लहान मुलांमध्ये कानाचा संसर्ग झाला तर | Otitis Media in Marathi

लहान मुलांमध्ये बऱ्याचदा कानाचा संसर्ग (Otitis media in marathi) होत असतो. जवळपास 75 टक्के मुलांमध्ये वयाच्या तीन वर्षापर्यंत कानाचा संसर्ग हा एकदातरी झालेला असतो. 

चला तर मग जाणून घेऊया कानात होणारा संसर्ग काय असतो ? कशामुळे होतो? त्याचे काय कॉम्प्लिकेशन असतात? व काय उपचार असतो?. 

Table of Contents

ओटायटिस मिडीया म्हणजे काय ? (What is otitis media in marathi?)

ओटायटिस मिडीया हे कानाच्या पडद्यामागील भागाचा संसर्ग असतो. ज्यामध्ये संसर्ग झाल्यामुळे पडद्यामागे पाणी जमा होत असते व ते पाणी कानाच्या पडद्यावर दबाव आणत असते. त्यामुळे कान दुखणे येत असतो. ओटायटिस मिडीया हे सर्दी, खोकला झाल्यानंतर किंवा अचानक होणाऱ्या वातावरण बदलामुळे होऊ शकते.

ओटायटिस मिडीयाचे प्रकार कोणते असतात ? (What are types of otitis media in marathi?)

ओटायटिस मिडीयाचे तीन प्रकार असतात हे प्रकार कानात होणाऱ्या संसर्ग ज्याप्रमाणे वाढतो त्याप्रमाणे पाडलेले आहेत.

अक्युट ओटायटिस मिडीया (Acute Otitis media)

ज्यावेळेस कानात संसर्ग कमी वेळात होतो. त्याला अक्युट ओटायटिस मिडीया असे म्हणतात. यात कानाच्या पडद्यावर सूज आलेली असते व तो लाल पडलेला असतो. कानाच्या पडद्यामागे पाणी जमा झाल्याने बाळाला ताप येतो. कान दुखणे येत असते. तसेच यामुळे बहिरेपणा सुद्धा येऊ शकतो.

ओटायटिस मिडीया विथ इफ्यूजन (Otitis media with effusion)

कानातील संसर्ग कमी झाल्यावर कानाच्या पडद्यामागे पाणी जमा होत राहते. त्यामुळे कान भरलेला वाटत असतो. तसेच यामुळे बहिरेपणा सुद्धा येऊ शकतो. याला ग्ल्यु इअर (Glue ear) असे सुद्धा म्हणतात.

क्रोनिक ओटायटिस मिडीया (Chronic Otitis media)

कानातील संसर्ग पूर्णपणे बरा होतो. तसेच कानातील पडद्यामागे पाणी वारंवार कमी-जास्त होत असते. यामुळे सुद्धा बाळाला बहिरेपणा येऊ शकतो.

ओटायटिस मिडीया होण्याची कारणे काय असतात ? (What are causes of otitis media in marathi?)

सामान्यता कानाचा मधला भाग हा युस्टेशिअन ट्यूब या नळीने नाकाशी जोडलेला असतो. युस्टेशिअन ट्यूब ही कानातील दबाव नियंत्रित करण्याचे काम तसेच कानातील जमा झालेले पाणी नाकामध्ये सोडण्याचे काम करत असते.

मुलाला जर सर्दी झालेली असेल,तर नाकामध्ये सूज येत असते. त्यासोबत युस्टेशिअन ट्यूब सुद्धा सुजलेली असते. त्यामुळे कानामधील पाणी नाकात जात नाही आणि तेथे विषाणू किंवा जीवाणू मुळे संसर्ग तयार होत असतो.

लहान मुलांमध्ये मोठ्या माणसांपेक्षा अधिक प्रमाणात कानाचा संसर्ग आढळून येतो कारण लहान मुलांची युस्टेशिअन ट्यूब ही लहान असते व आडवी असते. त्यामुळे बॅक्टेरिया कानात आरामात जाऊ शकतात व कानात संसर्ग तयार होत असतो.

