मेफ्टल स्पास टॅबलेट | 6 Best Meftal Spas Tablet Uses in Marathi

मासिक पाळी आलेली असतांना पोटदुखी कमी करण्यासाठी मेफ्टल स्पा (meftal spas tablet uses in marathi) हे सर्वात जास्त वापरले जाणारे औषध आहे. स्पास म्हणजे पोटात मुरडा येणे व हा पोटातील मुरडा कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे हे औषध म्हणजे मेफ्टल स्पास. चला तर मग जाणून घेऊया आपत्कालीन परिस्थितीत मेफ्टल स्पास चे फायदे.

Table of Contents

मेफ्टल स्पास टॅबलेट म्हणजे काय?

मेफ्टल स्पास टॅब्लेट (meftal spas tablet in marathi) हे पोटदुखीच्या लक्षणांपासून आराम देण्यासाठी वापरले जाणारे अँटिस्पास्मोडिक औषध आहे. अँटिस्पास्मोडिक म्हणजे पोटातील स्नायूंमधील तणाव कमी करणारे औषध. ही टॅबलेट Blue Cross Laboratories Ltd कंपनी ने निर्मित केली आहे.

मेफ्टल स्पास टॅब्लेटचे घटक कोणते आहेत?

  • मेफ्टल स्पास टॅब्लेट मध्ये 250 मिलीग्राम मेफेनॅमिक ऍसिड आणि 10 मिलीग्राम डायसायक्लोमाइन असते.
  • मेफ्टल स्पास DS टॅब्लेट देखील उपलब्ध आहेत ज्यात 500 मिलीग्राम मेफेनॅमिक ऍसिड आणि 20 मिलीग्राम डायसायक्लोमाइन असते.

मेफ्टल स्पास टॅब्लेट चे कार्य काय आहे?

मेफ्टल स्पास टॅब्लेटमध्ये (Meftal spas tablet uses in marathi) मेफेनॅमिक ऍसिड (Mefenamic acid) आणि डायसाइक्लोमाइन(Dicyclomine) असते. या दोन्ही औषधांच्या कृतीमुळे पोटातील वेदना कमी होण्यास मदत होते.

  • मेफेनॅमिक ऍसिड हे नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषध आहे. यामुळे पोटातील जळजळ कमी होते. मेफेनॅमिक ऍसिडचे शास्त्रीय नाव डायमिथाइलफेनिल अमिनोबेंझोइक ऍसिड आहे.
  • डायसायक्लोमाइन हे अँटीकोलिनर्जिक औषधांपैकी एक आहे. जे पोट आणि आतड्याच्या गुळगुळीत स्नायूंवर कार्य करते. डायसाइक्लोमाइन गुळगुळीत स्नायूंवर कार्य करते, ते गर्भपिशवीतील तसेच आतड्यातील स्मूथ मसल मधील तणाव दूर करण्यास मदत करते.

मेफ्टल स्पास टॅब्लेट चा उपयोग कशात करण्यात येतो ?

मेफ्टल स्पास टॅब्लेट चा वापर (meftal spas tablet uses in marathi) सामान्यतः डिसमेनोरियामध्ये केला जातो. डिसमेनोरिया म्हणजे स्त्रीला मासिक पाळीत होणाऱ्या वेदना असतात.

