गोटी भोवती पीळ पडल्यास काय करावे | Testicular torsion in marathi

लहान मुलांमध्ये गोटी भोवती पीळ पडणे (Testicular torsion in marathi) ही एक प्रकारची धोक्याची घंटा असते. गोटी म्हणजे मुलाचे अंडाशय(टेस्टीस). परंतु बऱ्याचदा लहान मुले गोटीचे दुखणे आपल्या पालकांना सांगणे टाळतात तसेच काही वेळेस पालक सुद्धा दुर्लक्ष करतात त्यामुळे मुलाच्या गोटीला नुकसान वाढत राहते. अश्या स्थितीत योग्य वेळेत योग्य उपचार मिळाला तर बाळाची गोटी वाचवता येते.

चला तर मग जाणून घेऊया गोटी (Testis in marathi) भोवती पीळ पडण्याची कारणे व त्याचा योग्य उपचार काय असतो. सर्वप्रथम आपल्याला गोटी व त्याभोवती असेलेली शरीररचना माहित असणे महत्वाचे असते.

टेस्टीस म्हणजे काय? (Testis in marathi)

टेस्टीस (गोटी) म्हणजे पुरुषाचे अंडाशय असते ज्यामध्ये प्रजननासाठी आवश्यक शुक्राणू तयार होत असतात. तसेच पुरुषातील टेस्टोस्टेरॉन हार्मोन सुद्धा तयार होत असतो. टेस्टीस ची जागा लिंगाच्या खाली असलेल्या थैलीत असते ज्याला स्क्रोटम असे म्हणतात.

सामान्यतः एका पुरुषामध्ये दोन टेस्टीस असतात. स्क्रोटम चे तापमान शरीराच्या तापमानापेक्षा १ ते २ डिग्री सेंटीग्रेट ने कमी असते. याचे मुख्य कारण म्हणजे हे तापमान शुक्राणू तयार होण्यासाठी आवश्यक असते. टेस्टीस हे पोटाशी स्पेर्मटिक कॉर्ड ने जोडलेले असते. स्पेर्मटिक कॉर्ड मध्ये टेस्टीस ला रक्तप्रवाह पुरवणाऱ्या रक्तवाहिन्या तसेच टेस्टीस पासून वीर्य वाहून नेणारी नळी असते. या नळीला व्हास डिफरंन्स असे म्हणतात.

टेस्टिक्युलर टॉर्शन म्हणजे काय असते? (Testicular torsion in marathi)

ज्यावेळेस स्पेर्मटिक कॉर्ड स्वतःभोवती फिरत असते म्हणजे त्याला पीळ पडत असतो त्यामुळे टेस्टीस सुद्धा स्वतःभोवती फिरते यालाच टेस्टिक्युलर टॉर्शन (Testicular torsion in marathi) असे म्हणतात. स्पेर्मटिक कॉर्ड ला पीळ पडल्याने टेस्टीस चा रक्तप्रवाह थांबतो व त्यामुळे त्या जागेवर खूप प्रमाणात दुखून येत असते व सूज सुद्धा येत असते.

टेस्टिक्युलर टॉर्शन (Testicular torsion in marathi) हे वयाच्या १२ ते १८ वर्षांमध्ये सामान्यपणे दिसून येत असते. परंतु ते वयाच्या कोणत्याही वर्षी व चक्क जन्माआधी सुद्धा होऊ शकते. टेस्टिक्युलर टॉर्शन ही एक प्रकारची इमर्जन्सी असते ज्यामध्ये लवकरात लवकर ऑपरेशन केल्याने टेस्टीस वाचवता येऊ शकते.

टेस्टिक्युलर टॉर्शन मध्ये वेळेवर उपचार घेणे का महत्वाचे असते?

टेस्टिक्युलर टॉर्शन (Testicular torsion in marathi) मध्ये वेळेवर उपचार न घेतल्यास टेस्टिसचे कायमचे नुकसान होत असते कारण टेस्टीस चा रक्तप्रवाह स्पेर्मटिक कॉर्ड ला पीळ पडल्याने थांबून जातो.

१) जर टेस्टीस दुखण्याच्या ६ तासाच्या आत उपचार घेतला तर ९० टक्के टेस्टीस वाचण्याची शक्यता असते.

२) जर टेस्टीस दुखण्याच्या १२ तासानंतर उपचार घेतला तर ५० टक्के टेस्टीस वाचण्याची शक्यता असते.