  • लहान मुलांमध्ये प्रतिकार शक्ती सुद्धा कमी असते. त्यामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये कानाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असते.
  • घरात कोणाला कानाचा संसर्ग वारंवार होत असेल.
  • घरात कोणी धूम्रपान करत असेल.
  • बाटलीने दूध पिणाऱ्या बाळांमध्ये तसेच झोपून बाटलीने दूध पिल्याने सुद्धा कानात संसर्ग होऊ शकतो.
कान दुखणे

ओटायटिस मिडीया होण्याची लक्षणे काय असतात ? (What are symptoms of otitis media in marathi?)

मोठ्या माणसांमध्ये ओटायटिस मिडीयाची लक्षणे ही कानात दुखणे, कानात पाणी जमा होणे,बहिरेपणा येणे अशी असतात.

लहान मुलांमध्ये ओटायटिस मिडीयाची लक्षणे ही वेगवेगळी असतात.

  1. झोपल्यावर कान दुखणे.
  2. झोपण्यास त्रास होणे.
  3. जास्त प्रमाणात रडणे.
  4. ताप येणे.
  5. चालायला त्रास होणे.
  6. ऐकू येण्यासाठी त्रास होणे.
  7. डोके दुखणे येणे.
  8. भूक न लागणे.

 लहान मुलांमध्ये या लक्षणांसोबत सर्दी, खोकला, घसादुखी सुद्धा असते.

ओटायटिस मिडीयाचे निदान कसे करण्यात येते ? (How otitis media is diagnosed?)

ओटायटिस मिडीयाचे निदान हे मुलाच्या लक्षणांवरून डॉक्टर करत असतात. तसेच हे निदान निश्चित करण्यासाठी खालील तपासणी करण्यात येते.

  • ओटोस्कोपी (Otoscopy) –  लहान मुलांचा कान तपासण्यासाठी डॉक्टर ओटोस्कोपीचा वापर  करतात. कानामध्ये आलेला लालसरपणा, सूज ,रक्त, कानात जमा झालेले पाणी, कानाच्या पडद्याची तपासणी करण्यात येते.
  • टीम्पॅनॉमेट्री (Tympanometry) – या तपासणीमध्ये बाळाच्या कानातील दबाव मोजण्यात येत असतो.
  • रिफ्लेक्टोमेट्री (Reflectometry) – या तपासणीमध्ये असे इन्स्ट्रुमेंट वापरण्यात येत असते जे बाळाच्या कानाजवळ आवाज करत असते त्यामुळे जर बाळाच्या कानात पाणी जमा झाले असेल तर तो आवाज पुन्हा ऐकू येऊ शकतो. त्यामुळे ओटायटिस मिडीयाचे निदान  यांचे निदान होते.
  • हिअरिंग टेस्ट (Hearing Test) – बाळाला बहिरेपणा तर आला नाही हे तपासण्यासाठी ही तपासणी करण्यात येत असते.

ओटायटिस मिडीयाचा उपचार काय असतो ? (What is treatment of otitis media in marathi?)

प्रामुख्याने ओटायटिस मिडीया हा संसर्ग अँटिबायोटिकचा वापर न करता बरा होत असतो. त्यामुळे बरेचदा डॉक्टर दुखणे बंद होण्यासाठी औषधी देत असतात. यामुळे अँटिबायोटिक्स भरपूर प्रमाणात वापर टाळण्यात येतो व त्यांचे होणारे दुष्परिणाम सुद्धा टाळण्यात येतात.

कानाचे दुखणे कमी होण्यासाठी कानात टाकण्यासाठी ड्रॉप देण्यात येतो किंवा औषध देण्यात येते जर हे करून सुद्धा बाळाचे कानातील दुखणे बंद होत नसेल तर डॉक्टर बाळाला अँटीबायोटिक औषधे देतात. त्यामुळे कानातील संसर्ग कमी होण्यास मदत होते.

रुमाल ओला करून कानाला लावला तरीसुद्धा बाळाचा कान दुखण्याचा त्रास कमी होतो.

