नवजात बाळामध्ये बेंबीवर गाठ | Umblical Granuloma in Newborn Baby

Umblical Granuloma in Newborn Baby : बाळ जन्माला आल्यावर काही वेळेस बाळाच्या बेंबीवर अम्बलाइकल ग्रॅनुलोमा तयार होत असतो. चला तर मग जाणून घेऊया अम्बलाइकल ग्रॅनुलोमा असल्यावर काय काळजी घेतली पाहिजे.

अम्बलाइकल ग्रॅनुलोमा काय असतो ? (What is umblical granuloma in newborn baby?)

आईच्या पोटात असताना लहान बाळ हे आईशी नाळेने जोडलेले असते या नाळेतून बाळाला अन्न पुरवठा होत असतो. जन्म झाल्यावर बाळाच्या नाळेचा दोन ते तीन सेंटीमीटर भाग ठेवून उर्वरित भाग कॅलॅम्प लावून कापण्यात येतो हा नाळेचा भाग कोरडा पडून  निघून जातो. बऱ्याचदा  कोरडा झालेला नाळेचा  भाग पडल्यानंतर काही वेळेस काही भाग शिल्लक राहून जातो त्याला अम्बलाइकल ग्रॅनुलोमा असे म्हणतात.

अम्बलाइकल ग्रॅनुलोमा हा बेंबीवर लाल गाठ सारखा भाग दिसतो. त्यामुळे बेंबीवर सामान्य त्वचा तयार होऊ शकत नाही व त्यातून घाण सुद्धा बाहेर येत असते त्यामुळे बाळाला काही त्रास होत नसतो परंतु त्या ठिकाणी संसर्ग तयार होऊ नये म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असते.

सामान्यतः बाळाच्या बेंबीची व्यवस्थित काळजी घेतली ,स्वच्छता ठेवली तर हा भाग आपोआप एक आठवड्यात निघून जातो .जर अम्बलाइकल ग्रॅनुलोमा कमी होत नसेल व त्यातून रक्त बाहेर येत असेल तर आपल्या संबंधित डॉक्टरांशी संपर्क करावा.

अम्बलाइकल ग्रॅनुलोमा होण्याचे कारण काय असते ?

अम्बलाइकल ग्रॅनुलोमा होण्याचे कारण काही स्पष्ट नसते, बऱ्याचदा जर बाळाच्या नाळेने पडण्यासाठी जास्त वेळ घेतला तर अम्बलाइकल ग्रॅनुलोमा होऊ शकतो .त्या जागेवर ओलसरपणा राहिल्याने सुद्धा अम्बलाइकल ग्रॅनुलोमा होऊ शकतो.

अम्बलाइकल ग्रॅनुलोमा चे लक्षणे काय असतात ?

 1. बेंबीवर गुलाबी रंगाचा कोंब दिसून येणे.
 2. बेंबीच्या आजूबाजूला लालसरपणा येणे.
 3. बेंबीतून रक्त व पस बाहेर येणे.
 4. बेंबीतून चिकट द्रव्य बाहेर येणे.
 5. बेंबीला संसर्ग झालेला असेल तर ताप येत असतो.

अम्बलाइकल ग्रॅनुलोमामुळे बाळाला काही त्रास होतो का ?

अम्बलाइकल ग्रॅनुलोमामुळे बाळाला काहीच त्रास होत नाही कारण ते न दुखणारे असते व त्यामुळे जीवाला धोका नसतो. परंतु अम्बलाइकल  ग्रॅनुलोमाचा उपचार घेणे महत्त्वाचे असते. कारण त्या ठिकाणी सूज येऊ शकते किंवा संसर्ग सुद्धा होऊ शकतो. पुढील कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी वेळेवर उपचार करणे महत्त्वाचे असते.

अम्बलाइकलचे ग्रॅनुलोमा कॉम्प्लिकेशन काय असतात ?

क्वचितच जेव्हा अम्बलाइकल ग्रॅनुलोमा बरा होत नाही त्यावेळी त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात.

 • बेंबीतून रक्तस्त्राव होणे,
 • बेंबीच्या आजूबाजूला सूज येणे,
 • बेंबीतून घाण पाणी बाहेर पडणे

या प्रकारचे कॉम्प्लिकेशन दिसून येतात.

अम्बलाइकल ग्रॅनुलोमाचे उपचार काय असतात?

अम्बलाइकल ग्रॅनुलोमासाठी बऱ्याचदा उपचारांची गरज पडत नाही पण जर तो कोरडा होऊन पडत नसेल तर उपचारांची गरज पडते.

1)  काही वेळेस सिल्व्हर नायट्रेट किंवा लिक्विड नायट्रोजन चा वापर करून तो कोरडा होतो व पडून जातो.

2)  टाक्यांनी बांधून काढून टाकणे.

अम्बलाइकल  ग्रॅनुलोमाच्या बेसला टाक्याने बांधून गाठ मारली जाते त्यामुळे तेथील रक्तपुरवठा बंद होतो व तो कोरडा होऊन पडून  जातो.

3} छोटे ऑपरेशन करून काढून टाकणे .

सर्जन डॉक्टर अम्बलाइकल ग्रॅनुलोमाच्या बेस जवळून कापून काढून टाकतात व बेसला जाळतात. त्यामुळे त्यातून रक्तस्राव होत नाही. यात बाळाला जास्त त्रास होत नाही.

बाळाला अम्बलाइकल ग्रॅनुलोमा असेल तर काय काळजी घेणे आवश्यक असते ?

 • बाळाची आंघोळ केल्यानंतर बाळाची बेंबी कोरडी होऊ देणे लगेच बाळाला डायपर लावू नये .
 • बाळाला हात लावण्याआधी किंवा बेंबी साफ करण्या आधी हात स्वच्छ धुणे महत्त्वाचे असते.
 • बाळाने सू किंवा शी केली असेल तर ती जागा लगेच स्वच्छ करून घेणे कारण त्यातून जंतू हे बेंबी जवळ जाऊन संसर्ग होऊ शकतो.
 • बाळाचे डायपर हे नेहमी बेंबीच्या खाली लावावे जेणेकरून लावलेली नाळ ओढली  जाणार नाही.
 • बाळाची बेंबी फक्त स्वच्छ पाण्याने साफ करावी.
 • बाळाची कोरडी पडलेली नाळ ओढून काढू नये. ती तशीच पडू द्यावी.
 • ज्या वेळी वर सांगितलेले कॉम्प्लिकेशन दिसून येतील तेव्हा लगेच आपल्या
 • बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते .

वरील संपूर्ण माहिती समजल्यावर अम्बलाइकल ग्रॅनुलोमा बद्दल तुमचे असलेले तुमचे भय नक्की कमी होईल व तुम्हाला योग्य तो उपचार तुमच्या बाळासाठी करता येईल. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेयर करा.

Rate this post

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

Leave a Comment