३) जर टेस्टीस दुखण्याच्या २४ तासानंतर उपचार घेतला तर १० टक्के टेस्टीस वाचण्याची शक्यता असते.

अशामुळे या आजारात वेळ हा फार महत्वाचा असतो. पालकांनी आपल्या मुलाच्या दुखण्याकडे नीट लक्ष दिले तसेच वेळेवर उपचार करण्यासाठी योग्य हॉस्पिटलमध्ये नेल्याने,मुलाच्या टेस्टीस ला होणारे नुकसान वाचवण्यात येऊ शकते.

टेस्टिक्युलर टॉर्शन होण्याचे काय कारणे असतात?

पालकांनी टेस्टिक्युलर टॉर्शन होण्याची कारणे (Reasons of testicular torsion in marathi) जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

१) अनुवंशिकता

सामान्यतः टेस्टीस च्या आजूबाजूला ट्युनिका व्याजायनालीस नावाचे आवरण असते. या आवरणामुळे टेस्टीस स्वतःभोवती फिरू शकत नाही. काही मुलांमध्ये आनुवंशिकतेमुळे टेस्टीस भोवती असलेलं आवरण स्पेर्मटिक कॉर्ड पर्यंत असते. त्यामुळे टेस्टीस त्या आवरणात मुक्तपणे फिरू शकते. हे फिरणे घंटेसारखे असते म्हणून या परिस्थितीला बेल क्लॅपर डिफॉर्मिटी असे म्हणतात.

टेस्टीस हे मुक्तपणे फिरत असल्याने ही परिस्थिती असलेल्या मुलांमध्ये टेस्टिक्युलर टॉर्शन (Testicular torsion in marathi) होण्याचे प्रमाण ९० टक्के असते. टेस्टिक्युलर टॉर्शन कुटुंबामध्ये पिढी दार पिढी तसेच भावंडांमध्ये दिसून येऊ शकते. याचे कारण बेल क्लॅपर डिफॉर्मिटी तर असते पण दुसरे कारण काही स्पष्ट नसते.

२) जर कुटुंबामध्ये कोणाला आधी टेस्टिक्युलर टॉर्शन झालेले असेल तर नंतर कुटुंबातील इतर व्यक्तीला सारखा त्रास झाला तर लवकरात लवकर उपचार घेणे फार महत्वाचे असते कारण ते टेस्टिक्युलर टॉर्शन असू शकते.

३) टेस्टिक्युलर टॉर्शन हे केव्हाही होऊ शकते. चक्क जन्माआधी, झोपेत असतांना, तसेच अवजड काम केल्याने सुद्धा टेस्टिक्युलर टॉर्शन होऊ शकते.

४) खेळ खेळात असतांना जांघेत मार लागल्याने टेस्टिक्युलर टॉर्शन होऊ शकते.

५) मुलगा तारुण्यात येत असतांना टेस्टीस ची वाढ वेगाने होत असते अश्या वेळेस सुद्धा टेस्टिक्युलर टॉर्शन होण्याची शक्यता असते.

६) हिवाळ्यात मुलगा ज्या वेळेस अंथरुणात झोपलेला असतो त्या वेळी स्क्रोटम चे स्नायू सैल असतात. जेव्हा मुलगा अंथरुणातून उठतो त्यावेळेस त्याच्या स्क्रोटम चे स्नायू बाहेरील थंड वातावरणामुळे आकुंचन पावतात व त्यामुळे स्पेर्मटिक कॉर्ड स्वतःभोवती फिरते व टेस्टीस ला सुद्धा पिल पडतो.

७) नवजात बाळामध्ये टेस्टिक्युलर टॉर्शन दिसून आले तर टेस्टीस ला पूर्णपणे नुकसान झालेले असते. परंतु अश्या वेळेस दुसरी टेस्टीसला टेस्टिक्युलर टॉर्शन होण्यापासून वाचवण्यासाठी ऑपरेशनची गरज पडते व त्यामुळे भविष्यात त्या बाळाची प्रजननासंबंधी समस्या कमी होऊ शकते.

टेस्टिक्युलर टॉर्शन ची लक्षणे काय असतात?

टेस्टिक्युलर टॉर्शनचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे अचानक व तीव्र प्रमाणात स्क्रोटम मध्ये दुखून येणे तसेच टेस्टीस वर सूज येणे हे असते. तसेच ज्या बाजूच्या टेस्टीस वर सूज आलेली असते ती बाजू काळी निळी पडलेली असते.

