घरामघ्ये लहान बाळ जन्माला आले की, घरातील सर्व मंडळी आनंदी असतात व नवजात बाळाची काळजी घेत असतात, पण बाळ जेव्हा जास्त रडण्यास (crying newborn care) सुरवात करते तेव्हा हेच सगळे घाबरून जातात. अश्या वेळेस घाबरून न जात बाळ कोणत्या कारणामुळे रडत आहे याचा शोध घेणे महत्वाचे असते .
बाळ बोलू शकत नसल्याने बाळाची रडणे हीच भाषा असते (Baby crying in marathi). अश्या वेळी बाळ विशिष्ट गोष्टींसाठी विशिष्ट प्रकारे रडण्यास सुरवात करते म्हणून घरातील सर्व मंडळींना हे प्रकार माहित असणे महत्वाचे आहे. बाळाचा जन्म जेव्हा होतो तेव्हा रडणे हेच शिकलेले असते तर चला मग जाणून घेऊया लहान बाळ कोणत्या कारणासाठी रडते ते.
10 Types of newborn baby crying
बाळाला भूक लागलेली असणे (Crying newborn care when hungry)
बाळ भुकेसाठी रडणे हे खूप सामान्य आहे आणि हे दिवसातून सात आठ वेळा होणारच अशा वेळेस बाळाला अंगावरचे दूध पाजल्यानंतर बाळाचे पोट भरते व बाळ शांतपणे झोपून जाते किंवा खेळण्यास सुरवात करते.
सामन्यात: दर दोन ते तीन तासांनी बाळाला आईचे दूध पाजणे महत्वाचे असते. जर आई बाळाला या वेळेप्रमाणे दूध पाजत असेल आणि बाळाला जर भूक लागली असेल तर अश्या रडण्याला हंगर क्राय म्हटले जाते. बाळाला सुद्धा अश्या प्रकारे दूध प्यायची सवय लागते व बाळ क्वचितच भुकेसाठी रडते.
बाळाचे कपडे ओले असणे
बऱ्याच वेळी बाळ शांत असते व अचानक रडण्यास सुरवात करते अश्या वेळी बाळाचे कपडे तपासून घ्यावे. जर बाळाचे कपडे ओले असतील किंवा बाळाचा लंगोट ओला असेल तर बाळाला त्याचा त्रास होऊन बाळ रडण्यास सुरवात करते. लहान बाळाला त्याचे कपडे ओले असलेले कदापि आवडत नाही त्यामुळेच ते जोरजोरात रडण्यास सुरवात करते.
जरी डायपर लावलेले असेल तरी सुद्धा ते तपासून घ्यावे .बऱ्याचदा डायपर लीक झालेले असते किंवा लघवीमुळे डायपर ओले होऊन वजनदार होते व त्यामुळे बाळाला त्रास होतो व बाळ रडण्यास सुरवात करते.
बाळाच्या पोटात वायू (गॅस) झालेला असणे (Evening colic in marathi)
बऱ्याचदा असे दिसून येते की संध्यकाळ झाली की बाळ रडण्यास सुरवात करते. अश्या वेळेस आई वडिलांच्या अंगावर काटा येण्यास सुरवात होते कारण संघ्याकाळ नंतर रात्र येणार असते व बाळाने रडणे थांबले नाहीतर या विचाराने ते घाबरून जातात. अश्या वेळी वरील दोन्ही उपाय करून देखील बाळ रडणे थांबवत नसेल तर ते रडणे पोटात गॅस झाल्यामुळे असू शकते अश्या रडण्याला इव्हिनिंग कोलिक (evening colic in marathi) असे म्हटले जाते
कोलिकमध्ये बाळ न थांबता रडत असते व बाळाला कितीही शांत करण्याचा प्रयत्न करून देखील बाळ शांत होत नसेल तर अश्या वेळी आई वडिलांनी घाबरून न जाता बाळाला कढेवर घेऊन पाठीवर थोपटावे हे करून सुद्धा बाळ शांत राहत नसेल तर बाळाला गॅस कमी होण्याचे औषध द्यावे जर औषध नसेल तर बाळाला पोटावर झोपवून पाठीवर थोपटावे. त्यामुळे पोटातील गॅस बाहेर पडून बाळ रडणे थांबवते व बाळाला बरे वाटते (crying newborn care).
वरील सर्व उपाय करून सुद्धा बाळ रडणे थांबत नसेल तर आपल्या बालरोगतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.
आईचे लक्ष्य बाळाकडे नसणे
बाळाची आई बऱ्याचदा बाळाला दूध पाजल्यानंतर बाळाला झोक्यात टाकते व कामाला लागते मग बाळ खेळण्यास सुरवात करते परंतु थोड्या वेळानंतर बाळाला कंटाळा आला की बाळ रडण्यास (baby crying in marathi) सुरवात करते.
हे रडणे असे असते की ,बाळ ५/६ सेंकंद रडते व १५/२० सेंकंद थांबते व परत असेच रडते. बाळाचे हे असे रडणे आईचे लक्ष्य केंद्रित करण्यासाठी असते अश्या वेळी बाळाला जवळ घेतल्याने बाळ शांत होते असे केल्याने बाळ व आई मधील बंध अजून घट्ट होतो..
