नवजात बाळांमध्ये क्रॅडल कॅप | Cradle Cap in Marathi

घरात नवीन बाळ जन्माला आले की काही बाळांमध्ये टाळूवर पापडी (Cradle cap)दिसून येत असते., घरातील सर्वजण त्या बाळाची नीट काळजी घेतात तरी पण काही वेळेस आपल्या घरातील वृद्ध जुन्या चालीरीती सांगत असतात. त्या सर्व चालीरीती व्यर्थ असतात असे नाही परंतु काळानुसार आपल्याला काही नवीन गोष्टी माहीत पडत असतात. त्यामुळे आपण अशा चालीरिती पासून दूर राहिलेले बरे त्यातील एक म्हणजे टाळूवर खूप प्रमाणात तेल लावणे. अशाप्रकारे  तेल लावल्याने टाळू लगेच भरून जातो असा समज असतो. पण हे करत असतांना  टाळूवर फंगल इन्फेक्शन तयार होते. ह्या फंगल इन्फेक्शनला क्रॅडल कॅप असे म्हणतात. 

क्रॅडल कॅप म्हणजे काय? (What is cradle cap?)

क्रॅडल कॅपला इन्फेन्टाइल सेबोरीक डरमाटायटिस, क्रस्टा लॅक्टिया मिल्क क्रस्ट, हनिकोंब डिसिज म्हणून ओळखले जाते. क्रॅडल कॅपला म्हणजे एक प्रकारचा डॅन्डरफ (कोंडा) असतो जो बाळाच्या टाळूवर पापडी सारखा दिसतो. क्रॅडल कॅपला हे एक महिन्या खालील 10% बाळांमध्ये ,तीन महिन्या खालील 70% बाळांमध्ये व एक ते दोन वर्षानंतर 7% बाळांमध्ये दिसून येते. हा आजार पसरणारा नसतो.

क्रॅडलकॅपची लक्षणे काय असतात ? (What are symptoms of cradle cap?)

क्रॅडल कॅप मध्ये खालील प्रकारची लक्षणे दिसून येतात-

  • बाळाच्या पुढील टाळूवर पिवळा रंगाची पापडी तयार होते.
  • सुरुवातीला ही पापडी काही भागात तयार होते व नंतर एकमेकांना जोडून मोठी पापडी तयार होते. तयार झालेली पापडी ही कोरडी असते व ती न दुखणारी व न खाजणारी असते. बाळाच्या टाळूवर पापडी ज्यास्त प्रमाणात असेल तर त्याला ताप सुद्धा येत असतो.

मुख्यतः असे फंगल इन्फेक्शन(बाळाच्या टाळूवर पापडी) सुरुवातीच्या दोन ते सहा आठवड्यात दिसून येतात.

क्रॅडलकॅप होण्यामागची कारणे काय असतात ? (What are causes of Cradle cap?)

क्रॅडलकॅप तयार होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे जन्माआधी आईचे हार्मोन बाळाच्या शरीरात नाळेतून शिरतात. त्या हार्मोन्समुळे टाळूवरील त्वचेतील ग्रंथी खूप प्रमाणात तेल सोडतात त्यामुळे ते तेल हे त्वचेच्या dead cell ला चिपकून राहते व पिवळ्या रंगाची पापडी तयार होते.

टाळू म्हणजे काय ? (What is Fontanell?)

नवजात बाळाच्या कवटीमध्ये 14 प्रकारची हाडे असतात जेव्हा बाळ जन्माला येते त्यावेळी ती पूर्णपणे जोडलेली नसतात अश्या हाडांना जोडण्यासाठी टाळू तयार होत असतो. टाळू हा एक प्रकारचा मांसल जाड पडदा असतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा टाळू असल्यानेच बाळ आईच्या गर्भमार्गातून मार्गातून सहजपणे बाहेर येते. कारण या टाळूमुळे कवटीची हाडे लवचिकतेने दबतात. टाळू हा बाळाच्या डोक्यावर चार ठिकाणी असतो.