सामान्यतः टेस्टिक्युलर टॉर्शन हे एका बाजूला होत असते. टेस्टिक्युलर टॉर्शन जास्तकरून डाव्या बाजूला उजव्या बाजूपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येत असते. २ टक्के मुलांमध्ये टेस्टिक्युलर टॉर्शन दोन्ही बाजूला होऊ शकते. तसेच खालील लक्षणे सुद्धा दिसून येतात

  • मळमळ होणे
  • उलटी होणे
  • ताप येणे
  • स्क्रोटम मध्ये गाठ वाटणे
  • चक्कर येणे
  • वीर्यात रक्त येणे

अचानक टेस्टीस मध्ये दुखून (Testicular pain in marathi) आल्याने त्वरित उपचार घेणे फार महत्वाचे असते. हे दुखून येण्याचे कारण विर्याच्या नळीत संसर्ग झाल्याने असू शकते. दुखण्याचे कारण स्पष्ट नसल्याने डॉक्टरांचा सल्ला घेणे व आजाराचे योग्य वेळेत निदान होणे फार महत्वाचे असते. वेळेत उपचार घेतल्याने मुलाचे अंडाशय वाचण्यात येत असते.

काही वेळेस मुलाला टेस्टीस मध्ये दुखून येते व काही वेळाने बंद होते याचे मुख्य कारण म्हणजे टेस्टीस स्वतः भोवती फिरते परंतु काही वेळात सामान्य जागेवर येत असते याला इंटरमिटंट टॉर्शन व डीटॉर्शन असे म्हणतात. अश्या वेळेस जरी त्रास कमी झालेला असला तरी डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे असते. कारण त्या टेस्टीस ला पुन्हा पीळ पडू शकतो.

त्यामुळे नशिबाने मिळालेल्या वेळेत उपचार घेणे फार योग्य असते. लहान मुलांमध्ये बऱ्याचदा रात्री झोपेत तसेच सकाळी स्क्रोटम मध्ये दुखून येणे हे टेस्टिक्युलर टॉर्शन असू शकते.

टेस्टीस मध्ये दुखून आल्यावर काय समस्या होऊ शकतात?

दरवेळेस टेस्टीस मध्ये दुखून येणे (testicular pain in marathi) म्हणजे टेस्टिकलर टॉर्शन नसते. परंतु योग्य निदान झाल्याशिवाय दुखणे कशामुळे आहे हे समजत नसते. परंतु हे दुखणे टेस्टिक्युलर टॉर्शन मुळे असेल तर टेस्टीस ला धोका असतो. म्हणून वेळेवर उपचार होणे फारच महत्वाचे असते.

१) बऱ्याचदा टेस्टीसला पीळ पडल्यानंतर तो पीळ स्वतः सुटत नाही म्हणून तो पीळ सुटण्याची वाट पाहत बसले तर टेस्टीस चे जास्त प्रमाणात नुकसान होते.

२) जर टेस्टीस ला पडलेला पीळ सुटून टेस्टीस सामान्य जागेवर आली तरी भविष्यात त्या टेस्टीसला पीळ पडण्याची शक्यता असते.

३) काही वेळेस पडलेला पीळ सुटत असतांना तो पूर्णपणे सुटत नसतो त्यामुळे दुखणे जरी कमी झालेले असेल तरी टेस्टीस चे नुकसान वाढतच राहते.

४) पीळ पडणे व सुटणे यामध्ये सुद्धा टेस्टीस ला इजा होऊ शकते.

५) जेव्हा एका बाजूच्या टेस्टीस ला पीळ पडत असतो त्यावेळी दुसऱ्या टेस्टीस ला सुद्धा पीळ पडण्याचा धोका असतो.

वरील सर्व गोष्टी माहीत असणे फार महत्वाचे असते कारण अश्या परिस्थितीत योग्य उपचार घेतला तर भविष्यातील पुढील समस्या टाळता येऊ शकतात.

टेस्टिक्युलर टॉर्शन चे निदान कसे करण्यात येते?

टेस्टिक्युलर टॉर्शन ही एक इमर्जन्सी असते त्यामुळे वेळेवर निदान व उपचार होणे फार महत्वाचे असते. डॉक्टर टेस्टिक्युलर टॉर्शन चे निदान रुग्णाला असलेल्या लक्षणांवरून व शारीरिक तपासणीवरून करतात.

