लहान मुलांना सर्दी झाली की बऱ्याचदा वाफ दिल्याने (Nebulisation in marathi) त्यांचे बंद नाक मोकळे होते व त्यांची चिडचिड कमी होत असते व त्यानंतर मुले खेळायला सुद्धा सुरुवात करतात चला तर मग लेख मध्ये जाणून घेऊया लहान मुलांना वाफ दिल्याने होणारे फायदे व वाफेबद्दल आवश्यक अशी माहिती
नेब्युलायझर काय असते ?
नेबुलाइजर हे एक प्रकारचे वाफ देण्याचे मशीन असते ज्याद्वारे वाफ देण्यात येत असते. नेब्युलायझर मशीन हे धुक्यासारखी वाफ बाहेर फेकत असते ती वाफ एका मास्क मधून नाकाद्वारे आपण घेऊ शकतो. बऱ्याच प्रकारच्या नेबुलाइजर मार्केटमध्ये उपलब्ध आहे आपल्याला नेब्युलायझर इन्हेलर व स्पेसर यामधील फरक माहीत असणे सुद्धा आवश्यक आहे
नेब्युलायझर, इन्हेलर व स्पेसर यामधील फरक काय असतो ?
- नेब्युलायझर हे वाफ देण्यासाठी वापरण्यात येणारे मशीन असते (Nebulisation in marathi). या मशिनचा वापर सर्व क्लिनिकमध्ये होत असतो किंवा नेब्युलायझर चा वापर हा घरात सुद्धा करता येऊ शकतो.
- इन्हेलर हे अस्थमा असलेल्या मुलांमध्ये वापरण्यात येत असते त्यामुळे आवश्यक असलेले औषध हे थेट श्वसननलिकेत पोहोचत असल्याने रुग्णांना लगेच आराम मिळत असतो. इन्हेलर हे अत्यावश्यक असलेल्या वेळात खूपच फायद्याचे असते
- स्पेसर हे एक प्रकारचे कंटेनर असते ज्याला इन्हेलर लावून औषध हे पूर्णपणे फुप्फुसापर्यंत जात असते. लहान मुले इन्हेलर चा वापर व्यवस्थित करू शकत नाही म्हणून त्यांना स्पेसर द्वारे औषध देणे हे फार सोपे असते.
नेब्युलायझर चे पार्ट कोणते असतात ?
नेब्युलायझरचे चार पार्ट असतात
- एअर कॉम्प्रेसर – हे नेबुलाइजर मशीन असते व या मशीनद्वारे हवा सोडण्यात येत असते
- नळी – एअर काँप्रेसरला नळी जोडण्यात येत असते. ही नळी एअर कॉम्प्रेसर ला जोडलेली असते जेणेकरून एअर कॉम्प्रेसर ने जनरेट केलेली हवा ही नळीतून चेंबर पर्यंत पोहोचते
- चेंबर – चेंबर मध्ये वाफ देण्यासाठी वापरण्यात येणारे औषध टाकण्यात येते
- फेस मास्क – चेंबरमधून बाहेर येणारी औषधाची वाफ ही मास्कमुळे सहजपणे रुग्णाला देण्यात येत असते
अशाप्रकारे मशीन मधून जनरेट झालेली हवा नळी मार्फत चेंबर पर्यंत व चेंबरमधून औषधाचे वाफ होऊन तेव्हा मास्कद्वारे रुग्णाला देण्यात येत असते
नेब्युलायझरचे प्रकार कोणते असतात ?
मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे नेबुलाइजर उपलब्ध आहेत त्यामुळे सर्वात जास्त वापरात येणारे नेबुलाइजर हे खालील प्रकारचे असतात.
- अल्ट्रासोनिक नेब्युलायझर
अल्ट्रासोनिक नेबुलाइजर मध्ये व्हायब्रेशनमुळे वाफ तयार होत असते या नेबुलाइजर ने भरपूर प्रमाणात वाफ तयार होत असते अल्ट्रासोनिक नेबुलाइजर हे खूप महाग असते व जास्त करून हॉस्पिटलमध्ये वापरात येत असते
- जेट नेबुलाइजर
जेट नेब्युलायझर कॉम्प्रेस केलेली हवेपासून चेम्बरमधून वाफ तयार करत असते या प्रकारच्या नेब्युलायझर चा खूपच जास्त प्रमाणात वापर होत असतो व ते स्वस्त सुद्धा असते
नेब्युलायझर चा फायदा काय असतो ?