  • मासिक पाळीचे दुखणे : मासिक पाळीतील दुखणे खूप वेदनादायक असते. मासिक पाळीचे दुखणे पाठीवर तसेच मांडीपर्यंत दुखत असते. जेव्हा स्त्रीला वेदनादायक मासिक पाळी येते तेव्हा मेफ्टल स्पास वेदना कमी करण्यास मदत करते कारण ते गर्भाशयाच्या गुळगुळीत स्नायूंवर कार्य करते आणि वेदना कमी करते.
  • डिसमेनोरिया: याचा अर्थ गर्भाशयातून प्रोस्टॅग्लॅंडिन हा द्रव्य प्रसव झाल्याने मासिक पाळीच्या आधी आणि दरम्यान वेदना होतात. प्रोस्टॅग्लॅंडिनची भूमिका गर्भाशयाचे आकुंचन वाढवणे असे असते. त्यामुळे पोटातील वेदना भरपूर प्रमाणात वाढत असतात.
meftal spas tablet uses in marathi
  • ओटीपोटात दुखणे : पोटात गॅस जमा झाल्याने पोटात दुखून येत असते अश्यावेळेस आतड्यातील स्नायूंमध्ये बऱ्याच प्रमाणात तणाव वाढत असतो त्यामुळे पोटात अत्यंत वेदना होत असतात, अशा वेळी मेफ्टल गोळ्या आतड्याच्या गुळगुळीत स्नायूंवर कार्य करून वेदना कमी करण्यास मदत करतात.
  • मूत्रपिंड दुखणे : मूत्रपिंडाचे दुखणे असे आहे की बहुतेक रुग्णांमध्ये ते अनियंत्रित होते. अशा वेळी मेफ्टल स्पास टॅब्लेट मूत्रमार्गाच्या गुळगुळीत स्नायूवर क्रिया करून किडनी स्टोनच्या जागी असलेली सूज आणि तणाव कमी करते आणि शेवटी रुग्णाच्या वेदना कमी करते.
  • स्नायू दुखणे : टॅब्लेटमधील मेफेनॅमिक ऍसिड घटक स्नायूवर कार्य करते ज्यामुळे हातापायावरील स्नायू वेदनांच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत होते.
  • शालेय मुलींमध्ये पोटदुखी : अनेक वेळा मोठ्या मुलींना शाळेत मासिक पाळीमुळे पोटदुखीचा त्रास होतो, त्यामुळे त्या शाळेच्या वेळेत खूप अस्वस्थ असतात, अशा वेळी मेफ्टल स्पास टॅब्लेट त्यांना देणे फायदेशीर ठरते. अश्या वेळेस मुलींनी भरपूर प्रमाणात पाणी पिणे महत्वाचे असते. केळी खाणे सुद्धा फायदेशीर असते कारण केळी मध्ये तंतुमय पदार्थ असतात तसेस पोटॅशियम चे मुबलक प्रमाण असते जे स्नायूंमधील तणाव कमी करण्यास मदत करत असते. चॉकलेट खाल्याने सुद्धा गर्भपिशवीतील स्नायूतील तणाव कमी होत असतो कारण त्यात मॅग्नेशियम असते.

मासिक पाळी म्हणजे काय?

मासिक पाळीला मेनस्ट्रल सायकल (menstrual cycle in marathi) असे म्हणतात. मुलींमध्ये मासिक पाळी वयाच्या 8-10 व्या वर्षी सुरू होते.

मासिक पाळीची सुरुवात शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळे होते, साधारणपणे मासिक पाळी दर 28-35 दिवसांनी येते आणि रक्तस्त्राव 5-7 दिवस दिसून येत असतो.

मासिक पाळीच्या वेळेस गर्भपिशवीत तयार झालेला लेयर तुटत असल्याने त्यातून रक्त, त्या ठिकाणी तयार झालेल्या पेशी या गर्भाशयातून बाहेर पडत असतात. मासिक पाळी येण्या आधी गर्भपिशवी गर्भधारणेसाठी तयार होत असते आणि जर गर्भधारणा झाली नाही तर रक्तातील एस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन हार्मोन चे प्रमाण कमी होण्यास सुरवात होते व याच कारणामुळे मासिक पाळीची सुरवात होत असते.

मासिक पाळीच्या वेळी पोटदुखी, उलट्या, रक्तस्त्राव अशी लक्षणे दिसून येत असतात.

मेफ्टल स्पास टॅब्लेट कशी घ्यावी?

मेफ्टल स्पास टॅब्लेट (meftal spas tablet in marathi) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्याव्यात.

टॅब्लेट जेवणानंतर घेणे आवश्यक आहे. त्यात जठराची सूज निर्माण करणारी नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषधे असल्याने, ती नेहमी अन्नासोबत घ्यावी.  मेफ्टल स्पास टॅब्लेट दुधासोबतही घेता येते.

मेफ्टल स्पास टॅब्लेट न चघळता पाण्यासोबत पूर्णपणे गिळून घेतली पाहिजे.

टॅब्लेट चिरडू किंवा चघळू नका कारण ते कुचकामी ठरू शकते.

मेफ्टल स्पास टॅब्लेट कसे स्टोर करावे?

मेफ्टल स्पास टॅब्लेट (meftal spas tablet in marathi) 25 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात साठवले पाहिजे.

मेफ्टल स्पास टॅब्लेट चा डोस काय आहे?

गोळ्याचा डोस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावा. प्रौढ व्यक्ती संपूर्ण टॅब्लेट एकदाच घेऊ शकतात आणि 8 तासाच्या अंतराने मेफ्टल स्पास टॅब्लेट घेण्यात येऊ शकते. जर तुम्हाला गोळीतील कोणत्याही घटकाची ऍलर्जी असेल तर टॅब्लेट घेणे टाळणे चांगले असते.