  • क्रीमस्ट्रिक्स रेफ्लेक्स – या तपासणीमध्ये डॉक्टर त्रास असलेल्या जांघेच्या मधील बाजूस हॅमर फिरवतात सामान्यतः असे केल्याने त्या बाजूची टेस्टीस आकुंचन पावते. परंतु टेस्टिक्युलर टॉर्शन झालेले असेल तर हे आकुंचन दिसून येत नाही. डॉक्टर टेस्टिकलर टॉर्शन चे निदान निश्चित करण्यासाठी खालील तपासण्या करण्यास सांगू शकतात परंतु शारीरिक तपासणी नुसार निदानाची पुष्टी झालेली असेल तर लगेच ऑपरेशनचा सल्ला सुद्धा देतात.
  • रक्ताची तपासणी – रक्तातील संसर्ग तसेच ऑपरेशनआधी आवश्यक अश्या तपासण्या करण्यात येतात.
  • लघवीची तपासणी – लघवीत संसर्ग झाला आहे का हे तपासण्यासाठी ही तपासणी करण्यात येत असते.
  • स्क्रोटम ची सोनोग्राफी/ कलर डॉपलर – टेस्टीस मधील रक्तप्रवाह समजून येण्यासाठी ही तपासणी करण्यात येते. रक्तप्रवाह जासृ कमी झालेला असेल तर ते टेस्टिक्युलर टॉर्शन असते.

टेस्टिक्युलर टॉर्शन चा उपचार काय असतो?

टेस्टिक्युलर टॉर्शन (Testicular torsion in marathi) ही एक प्रकारची इमर्जन्सी असते त्यामुळे वेळेत उपचार होणे फारच महत्वाचे असते. जर टेस्टीस दुखणे सुरु होण्याच्या 4-६ तासाच्या आत ऑपरेशन केले तर टेस्टीस वाचवता येऊ शकते. परंतु जेवढा वेळ वाढत जातो तेवढे टेस्टीस ला कायमचे नुकसान वाढत जाते.

काही वेळेस डॉक्टर मॅनुअली (हाताने) टेस्टीस चा पीळ सोडण्याचा प्रयत्न करतात. परंतु टेस्टीस ला पुन्हा पीळ पडू नये म्हणून ती टेस्टीस फिक्स करण्यासाठी ऑपरेशनची गरज पडतेच व स्पेर्मटिक कॉर्ड ला पीळ सोडवण्यासाठी व टेस्टीस एका जागेवर स्थिर करण्यासाठी टेस्टिकलर डीटॉर्शन व ऑर्किडपेकसी (Testicular detorsion and orchidopexy in marathi) हे ऑपरेशन करण्यात येत असते. हे ऑपरेशन मुलाला पूर्णपणे भूल देऊनच करण्यात येत असते.

ऑपरेशन आधी मुलाला उपाशी ठेवण्यात येत असते परंतु हे ऑपरेशन त्वरित करावे लागत असल्याने अश्या वेळी मुलाला लगेच ऑपरेशनला घेण्यात येऊ शकते. ऑपरेशन आधी मुलाला इंट्राकॅथ लावण्यात येत असतो त्यातून त्याला सलाईन तसेच दुखणे कमी होण्यासाठी इंजेक्शन देण्यात येत असतात.

भूल दिल्यानंतर सर्जन डॉक्टर खालील प्रमाणे ऑपरेशन करतात.

१) स्क्रोटम मध्ये चिरा मारून टेस्टीस ला पळलेला पीळ सोडवण्यात येतो.

२) पीळ सोडवल्यानंतर पुन्हा त्या टेस्टीस ला पीळ पडू नये म्हणून ती टेस्टीस स्क्रोटम ला फिक्स करण्यात येते.

३) दुसऱ्या नॉर्मल टेस्टीस चे नुकसान होऊ नये म्हणून ती टेस्टीस सुद्धा स्क्रोटम ला फिक्स करण्यात येते.

४) लवकरात लवकर म्हणजे १२ तासाच्या आत ऑपरेशन करण्यात आले तर टेस्टीस काही प्रमाणात वाचवण्यात येऊ शकते. परंतु या वेळेनंतर टेस्टीस पूर्णपणे नाश्ता झालेली असू शकते त्यामुळे ती सडून (गॅंगरिन झाल्याने) संसर्ग पसरण्याचा धोका असतो त्यामुळे ती टरेस्टीस संपूर्णपणे काढून टाकण्यात येते या ऑपरेशन ला ओर्चिडेक्टॉमी असे म्हणतात.