नेब्युलायझर आवश्यक असलेले औषध वाफेतून श्वसननलिकेपर्यंत पोहोचत असते व त्यामुळे त्या श्वासनलिका मोकळे होण्यास मदत होते तसेच बऱ्याच प्रकारच्या फुफ्फुसांच्या संसर्गामुळे वाफ देण्यासाठी नेब्युलायझर चा वापर करण्यात येत असतो
- बालदमा किंवा दमा
दम्यामध्ये रुग्णाला श्वास घेण्यास भरपूर प्रमाणात त्रास होत असतो कारण त्याच्या श्वसननलिका या आकुंचन पावलेल्या असतात अशा वेळेस त्याला औषध असलेली वाफ दिल्याने त्याच्या श्वासनलिका मोकळ्या होत असतात व रुग्णाचा श्वास घेण्याचा त्रास कमी होत असतो
- सर्दी
लहान मुलांचे नाक हे सर्दीमुळे बंद पडत असते त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असतो अशा वेळेस त्यांना वाफ दिल्याने नाकातील मार्ग मोकळा होत असतो व त्यांची चिडचिड सुद्धा कमी होत असते
- खोकला
लहान मुलांना बऱ्याचदा घशामध्ये कफ झालेला असतो किंवा निमोनिया झालेला असतोव असा कफ मुलांना बाहेर काढता येत नाही त्यामुळे नेबुलाइजर ने वाफ दिल्याने तो कफ पातळ होतो व उलटी द्वारे किंवा शी द्वारे बाहेर पडत असतो
- घरगुती वापर
नेब्युलायझर हे पोर्टेबल असल्याने त्याचा घरगुती वापर करण्यात येऊ शकतो व लहान मुलांना तसेच मोठ्या माणसांना वाफ देण्यासाठी फायद्याचे ठरू शकते
नेब्युलायझरने कोणत्या प्रकारची औषधे देण्यात येऊ शकतात ?
नेब्युलायझर ने खालील प्रकारची औषधे देण्यात येऊ शकतात
- ब्रॉंकोडायलेटर – या औषधांमुळे श्वसनलिकेचा मार्ग मोकळा होत असतो
- हायपरटॉनिक सलाईन – हायपरटॉनिक सलाईन च्या वाफेमुळे श्वसनलिकेतील घट्ट पदार्थ म्हणजे म्युकस मोकळा होत असतो परंतु अशा प्रकारची वाफ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावी
नेब्युलायझर घरी केव्हा वापरावे ?
नेब्युलायझर घरी खालील कारणांसाठी वापरावे
- जर डॉक्टरांनी तुम्हाला नेबुलाइजर वापरण्याचा सल्ला दिलेला असेल तर
- डॉक्टरांनी जर तुम्हाला वाफेसाठी औषध लिहून दिलेले असेल तर
- जर तुम्ही वाफ देण्यासाठी समर्थ असाल तर
- नेब्युलायझर व्यवस्थितपणे साफ करूनच वाफ देणार असाल तर
नेब्युलायझर कसे साफ करावे?
नेब्युलायझर चा वापर केल्यानंतर ते व्यवस्थित पणे साफ ठेवणे फार महत्त्वाचे असते कारण हे नेब्युलायझरचा वापर ते साफ न करताच दुसर्या रुग्णाला संसर्ग पसरण्याचा धोका असतो नेबुलाइजर साफ ठेवणे हे खूप कष्टदायी असू शकते परंतु ते फायद्याचे सुद्धा असते. न्यूबुलायझर खालील प्रमाणे साफ करावे
- सर्वप्रथम स्वतःचे हात स्वच्छ साबणाने धुवावेत
- मास्क व चेंबर हे कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे ते धुतल्यानंतर त्यात जमा असलेले पाणी झटकून घ्यावे व कोरड्या कापडाने पुसून घ्यावे
- नळी पाण्याने धुण्याची काही गरज नसते
- नेबुलाइजर चा कॉम्प्रेसर असलेला भाग स्वच्छ कापडाने पुसावा
दौलीन नेब्युलायझेशन (Duolin nebulisation in marathi)
दौलीन नेब्युलायझेशन हे बारा वर्षाखालील मुलांमध्ये वापरण्यात येत नाही. औषधाच्या 2.5 मिली च्या ट्यूब मार्केटमध्ये उपलब्ध असतात ह्या ट्यूबमधे इप्रतरोपियम व लेवोसालब्यूटामॉल हीऔषधे असतात ही औषधे श्वसननलिकेतील मार्ग मोकळा करत असतात परंतु या औषधाची वाफ ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत
बुडेकोर्ट नेब्युलायझेशन (Budecort nebulisation in marathi)
बुडेकोर्ट नेब्युलायझेशन चा वापर लहान मुलांमध्ये करण्यात येतो जास्त करून ज्या मुलांना बालदमा आहे किंवा डांग्या खोकला असेल अशावेळी बुडेकोर्ट नेब्युलायझेशन चा फायदा होत असतो या औषधाची मार्केटमध्ये २ मिली ची ट्यूब उपलब्ध आहे. हे एक प्रकारचे स्टिरॉइड असते व अस्थमा असलेल्या मुलांमध्ये खूप फायद्याचे असते
हॅन्डीनेब नौलिफे पिस्टन टाईप नेब्युलायझर (Handyneb Nulife Piston type nebuliser)
सर्वात फायदेशीर व स्वस्त असलेले नेब्युलायझर म्हणजे हॅन्डीनेब. या नेब्युलायझरचे फायदे खालीलप्रमाणे असतात.
