सिनारेस्ट टॅबलेट चे उपयोग | 4 Best Sinarest Tablet Uses in Marathi

सिनारेस्ट टॅबलेट हे सर्दीसाठी वापरण्यात येणारे औषध ( Sinarest Tablet Uses in Marathi) आहे. सिनारेस्ट टॅबलेट हे मेडिकल स्टोर वर सहजपणे उपलब्ध असते परंतु हे औषध डॉक्टर च्या प्रेस्क्रिप्शन वर भेटत असते. चला तर मग जाणून घेऊया सिनारेस्ट टॅबलेट विषयीची माहिती

Table of Contents

सिनारेस्ट टॅबलेट म्हणजे काय ? ( Sinarest Tablet in Marathi)

सिनारेस्ट टॅबलेट हे वाहणारे नाक म्हणजे सर्दीसाठी वापरण्यात येणारी गोळी आहे. सिनारेस्ट टॅबलेट सेंटॉर कंपनी ने तयार केलेले औषध आहे.

सिनारेस्ट टॅबलेट चे कन्टेन्ट काय आहे ? ( Content of Sinarest Tablet in Marathi)

सिनारेस्ट टॅबलेट मध्ये Phenylephrine, Chlorpheniramine maleate, पॅरासिटामोल हे औषध असते. प्रत्येक सिनारेस्ट टॅबलेट मध्ये खालीलप्रमाणे औषध असते.

sinarest tablet in marathi
Phenylephrine१० मिलिग्रॅम
Chlorpheniramine maleate२ मिलिग्रॅम
Paracetamol ५०० मिलिग्रॅम
 • सिनारेस्ट टॅबलेट हे रूम टेम्परेचर चा ठेवावे. फ्रिज मध्ये स्टोर करू नये.
 • लहान मुलांपासून सिनारेस्ट टॅबलेट ला दूर ठेवावे.
 • गोळी घेण्याआधी त्यावरील एक्सपायरी डेट नेहमी तपासून घ्यावी.

सिनारेस्ट टॅबलेट चे कार्य काय असते ? ( Action of Sinarest Tablet in Marathi)

सिनारेस्ट टॅबलेट मधील कन्टेन्ट चे कार्य खालीलप्रमाणे असते

 • Phenylephrine : Phenylephrine हे बंद झालेले नाक मोकळे करत असते व सर्दी मुळे तयार होणारा नाकातील चिकट पदार्थ कमी करत असते. हे औषध नाकात जमा झालेले चिकट पदार्थाला मोकळे करत असते त्यामुळे नाक बंद होण्याचे प्रमाण कमी होते.
 • Chlorpheniramine Maleate : Chlorpheniramine Maleate हे एक प्रकारचे अँटी अल्लेर्जिक औषध असते ज्यामुळे साडीत येणाऱ्या शिंकांचे प्रमाण कमी होत असते. Chlorpheniramine Maleate हे नाकातील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करत असते ज्यामुळे नाकातील सूज कमी होते.
 • Paracetamol : पॅरासिटामोल हे एक प्रकारचे अँटी पायरेटिक ( Anti-pyretic) म्हणजे ताप कमी करणारे औषध आणि यनलजेसिक ( Analgesic) औषध म्हणजे वेदना कमी करणारे औषध आहे.

सिनारेस्ट टॅबलेट घेतल्यानंतर त्याचे कार्य १५ ते २० मिनिटात चालू होत असते व ते काही तास काम करते. सिनारेस्ट टॅबलेट घेतल्यानंतर नाकातील अडथळा मोकळा होतो व नाकातील रक्तवाहिन्यांतील तणाव कमी होत असल्याने नाक दुखणे सुद्धा कमी होत असते.

सिनारेस्ट टॅबलेट चे उपयोग काय आहेत ? ( Sinarest Tablet Uses in Marathi)

सिनारेस्ट टॅबलेट सर्दी, ताप, वाहणारे नाक, अल्लेर्जीची सर्दी अश्या आजारात वापरात येत असते.