५) ऑपरेशन साठी जवळपास एक ते दिड तासाचा वेळ लागत असतो.

६) ऑपरेशन नंतर दुखणे कमी राहण्यासाठी इंजेक्शन देण्यात येतात.

७) स्क्रोटम वर असलेले टाके शक्यतो विरघळणारे असतात त्यामुळे ते काढण्याची गरज पडत नसते.

८) ऑपरेशन नंतर काही आठवडे (२-३ आठवडे) स्क्रोटम वर सूज राहत असते. ती सूज हळूहळू कमी होते. दिवसातून काही वेळेस बर्फाने शेकल्याने ती सूज कमी होण्यास मदत होते.

९) टाके असलेल्या भागातून काही वेळेस पाणी बाहेर येऊ शकते त्यामुळे त्या जागेची स्वछता ठेवणे फार महत्वाचे असते. ती जागा स्वच ठेवण्यासाठी तसेच संसर्ग टाळण्यासाठी कोमट पाण्याने ती जागा धुणे आवश्यक असते.

१०) ऑपरेशन नंतर काही आठवडे अवजड काम करणे टाळावे तसेच शारीरिक संबंध ठेवणे सुद्धा टाळावे.

११) काही प्रमाणात आराम करावा परंतु थोडी हालचाल केल्याने शरीरातील रक्तपुरवठा वाढतो त्यामुळे ऑपरेशनमुळे झालेली जखम लवकर भरून येते.

१२) नवजात शिशूमध्ये गर्भात असतांना टेस्टिक्युलर टॉर्शन झालेले असल्यास टेस्टीस पूर्णपणे नष्ट झालेली असते. परंतु दुसरी टेस्टीस वाचवण्यासाठी अश्या बाळांमध्ये ओर्चिडेक्टॉमी व ओर्चीडपेकसी (Orchidectomy and orchidopexy in marathi) हे ऑपरेशन करण्यात येत असते. त्यात नष्ट झालेली टेस्टीस काढून टाकण्यात येते व सामान्य असलेली टेस्टीस ही स्क्रोटम ला फिक्स करण्यात येते. त्यामुळे त्या टेस्टीस ला भविष्यात पीळ पडू शकत नाही.

टेस्टिक्युलर टॉर्शन मुळे काय समस्या होऊ शकतात?

टेस्टिक्युलर टॉर्शन मध्ये त्वरित उपचार न घेतल्याने खालील समस्या होऊ शकतात.

१) संसर्ग होणे – जर नष्ट झालेली टेस्टीस न काढल्याने त्या जागेवर संसर्ग तयार होत असतो व तो संसर्ग संपूर्ण शरीरात पसरतो व त्यामुळे जीवाला धोका वाढत असतो.

२) व्यंधत्व – जर दोन्ही बाजूच्या टेस्टीस ला पीळ पडला असेल तर व्यंधत्व येणे निश्चित असते व एका टेस्टीस ला पीळ पडला असेल तर दुसरी टेस्टीस सुरक्षित असल्याने प्रजनन क्षमता कमी होत नाही.

३) सौंदर्य विकृती – एक टेस्टीस काढून टाकल्याने मुलाला भावनिक अस्वथता जाणवू शकते. ही अस्वस्थता कमी करण्यासाठी त्या जागेवर कुत्रिम टेस्टीस ऑपरेशन करून लावण्यात येऊ शकते.

४) शुक्राणूंचे प्रमाण कमी होणे – टेस्टिक्युलर टॉर्शन मुळे टेस्टीस काढून टाकल्याने शुक्राणू तयार होण्याचे प्रमाण कमी होत असते. तसेच टेस्टीस चा रक्तप्रवाह बंद झाल्याने शरीर शुक्राणूविरुद्ध अँटीबॉडी तयार करत असते. त्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता कमी होत असते.

वरील संपूर्ण लेख वाचल्यानंतर तुम्हाला समजून आले असेल कि टेस्टिक्युलर टॉर्शन या आजारात वेळेचे फारच महत्व असते. त्यामुळे योग्य वेळेत योग्य निर्णय घेऊन योग्य उपचार झाला तर टेस्टीस वाचवता येऊ शकते.

टेस्टिक्युलर टॉर्शन (testicular torsion in marathi) चा लेख तुम्हाला आवडला असेल तर नाकी आपल्या मित्रांमध्ये शेयर करा जेणेकरून इमर्जन्सी च्या वेळेस त्यांना सुद्धा याचा फायदा होईल.

Rate this post

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

Leave a Comment