१) हॅन्डीनेब नेब्युलायझर हे पोर्टेबल असल्याने ते आपण कोणत्याही जागेवर नेवून वाफ देऊ शकतो.
२) हॅन्डीनेब नेब्युलायझर हे जास्त वापरात येणारे व स्वस्त असलेले नेब्युलायझर आहे.
३) हॅन्डीनेब नेब्युलायझरची साईज 29.५ x14.८ x 10.५ सेमी असल्याने ते ठेवण्यासाठी कमी जागा लागत असते.
४) हॅन्डीनेब नेब्युलायझरचे कॉम्प्रेसर हे चेम्बरमधील औषध पासून वाफ तयार करत असते.
५) हॅन्डीनेब नेब्युलायझरसोबत १ बॅग, नळी, वॉरंटी कार्ड भेटत असते.
६) इमर्जन्सीचे वेळेस अश्या प्रकारचे नेब्युलायझर हे खूप फायद्याचे असते. त्यामुळे घरगुती वापरासाठी हे नेब्युलायझर असलेले कधीही फायद्याचे ठरते.
स्मार्टकेयर अल्ट्रासॉनिक नेब्युलायझर (Smartcare Ultrasonic Nebuliser)
१) स्मार्टकेयर उल्ट्रासॉनिक नेब्युलायझर (Ultrasonic nebuliser) हे एक प्रकारचे पोर्टेबल नेब्युलायझर आहे. जे आपण कोणत्याही जागेवर नेवून वाफ देण्यासाठी वापरू शकतो.
२) स्मार्टकेयर उल्ट्रासॉनिक नेब्युलायझर मध्ये व्हायब्रेशन मुले वाफ तयार होत असते.
३) स्मार्टकेयर उल्ट्रासॉनिक नेब्युलायझरमध्ये खूप जास्त प्रमाणात वाफ तयार होत असते त्यामुळे सर्दी खोकला असलेल्या रुग्णाला लगेच आराम पडत असतो.
४) स्मार्टकेयर उल्ट्रासॉनिक नेब्युलायझर मध्ये टायमर व वाफेची डेन्सिटी कमी जास्त करण्यासाठी नॉब दिलेले आहे त्यामुळे आपल्याला हवी तशी वाफ घेऊ शकतो.
५) स्मार्टकेयर उल्ट्रासॉनिक नेब्युलायझरची साईज २५० x १५० x २२५ मिमी इतकीच असल्याने ते जास्त जागा घेत नाही.
६) स्मार्टकेयर उल्ट्रासॉनिक नेब्युलायझर हे लहान मुले तसेच मोठ्या माणसांमध्ये सुद्धा वापरण्यात येत असते.
७) स्मार्टकेयर उल्ट्रासॉनिक नेब्युलायझर जरी महाग असले तरी या नेब्युलायझरच्या वाफेने आजारात त्वरित फरक पडत असतो.
८) या नेब्युलायझरसोबत असेसरी भेटत असतात ज्या वाफ देण्यासाठी वापरण्यात येतात.
वरील लेख वाचल्यानंतर तुम्हाला समजून आले असेल कि नेब्युलायझर (nebulisation in marathi) कसे वापरावे व कशासाठी वापरावे.