जर कानातील पाणी तीन महिन्यात कमी झाले नाहीतर डॉक्टर कानाच्या पडद्याचे ऑपरेशन करण्यास सांगू शकतात. या ऑपरेशन मध्ये कानाच्या पडद्याला छिद्र पाडले जाते व त्यातील पाणी त्यामुळे निघून जाते व कानातील दबाव सुद्धा कमी होतो व छिद्र केलेल्या ठिकाणी एक छोटी नळी ठेवण्यात येते जेणेकरून कानामध्ये पाणी जमा होणार नाही व कानातील दबाव नियंत्रित राहील. या ऑपरेशनला मायरिंगोटॉमी (Myringotomy) असे म्हणतात.

कानातील पाणी निघाल्यानंतर बाळाला नीट ऐकू येते व पडद्याच्या छिद्रात टाकलेली नळी ही आपोआप सहा ते बारा महिन्यात निघून जाते .

काही मुलांमध्ये नाकातील अडेनोईडस (Adenoids) वारंवार सूज येत असल्याने व संसर्ग होत असल्याने युस्टेशिअन ट्यूब ही बंद होत असते. यामुळे अशा मुलांना ओटायटिस मीडियाचा त्रास वारंवार होत असतो. अशा मुलांमध्ये हे अडेनोईडस काढून टाकल्यावर वारंवार होणाऱ्या ओटायटिस मीडियाचा त्रास कमी होतो. अडेनोईडस काढून टाकण्याच्या ऑपरेशनला अडेनोईडक्टोमी (Adenoidectomy) असे म्हणतात.

वरील ऑपरेशन हे कान-नाक-घसा चे डॉक्टर (ENT Specialist) करतात. 

बरेचदा विचारण्यात येणारे प्रश्न

ओटायटिस मिडीयामुळे काय समस्या होऊ शकतात?

ओटायटिस मिडीयाचा त्रास हा बऱ्याचदा औषधाने कमी होतो परंतु काही मुलांमध्ये तो वारंवार होत असतो. अशा मुलांमध्ये खालील प्रकारच्या समस्या येऊ शकतात.

* बहिरेपणा येणे. 
* मेंदूमध्ये जंतूसंसर्ग होणे. याला मीनिंजायटिस असे म्हणतात.
* कानाच्या पडद्यामागील हाडाचा संसर्ग होणे. याला मॅस्टोयडीस असे म्हणतात.
* कानाचा पडदा फाटणे.
* ऐकू येत नसल्याने अशी मुले उशीरा बोलण्यास सुरुवात करतात.

ओटायटिस मिडीयाचा संसर्ग कशामुळे टाळता येऊ शकतो ?

काही गोष्टी योग्यरीत्या पाळल्या तर लहान मुलांमध्ये कानाचा संसर्ग नक्की टाळता येतो.

* मुलांचे हात वारंवार साबणाने धुतल्याने.
* गर्दीच्या जागेवर जाणे टाळल्याने.
* स्तनपान करणाऱ्या बाळांमध्ये कानाच्या संसर्गाचे प्रमाण कमी असते. 
* मुलांचे नियमित लसीकरण केल्याने. 
* घरात धूम्रपान टाळल्याने.

ओटायटिस मिडीयाचा संसर्ग  सामान्यत: कोणत्या बॅक्टेरिया मुळे होतो ?

ओटायटिस मिडीयाचा संसर्ग सामान्यत स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी, हिमोफिलस इन्फ्लुएंझी या बॅक्टेरिया मुळे होतो

ओटायटिस मिडीयाचा उपचार घेतला नाही तर काय होऊ शकते?

ओटायटिस मिडीयाचा उपचार घेतला नाही तर कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. तसेच तुमच्या मुलाची ऐकण्याची क्षमता कमी झाल्यामुळे त्याला बोलण्यास व भाषा समजण्यास खूप परेशानी हो

कानाच्या पडद्यामागील पाणी कसे कमी होते?

कानाच्या पडद्यामागील पाणी काही दिवसात शोषले जाते परंतु ते जर ३ महिन्यात शोशलके गेले नाही तर डॉक्टर ऑपरेशन चा सल्ला देऊ शकतात

5/5 - (1 vote)

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

Leave a Comment