मासिक पाळीच्या दरम्यान 2-3 दिवस मेफ्टल स्पास गोळ्या घेणे सुरक्षित आहे.

मेफ्टल स्पास टॅब्लेट मासिक पाळीच्या वेळी दर महिन्याला घेता येते, परंतु पोटात तीव्र वेदना होत असेल तरच ही टॅबलेट घ्यावी, कोणत्याही वेदनाशामक औषधाचा वापर कमीत कमी केला तर चांगले असते.

मेफ्टल स्पास टॅब्लेट चे दुष्परिणाम काय असतात ?

मेफ्टल स्पास टॅब्लेट (meftal spas tablet in marathi) खालील दुष्परिणामांसाठी जबाबदार आहे. टॅब्लेटचे दुष्परिणाम प्रत्येक रुग्णासाठी सारखे नसतात.

  • मळमळ होणे
  • उलट्या होणे
  • पोट खराब होणे
  • चक्कर येणे
  • तोंड कोरडे पडणे
  • धूसर दृष्टी होणे
  • अशक्तपणा होणे
  • अस्वस्थता होणे
  • ऍलर्जी येणे

जर साइड इफेक्ट्स सौम्य असतील तर ते त्वरीत कमी होऊ शकतात परंतु जर ते वेळेवर कमी झाले नाहीत तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले असते.

मेफ्टल स्पास टॅबलेट घेतांना कोणती खबरदारी घ्यावी?

  • गर्भधारणेदरम्यान : गर्भधारणेदरम्यान मेफ्टल स्पास टॅब्लेट घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.
  • स्तनपानाच्या दरम्यान : स्तनपान करवताना मेफ्टल स्पास गोळ्या घेणे सुरक्षित असते मात्र तुमच्या बाळाला स्तनपान देताना गोळ्या घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • ड्रायव्हिंग करताना : डायसाइक्लोमाइनमुळे चक्कर येऊ शकते म्हणून जेव्हा तुम्हाला गाडी चालवायची असेल तेव्हा टॅब्लेट घेणे टाळणे चांगले.
  • मूत्रपिंड निकामी होणे आणि यकृत निकामी होणे : टॅब्लेटचा डोस रुग्णाच्या स्थितीनुसार समायोजित करावा लागतो, त्यामुळे अशा स्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.
  • हृदयविकार : जर रुग्णाला हृदयविकाराचा त्रास असेल किंवा त्याची कोरोनरी बायपास शस्त्रक्रिया झाली असेल तर मेफ्टल टॅब्लेट घेणे टाळणे चांगले.

वरील सर्व लक्षणे प्रत्येक पेशंट मध्ये दिसून येतील असे नसते तरी सावधगिरी ठेवलेली कधीही बरी.

मेफ्टल स्पास सिरप (Meftal Spas Syrup in Marathi)

मेफ्टल स्पास सिरप चा वापर मुलांमध्ये पोटशूळ वेदना, पोटाच्या वायूमुळे होणारा पोटशूळ, डायरिया  संबंधित वेदनांसाठी केला जातो. त्यात प्रत्येक ५ मिली सिरप मध्ये 10 मिलीग्राम डायसायक्लोमाइन आणि 40 मिलीग्राम सिमेथिकॉन असते. त्यात मेफेनॅमिक ऍसिड नसले तरी सिरपचे नाव मेफ्टल स्पास असे आहे.

वयडोस
६ महिने ते २ वर्ष२.५ मिली दिवसातून तीन वेळेस
२ वर्ष ते १२ वर्ष५ मिली दिवसातून तीन वेळेस
१२ वर्ष वरील१० मिली दिवसातून तीन वेळेस

गॅसमुळे होणाऱ्या पोटदुखीसाठी मेफ्टल सिरपचा सर्वाधिक वापर केला जातो. मेफ्टल स्पास सिरप मध्ये असलेले सिमेथिकॉन हे पोटातील गॅस चा फुगा फोडण्यास मदत करत असते. त्यामुळे लहान मुलांना या औषधामुळे लगेच फरक पडत असतो.

लहान मुलांमध्ये पोटात गॅस जमा झाल्यामुळे अनेकदा संध्याकाळच्या वेळी  वेदना सुरू होतात व बाळ जास्त प्रमाणात रडण्यास सुरवात करते, अशा वेळी मेफ्टल स्पा हे औषध कामी येते.

