मलेरिया हा एक जीवघेणा आजार असतो. जो प्लाज्मोडियम या पॅरासाईट मुळे होत असतो बऱ्याचदा मलेरिया अनोफिलस या डासांच्या चावण्यामुळे पसरत असतो. मलेरियामुळे जगात लाखो मुलांचा मृत्यू होत असतो.
जास्त करून मलेरियाचा मृत्यू दर आफ्रिका खंडात जास्त प्रमाणात आहे. मलेरियासाठी लस (malaria vaccine in marathi) यापूर्वी उपलब्ध नव्हती. परंतु आता जागतिक आरोग्य संघटनेने ग्लॅक्झोस्मिथक्लीन कंपनीच्या mosquirix या मलेरिया साठीच्या लसीला मान्यता दिली चला तर मग जाणून घेऊया मलेरियाची लस कशी आहे व त्याचे फायदे.
मलेरियासाठी कोणती लस वापरण्यात येते?
जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया साठी mosquirix (malaria vaccine in marathi) या लसीला सर्वात प्रथम मान्यता दिली आहे ही लस ग्लॅक्झोस्मिथक्लीन कंपनीने १९८७साली विकसित केली होती परंतु त्या लसला तीन दशकांनंतर मान्यता मिळाली या लसला RTS,S/AS01 असेसुद्धा म्हटले जाते. ही लस पॅरासाईट संसर्गावर काम करणारी सर्वप्रथम लस आहे.
मलेरिया लस प्लास्मोडियम फ्याल्सिपॅरम तसेच कावीळ ब या पॅरासाईट व व्हायरस विरुद्ध काम करते. ही लस जगाच्या ज्या भागात प्लास्मोडियम फ्याल्सिपॅरम मुळे होणाऱ्या मलेरियाचे प्रमाण अधिक आहे त्या भागात वापरण्यात येऊ शकते. ही लस यकृताला कावीळ ब मुळे होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण सुद्धा देते
मलेरिया ची लस कोणत्या मुलांना देण्यात येऊ शकते ?
मलेरिया लस सहा आठवडे ते १७ महिने या वयातील मुलांना प्लाज्मोडियम फ्याल्सिपॅरम या पॅरासाईट मुळे होणाऱ्या मलेरिया विरुद्ध संरक्षण देते.
मलेरियाची लस कशी देण्यात येते ?
मलेरिया लस खांद्यावर किंवा मांडीवर 0.५ मिली इतक्या डोस मध्ये इंजेक्शन ने टोचून देण्यात येते. मलेरिया च्या लसीचे चार डोस आहेत. सुरवातीला वयाच्या सहाव्या आठवड्यात, नंतर डाव्या आठवड्यांनी व १४ व्या आठवड्यात म्हणजे एक महिन्याच्या अंतराने तीन डोस देण्यात येतात तसेच चौथा तिसरा डोस दिल्यानंतर 18 महिन्यांनी देण्यात येतो
मलेरियाचे लस कशी काम करते ?
mosquirix या मलेरियाच्या लसी मध्ये एक सक्रिय पदार्थ असतो जो प्लाझमोडियम फ्याल्सिपॅरम व कावीळ बी विषाणूंवर असलेल्या प्रोटीन ने बनलेला असतो.
ज्या वेळेस मुलाला लस देण्यात येते त्यावेळेस मुलाच्या शरीरातील प्रतिरक्षा प्रणाली त्या प्रोटीनला शरीरा बाहेरील पदार्थ म्हणून ओळखते व त्याविरुद्ध अँटीबॉडी तयार करते.
भविष्यात मुलाचा या प्लाझमोडियम पॅरासाईट तसेच कावीळ बी च्या विषाणूशी संपर्क आला तर त्याची प्रतिरक्षा प्रणाली लवकरच अँटीबॉडी तयार करण्यास सुरुवात करते त्यामुळे होणाऱ्या संसर्गाचे तीव्रता कमी प्रमाणात असते. ह्या एंटीबॉडी तयार झाल्यावर त्या रक्तातून यकृताकडे जातात व तेथे त्यांची वाढ होते व त्यात जास्त प्रमाणात वाढतात. त्यामुळे यकृतामध्ये प्लाज्मोडियम फ्याल्सिपॅरम पॅरासाईट तसे कावीळ बी विषाणूंची वाढ होऊ शकत नाही व होणारा आजार टळतो किंवा कमी तीव्रतेचा असतो.
मलेरियाच्या लसी ला मान्यता का मिळाली?
लहान मुलांमध्ये मलेरिया होण्याचे प्रमाण जास्त असते पण मलेरियाची लस घेतल्याने मलेरिया होण्यापासून तसेच तीव्र आजार होण्यापासून संरक्षण होते. हे संरक्षण वेळेनुसार कमी होऊ शकते त्यामुळे तिसऱ्या डोस नंतर 18 महिन्यांनी चौथा डोस देण्यात येतो.
काही मुलांमध्ये लस घेतल्यानंतर ताप येऊ शकतो जो तापाच्या औषधाने कमी होतो अशा प्रकारे फायदा जास्त प्रमाणात असल्याने या लसीला जागतिक आरोग्य संघटनेने कडून मान्यता देण्यात आली.
मलेरियाच्या लसीचे फायदे काय आहेत?
मलेरिया लसीवर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये ही लस दिल्यानंतर लहान मुलांना मलेरिया होण्याचे प्रमाण खूप कमी झालेले दिसून आले व आजार झाला तरी तो कमी तीव्रतेचा असतो. मलेरियाची लस कावीळ बी या आजारावर सुद्धा उपयोगी आहे असे चाचण्यांमध्ये दिसून आले.
मलेरियाच्या लसीचे दुष्परिणाम काय आहेत?
मलेरियाची लस दिल्यावर सर्वात गंभीर दुष्परिणाम म्हणजे तापातील झटके येणे हे असतात. जवळपास एक हजार मुलांपैकी एका मुलाला लस दिल्यानंतर तापाचे झटके येऊ शकतात.
तसेच इतर काही सामान्य दुष्परिणाम म्हणजे ताप येणे, चिडचिड करणे, लस दिलेल्या भागावर सूज येणे असे असतात. ज्या मुलांना मलेरियाची लस तसेच कावीळ बी ची लस दिल्यावर रिॲक्शन आलेली असेल अशा मुलांना ही लस देणे टाळावे.
मलेरियाच्या लसीची परिणामकारकता किती असते?
मलेरियाच्या लसीची परिणामकारकता ३९ टक्के आहे. जे लोक मलेरिया चे प्रमाण कमी असलेल्या देशात राहतात त्यांना हे प्रमाण खूप कमी वाटेल परंतु जे लोक मलेरिया जास्त प्रमाणात असलेल्या देशात राहतात त्यांना या लसीचा खूप प्रमाणात फायदा होईल
मलेरिया ची लस फक्त मुलांनाच का देण्यात येते?
लहान मुलांमध्ये मलेरियामुळे आफ्रिकेत मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सर्वप्रथम लहान मुलांना देण्यात येते.
मलेरियाच्या लसीची किंमत किती आहे ?
मलेरियाची लस ग्लॅक्झोस्मिथक्लीन कंपनीने नफ्यासाठी नसलेल्या किमतीत ( cost for malaria vaccine in marathi) उपलब्ध करणार आहे.