बाळाला सर्दी झालेली असणे
बाळाला जेव्हा सर्दी झालेली असते तेव्हा बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असतो. म्हणून बाळ चिडचिड करू लागते व रडण्यास (baby crying in marathi) सुरवात करते. सर्दीमुळे बाळाच्या नाकात शेंबूड अडकलेला (नेझल ब्लॉक) असू शकतो अश्या वेळेस बाळाच्या दोन्ही नाकपुड्यांमध्ये सलाइनचे ड्रॉप टाकणे आवश्यक असते.
ड्रॉप टाकल्यामुळे बाळाचे नाक स्वच्छ होते व बाळाचा त्रास कमी होतो व बाळ खेळण्यास सुरवात करते. पण बाळाला सर्दी बरोबर ताप असेल तर बालरोग तज्ज्ञाचा सल्ला घेणे महत्वाचे असते.
बाळाला गरम ( उकाळा ) होत असेल तर
बऱ्याचदा बाळाला आंघोळ झाल्यानंतर कपड्यामध्ये गुंढाळून ठेवले जाते.आंघोळ झालेली असल्याने बाळाला ताजेतवाने वाटत असल्याने बाळ झोपून जाते.
परंतु जेव्हा २/३/ तासांनी बाळाला जाग येते तेव्हा त्या गुंढाळलेल्या कपड्यांचा बाळाला त्रास होऊ लागतो व बाळ रडण्यास सुरवात करते बऱ्याचदा बाळाला मोकळे ठेवलेले आवडते.
ऋतू बदलानुसार बाळाला पोशाख घालणे जरुरीचे असते.उन्हाळ्यात बाळाला हलके व मऊ,सुटसुटीत कपडे घालावे व हिवाळ्यात बाळाला थंडी वाजू नये म्हणून सुती कपडे घालावे.
बाळाला शी करण्यास त्रास होत असेल
बऱ्याचदा काही बाळ ३/४ दिवस शी करत नाही ही गोष्ट सामान्य असते. परंतु बाळाला जर कडक शी होत असेल तर बाळ शी करतांना कण्हते व बाळाला त्यामुळे खूप त्रास होतो आणि बाळ रडायला सुरवात करते जर ही समस्या वारंवार होत असेल तर बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
लहान बाळांमध्ये बद्धकोष्टतेचे प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढत आहे. बऱ्याचदा याचे कारण हे जास्त प्रमाणात बाळाला दूध पाजणे हे असते. सहा महिन्यानंतर बाळाला जास्त प्रमाणात पाणी पाजणे तसेच liquid डाएट देणे फार महत्वाचे असते. असे केल्याने बाळाला कडक शी होण्याचा त्रास हा क्वचितच होतो.
बाळाला थकवा आला असेल
बाळाला बऱ्याचदा आपण पाठीवर थोपटत असतो. त्यामुळे पण बाळाची पाठ दुखू शकते. तसेच बाळ दिवसभर खेळत असते, हातपाय चालवत असते त्यामुळे बाळाला थकवा येतो. म्हणून बाळ रडायला (baby crying in marathi) लागते. अश्या वेळेस बाळाला घेऊन फिरण्याने बाळ शांत होते.
बाळाचा नियमित मसाज केल्याने बाळाला फ्रेश वाटत असते त्यामुळे ज्या दिवशी बाळ जास्त प्रमाणात रडत असेल अश्या वेळेस बाळाच्या पायांची तसेच डोक्याची हलक्या हाताने मालिश केल्याने बाळ शांतपणे झोपून जाते.
बाळाला कंटाळा आला असेल
बाळ बऱ्याचदा एका ठिकाणी खेळत असेल तर बाळाला कंटाळा येतो व बाळ रडायला लागते (baby crying in marathi) अश्या वेळेस बाळाला जागा बदल हवी असते किंवा बाळाशी काही गोष्टी केल्याने बाळ शांत होते. बाळाला सुद्धा मोठ्या माणसाप्रमाणे मनोरंजन हवे असते.
बाळाला नवीन वस्तू तसेच नवीन जागा पाहण्यास आवडत असते अश्या वेळेस पालकांनी बाळाला गडद रंगाच्या वस्तू तसेच इतर ठिकाणी फिरवल्यास ते शांत होते.
बाळाला संसर्ग झालेला असेल
बाळ बऱ्याचदा जोरजोरात रडते व शांत पडून राहते व बाळ दूध सुद्धा पीत नाही बाळाला जर संसर्ग झालेला असेल तर ते सुस्त पडलेले असते व बाळाला वारंवार ताप येत असतो. बाळाचा ताप जर १०० पेक्षा जास्त असेल तर लगेच बाळाला तापाचा ड्रॉप द्यावा. अश्या वेळेस आपणास बालरोग तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक असते.
वरील सर्व गोष्टी अभ्यासल्यानंतर तुम्हाला नक्कीच असे समजावून येईल की तुमचे बाळ कोणत्या गोष्टीसाठी रडत होते जर तुम्हाला तुमच्या बाळाचे रडणे (crying newborn care) समजले तर तुम्ही तुमच्या बाळाचे हुशार पालक आहात व तुम्ही योग्य वेळी योग्य उपचार करून तुमच्या बाळाला नक्की शांत करू शकतात.
1 thought on “10 टिप्स नवजात बाळ रडत असेल तर | Best Crying Newborn Care”