मेफ्टल स्पा सिरपचा (Meftal spas syrup in marathi) डोस तुमच्या बालरोगतज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतरच घ्यावा.

सतत विचारले जाणारे प्रश्न

मेफ्टल स्पास टॅबलेट मुळे वंध्यत्व येऊ शकते का?

मेफ्टल स्पास टॅबलेट मुळे वंध्यत्व येत नाही. परंतु तुम्ही ते डॉक्टरांच्या सल्ल्यावरच घ्या.

Aciloc Tablet सोबत मेफ्टल स्पास टॅबलेट घेतले जाऊ शकते का?

मेफ्टल स्पास टॅब्लेटमुळे जठरासंबंधी जळजळ होऊ शकते म्हणून Aciloc ही अँटासिड टॅब्लेट आहे म्हणून ती Meftal गोळ्यांसोबत घेतली जाऊ शकते ज्यामुळे जठरामधील जळजळ कमी होते.

मेफ्टल स्पास टॅब्लेट कार्य करण्यासाठी किती वेळ लागतो?

मेफ्टल स्पास टॅब्लेट ला वेदनांवर काम करण्यास 30-60 मिनिटे लागू शकतात.

मेफ्टल स्पास टॅब्लेट घेतल्यानंतरही वेदना कमी होत नसल्यास काय करावे?

मेफ्टल स्पास टॅब्लेट घेतल्यानंतरही वेदना कमी होत नसल्यास त्या वेदनांची तपासणी करण्‍याची आवश्‍यकता असल्‍याने ताबडतोब आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपण ibugesic plus सह meftal spas वापरू शकतो का?

एकाच वेळी दोन नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषधे घेण्याची शिफारस केली जात नाही कारण यामुळे जठरासंबंधी अस्वस्थता वाढते.

मला मेफ्टल स्पास टॅब्लेट ची सवय लागू शकते का?

मेफ्टल स्पास टॅब्लेट हे सवय लावणारे औषध नाही त्यामुळे तुम्हाला मेफ्टल स्पास टॅब्लेटचे व्यसन होणार नाही.

मेफ्टल स्पास टॅब्लेटमुळे डिसमेनोरियामध्ये रक्तस्त्राव थांबतो का?

मेफ्टल स्पास टॅब्लेट गर्भाशयाच्या गुळगुळीत स्नायूंच्या वेदना कमी करेल. यामुळे रक्तस्त्राव कमी होणार नाही.

मेफ्टल स्पास टॅब्लेट चा मेंदूवर परिणाम होतो का?

मेफ्टल स्पास टॅब्लेट चा मेंदूवर फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे त्याचा मनावर परिणाम होत नाही.

मेफ्टल स्पास टॅब्लेटचा मूत्रपिंड आणि यकृतावर परिणाम होतो का?

मेफ्टल स्पास टॅब्लेटचा मूत्रपिंड आणि यकृत वर कमीत कमी परिणाम होतो म्हणून हे औषध पोटदुखी साठी सुरक्षित मानले जाते

मेफ्टल स्पास टॅब्लेटमुळे झोप येते का?

मेफ्टल स्पास टॅब्लेट मधील डायसाइक्लोमाइन या औषधामुळे झोप येऊ शकते. त्यामुळे ही गोळी घेतल्यावर शक्यतो वाहन चालवणे, मशीन चालवणे टाळावे.

मेफ्टल स्पा गोळ्या पोटदुखीसाठी फायदेशीर आहेत का?

मेफ्टल स्पास हे पोटदुखीवर वापरले जाणारे औषध आहे, हे औषध शरीरातील गुळगुळीत स्नायूंवर परिणाम करते, ज्यामुळे पोटदुखी आणि मासिक पाळीची समस्या दूर होते.

आपण एका वेळी दोन मेफ्टल स्पा घेऊ शकतो का?

मेफ्टल स्पास टॅबलेट डॉक्टरांच्या सल्ल्यावरच घ्या. तुम्ही मेफ्टल स्पास टॅबलेट दिवसातून जास्तीत जास्त तीन वेळा घेऊ शकता. प्रत्येक डोसमध्ये 7-8 तासांचे अंतर असावे आणि जेवणानंतर औषध घ्यावे. दोन मेफ्टल स्पास एकत्र घेऊ नयेत.

Rate this post

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

Leave a Comment