 • सर्दी : सर्दी मध्ये नाकातून पाणी वाहत असते तसेच जर नाकात संसर्ग तयार झालेला असेल तर शेम्बूल सुद्धा येत असतो. हा शेम्बूल नाकात जमा झाल्याने नाक बंद पडत असते व त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असतो. अश्या वेळेस बऱ्याचदा डोकेदुखी सुद्धा चालू होत असते व नाक बंद असल्याने रात्री झोप सुद्धा लागत नसते. अश्या वेळेस सिनारेस्ट टॅबलेट चा वापर रुग्णाला सर्दी कमी होण्यासाठी मदत करतो.
 • सर्दी व ताप : बऱ्याचदा सर्दी सोबत सुद्धा ताप येत असतो अश्या वेळेस सिनारेस्ट टॅबलेट चा वापर करण्यात येऊ शकतो कारण सिनारेस्ट टॅबलेट मध्ये पॅरासिटामोल हे औषध असते जे ताप कमी करण्यास मदत करत असते.
 • सर्दी व अंगदुखी : सर्दीमधे बऱ्याचदा रुग्णाला अंगदुखी चालू होत असते अश्या वेळेस सिनारेस्ट टॅबलेट मधील पॅरासिटामोल हे औषध अंगदुखी कमी करण्यास मदत करत असते. पॅरासिटामोल हे अंगदुखी साठी जबाबदार असणारे केमिकल कमी करण्यास मदत करत असते.
 • अल्लेर्जीची सर्दी : अल्लेर्जीच्या सर्दीमधे जास्त प्रमाणात शिंका येत असतात. याचे मुख्य कारण म्हणजे नाकात गेलेले परागकण, धूळ, धूर हे असू शकते. अश्या आजारात सुद्धा सिनारेस्ट टॅबलेट चा वापर करण्यात येऊ शकतो.

सिनारेस्ट टॅबलेट चा वापर हा डॉक्टर च्या सल्ल्यानेच करावा.

सिनारेस्ट टॅबलेट चे दुष्परिणाम काय असतात ? ( Side Effects of Sinarest Tablet in Marathi)

सिनारेस्ट टॅबलेट चे दुष्परिणाम प्रत्येक रुग्णात दिसून येत नाही परंतु काही रुग्णांमध्ये दिसून येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला यातील काही दुष्परिणाम दिसून आले तर ती गोळी घेणे टाळावे व लगेच आपली डॉक्टरांशी संपर्क करावा.

सिनारेस्ट टॅबलेट चे दुष्परिणाम हे खालीलप्रमाणे आहेत

 • मळमळ होणे
 • उलटी होणे
 • जास्त प्रमाणात झोप लागणे
 • डोकेदुखी वाढणे
 • अंगावर अल्लेर्जी येणे
 • थकवा येणे
 • भीती वाटणे

वरील कोणतेही लक्षण सिनारेस्ट टॅबलेट घेतल्यानंतर दिसले तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

सिनारेस्ट टॅबलेट चे डोस व कशी घ्यावी ? ( Sinarest Tablet Dosage in Marathi)

सिनारेस्ट टॅबलेट ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी. ही टॅबलेट पूर्णपणे गिळावी. सिनारेस्ट टॅबलेट चघळू नये, किंवा त्याची पावडर करू नये. सिनारेस्ट टॅबलेट ही जेवणानंतर किंवा जेवणाआधी घेतली तरी चालते. पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार गोळी वेळेत घेणे आवश्यक आहे.

मोठ्या माणसांमध्ये सिनारेस्ट टॅबलेट चा डोस एक गोळी दर ८ तासांनी घेऊ शकतात. परंतु डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

सिनारेस्ट टॅबलेट घेण्याआधी काळजी काय घ्यावी ? (Precaution Before Sinarest Tablet in Marathi)