  • सर्वात मोठा बाळाच्या डोक्याच्या वरच्या बाजूला ज्याला फ्रंटल असे म्हणतात.
  • दुसरा मागील बाजूस ज्याला पोस्टरियर असे म्हणतात.
  • कानाच्या वरील भागात स्पिनायडल असे म्हणतात.
  • जबड्याच्या सांध्यांवरील भागात मॅस्टोइडल असे म्हणतात.

बाळाची वाढ जशी जशी होते तशी टाळूचे रूपांतर हाडांमध्ये होते. मागील हाडाचा टाळू तीन महिन्यात कान व जबड्या जवळील टाळू सहा महिन्यात तसेच सर्वात मोठा पुढील टाळू 12 ते 18 महिन्यापर्यंत भरतो. टाळू भरून येणे ही नैसर्गिक प्रक्रिया असते. बाळाच्या शरीरातील कॅल्शियम तसेच हार्मोन्समुळे टाळू हा भरून येत असतो.

क्रॅडल कॅपचा काय उपचार असतो ? (What is treatment of cradle cap?)

क्रॅडलकॅप ही आपोआप कमी होत असते. काही वेळेस ते कमी होण्यासाठी उपचाराची गरज पडत नाही पण जर क्रॅडलकॅपचा खूप जास्त प्रमाणात असेल तर उपचारांची गरज पडते.

क्रॅडल कॅपचा उपचार खालील पद्धतीने करता येतो.

  • शाम्पूचा वापर- बाळाच्या डोक्यावरील केस हे आठवड्यातून तीन वेळेस अँटी फंगल शाम्पूने धुवावे.
  • टाळूवरून पापडी पूर्णपणे काढण्याचा प्रयत्न करू नये जो भाग निघण्यासारखा असेल तर तो ब्रशने काढू शकतात.
  • बाळाची आंघोळ घातल्यानंतर टाळूवर पेट्रोलियम जेली किंवा थोड्या प्रमाणात  बेबी ऑइल लावू शकतात .जास्त प्रमाणात तेल लावू नये त्यामुळे तेथील फंगल इन्फेक्शन अधिक वाढते.
  • स्टिरॉइड क्रीम हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लावावे. शक्यतो वरील सर्व काळजी घेतली तर याची गरज देखील पडत नाही.

क्रॅडल कॅपमुळे काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात ? (What are complications of cradle cap?)

क्रॅडल कॅपमुळे क्वचितच कॉम्प्लिकेशन होतात.

  • आजूबाजूची त्वचा लालसर पडणे.
  • टाळूवरून पापडीमुळे बाळ खूप चिडचिड करणे.
  • फंगल इन्फेक्शन तोंडावर पसरत असेल तर
  • जर बाळाला डायपर रॅश येण्यास सुरुवात झाली असेल तर
  • जर बाळाच्या तोंडात पांढऱ्या रंगाचे चट्टे येत असतील तर
  • जर बाळाच्या कानात  डॅन्डरफ (कोंडा) तयार झालेला असेल आणि बाळ वारंवार कान खाजवत असेल तर

काही वेळेस फंगल इन्फेक्शन मुळे बॅक्टेरिअल इन्फेक्शन सुद्धा तयार होत असते. अशावेळी त्या जागेतून रक्तस्त्राव होऊ शकतो वरील काही लक्षणे दिसून आली तर आपल्या बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

निष्कर्ष

  • अंधश्रद्धेपासून दूर राहा.
  • तुमच्या बाळाची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे त्यामुळे इतरांनी दिलेले सल्ले व्यवस्थित आहे का हे तपासून घेणे आवश्यक असते.
  • जबरदस्तीने तयार झालेली पापडी काढण्याचा प्रयत्न करू नका.
  • टाळूवर जास्त प्रमाणात तेल लावू नका, त्याचा काहीच फायदा नाही.
Rate this post

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

1 thought on “नवजात बाळांमध्ये क्रॅडल कॅप | Cradle Cap in Marathi”

Leave a Comment