

लॅप्रोस्कोपी अपेंडिक्स ऑपरेशनचे कॉम्प्लिकेशन काय असतात ?

ऑपरेशन करणारा सर्जन जर कुशल असेल तर कॉम्प्लिकेशन चे प्रमाण खूपच कमी असते. रक्तस्त्राव ,आतड्यांना जखमा होणे, पोटात पसरणे असे कॉम्प्लिकेशन क्वचितच होतात.

          वरील सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला नक्की समजून आले असेल की अँपेंडिक्स चा त्रास हा जीवघेणा असतो आणि वेळेत उपचार योग्य तज्ज्ञांकडून घेतला की जीव व पैसा सुद्धा वाचवण्यात येऊ शकतो.

          तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कंमेंट मध्ये विचारू शकतात. लेख आवडला असेल तर इतरांना शेयर करा जेणेकरून कोणी अश्या अडचणीत असेल तर त्याला सुद्धा वरील माहितीचा फायदा होईल.

          Rate this post

          डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

          1 thought on “लहान मुलांमध्ये अँपेंडिक्सचा त्रास | Appendicitis in children in Marathi”

          Leave a Comment