 • प्रेग्नन्ट असतांना : जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सिनारेस्ट टॅबलेट घ्यावी कारण या गोळीने काही प्रमाणात झोप येत असते.
 • स्तनपान करतांना : स्तनपान करत असतांना सिनारेस्ट टॅबलेट घेऊ शकतात परंतु आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
 • मद्यपान केल्यानंतर : मद्यपान केल्यानंतर सिनारेस्ट टॅबलेट ही गोळी घेणे टाळावे कारण या गोळीमध्ये काही प्रमाणात झोप येणारे औषध असते व मद्य सुद्धा माणसाला झोपेस प्रवृत्त करत असते त्यामुळे मद्यपान केल्यानंतर सिनारेस्ट टॅबलेट घेणे टाळावे.
 • गाडी चालवण्याआधी : सिनारेस्ट टॅबलेट घेणे गाडी चालवायची असल्यास टाळावे कारण या गोळीत काही प्रमाणात झोप येणारे औषध असते.
 • किडनी विकार व लिव्हर विकार : तुम्हाला जर किडनीचा किंवा लिव्हर चा आजार असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सिनारेस्ट टॅबलेट घ्यावी. काही वेळेस डॉक्टर तुम्हाला तुमच्या आजाराच्या त्रिवतेनुसार गोळी चा डोस सांगू शकतात.

बऱ्याचदा विचारण्यात येणारे प्रश्न

सिनारेस्ट टॅबलेट सर्दीसाठी चांगली आहे का ?

सिनारेस्ट टॅबलेट चा वापर हा सर्दीसाठी होत असतो तसेच सर्दी सोबत जर ताप असेल तरी सुद्धा सिनारेस्ट टॅबलेट चा वापर तुम्ही करू शकतात.

सिनारेस्ट टॅबलेट मुलांमध्ये वापरली जाऊ शकते का ?

सिनारेस्ट टॅबलेट चा डोस जास्त असल्याने ती लहान मुलांमध्ये वापरणे टाळावे. लहान मुलांमध्ये सर्दीसाठी सिनारेस्ट सिरप चा वापर होऊ शकतो.

सिनारेस्ट टॅबलेट ने झोप येत असते का ?

सिनारेस्ट टॅबलेट मध्ये chlorpheniramine maleate हे कन्टेन्ट असते ज्यामुळे काही प्रमाणात झोप लागू शकते. परंतु सर्व रुग्णांमध्ये झोप लागेल असे सुद्धा नाही.

सर्दी कमी झाल्यावर सिनारेस्ट टॅबलेट घेणे थांबवले तर चालते का ?

जर तुमची सर्दी सिनारेस्ट टॅबलेट घेतल्यानंतर कमी झालेली असेल तसेच श्वास घेण्याचा त्रास सुद्धा कमी असेल तर तुम्ही सिनारेस्ट टॅबलेट घेणे थांबवू शकतात.

सिनारेस्ट टॅबलेट घेतल्यानंतर चक्कर येऊ शकतात का ?

सिनारेस्ट टॅबलेट घेतल्यानंतर काही रुग्णांमध्ये चक्कर येऊ शकतात अश्या वेळेस थोडं वेळ आराम करणे फार महत्वाचे असते व काही वेळाने बरे वाटायला लागले की नेहमीचे काम सुरु करू शकतात.

सिनारेस्ट टॅबलेट किती दिवस घेऊ शकतो ?

सिनारेस्ट टॅबलेट कमीत कमी २-३ दिवस घ्यावी परंतु तुम्हाला जर त्या गोळीने फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ल्ला अवश्य घ्यावा.

सिनारेस्ट टॅबलेट किती वेळात आपला असा दाखवण्यास सुरवात करते ?

सिनारेस्ट टॅबलेट २०-३० मिनिटात आपला असा दाखवण्यास सुरवात करते तसेच त्याचा असा ५ ते ६ तासांसाठी असतो.

सिनारेस्ट टॅबलेट अँटिबायोटिक सोबत घेऊ शकतो का ?

सिनारेस्ट व अँटिबायोटिक यांची एकमेकांशी काही इन्टेरॅक्शन नसते त्यामुळे सिनारेस्ट टॅबलेट सोबत अँटिबायोटिक घेऊ शकतो. नेहमी अँटिबायोटिक घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मासिक पाळी चालू असतांना सिनारेस्ट टॅबलेट घेऊ शकतो का ?

मासिक पाळी चालू असतांना सिनारेस्ट टॅबलेट घेऊ शकतो परंतु गोळी घेतल्याने काही त्रास झाला तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

Rate this post

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

Leave a Comment