नवजात बाळांमध्ये कांगारू मदर केयर (Kangaroo Mother Care in Marathi) चा एक शस्त्र म्हणून वापर करण्यात येऊ शकतो. काही कुटुंबात कमी दिवसाचे किंवा कमी वजनाचे बाळ जन्माला आले की घरातील व्यक्ती काळजीत पडत असतात. अश्या वेळेस कांगारू मदर केयर चा वापर करून अश्या बाळांना होणाऱ्या समस्या टाळता येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया कांगारू मदर केयर बद्दल आवश्यक असलेली माहिती.
कांगारू पद्धत म्हणजे काय?
कांगारू मदर केयर (Kangaroo mother care marathi) ही कमी दिवसांच्या तसेच कमी वजनाच्या बाळांची त्वचेचा त्वचेला संपर्क आणून घेण्यात येणारी काळजी असते. ज्यामुळे नवजात बाळाचा वाढ व विकास होण्यास मदत होते. कांगारू मदर केयर ही आई, वडील किंवा घरातील इतर व्यक्तीकडून देण्यात येऊ शकते.
कांगारू मदर केयर देण्याचे काय फायदे असतात ?
कांगारू मदर केयर (Kangaroo mother care in marathi) दिल्याने खालील प्रकारचे फायदे होतात
- नवजात बाळ पूर्णपणे स्तनपान करण्यास सुरवात करते
- नवजात बाळांमधील मृत्युदर कमी होतो.
- नवजात बाळांमध्ये जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण फार कमी होते.
- नवजात बाळाच्या शरीराचे तापमान कमी होण्यापासून सुरक्षा होते.
- हॉस्पिटलमध्ये राहण्याचा वेळ कमी होतो त्यामुळे हॉस्पिटलमधील खर्च सुद्धा वाचतो.
- नवजात बाळाचे वजन वाढण्यास मदत होते.
- नवजात बाळाची उंची वाढण्यास मदत होते.
- नवजात बाळाच्या डोक्याचा घेर वाढण्यास मदत होते.
कांगारू मदर केयर साठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते?
कांगारू मदर केयर (Kangaroo mother care in marathi) साठी खालील गोष्टींची आवश्यकता असते.
- कांगारू मदर केयर ही आई वडील व घरातील कोणताही व्यक्ती देऊ शकते.
- अर्ध विश्रांती घेण्यासाठी वापरण्यात येणारी खुर्ची
- बाळाच्या आईने पुढून बटन असलेला गाऊन घालणे आवश्यक असते. तसेच ब्लाउज, साडी तसेच साधा शर्ट सुद्धा वापरू शकतात.
- बाळासाठी टोपी, पायात मोजे, डायपर, पुढून उघड असलेला शर्ट लागतो.
- खूपच कमी खर्चात बाळाला कांगारू मदर केयर देण्यात येऊ शकते.
कोणत्या बाळांना कांगारू मदर केयर देण्यात येते?
- कमी वजन असलेल्या म्हणजे २.५ किलो पेक्षा कमी वजन असलेल्या बाळांना.
- कमी दिवसाचे म्हणजे ३७ आठवड्याआधी जन्माला आलेल्या बाळांना.
- १.२ किलो पेक्षा वजन कमी असलेल्या बाळांना त्यांची तब्येत एन आय सी यु मध्ये स्थिर झाल्यावर.
- २.५ किलो पेक्षा वजन जास्त असलेल्या बाळांनासुद्धा कांगारू मदर केयर देण्यात येऊ शकते.
कांगारू मदर केयर कोण देऊ शकते?
कांगारू मदर केयर आई, वडील, आजी, आजोबा यातील कोणीपण देऊ शकतो. परंतु कांगारू मदर केयर ही आईने दिलेली बरी असते कारण यामुळे आई व बाळ यांमधील बांध घट्ट होतो व आईचे दूध वाढण्यास सुद्धा मदत होते.
कांगारू मदर केयर देतांना काय काळजी घेतली पाहिजे?
- कांगारू मदर केयर देणाऱ्या व्यक्तीची ती केयर देण्याची उच्च असली पाहिजे. कांगारू मदर केयरचे फायदे समजले असले तर ती केयर देणाऱ्याची इच्छाशक्ती नक्की वाढते.
- कांगारू मदर केयर देणारा व्यक्ती हा निरोगी असावा.
- आईने नियमित आहार घेतलेला असावा.
- कांगारू मदर केयर देणारा व्यक्तीने रोज अंघोळ केलेली असावी तसेच हाथ धुतलेले असावे व बोटांची नखे कापलेली असावीत. जेणेकरून त्यामुळे केयर घेतांना बाळाला नुकसान होणार नाही.
कांगारू मदर केयर देण्याची कार्यपद्धती काय असते?
कांगारू मदर केयर देण्यासाठी सर्वप्रथम इच्छाशक्ती असणे फार महत्वाचे असते. कांगारू पद्धत ही खालीलप्रमाणे असते.
१) बाळाला कांगारूच्या स्थितीत ठेवणे – बाळाला कांगारूच्या स्थितीत ठेवण्यासाठी त्याला आईच्या दोन्ही स्थनांमध्ये उभे झोपवावे. बाळाचे पोट हे आईच्या छातीला लागलेले असावे. बाळाचे डोके हे एका बाजूला व मान थोड्या प्रमाणात मागे असावी. जेणेकरून बाळाचा श्वास घेण्याचा मार्ग मोकळा राहील व आईचे बाळाकडे लक्ष राहील. बाळाचे पाय घडी पडलेले असावे. बाळाच्या पार्श्वभागावर हाथाने आधार दिलेला असावा.
२) बाळाचे नीट निरीक्षण करणे – बाळाला कांगारू मदर केयर देतांना खालील गोष्टींवर निरीक्षण असणे फार महत्वाचे असते. बाळाची मान मागच्या बाजूला आहे की नाही, बाळाचा श्वाशोश्वास नियमित आहे की नाही, बाळाचा रंग गुलाबी आहे का, बाळाच्या शरीराचे तापमान नियमित आहे का या सर्व गोष्टीवर कांगारू मदर केयर देणाऱ्या व्यक्तीने लक्ष ठेवणे आवश्यक असते.
३) स्तनपान करणे – बाळाची आई बाळ कांगारू स्थितीमध्ये असतांना स्तनपान करू शकते किंवा बाळ कांगारू स्थितीमध्ये असतांना आईचे दूध वाटी चमच्याने सुद्धा पाजता येऊ शकते.
४) कांगारू मदर केयर देण्याची वेळ – कांगारू मदर केयर ही एक तासापेक्षा कमी वेळेसाठी देण्यात येऊ नये. पण ती वेळ जास्तीत जास्त करण्यात यावी जेणेकरून बाळाला त्याचा फायदा होईल.
५) झोपून कांगारू मदर केयर देणे – आराम खुर्चीमध्ये बसून किंवा बिछान्यावर डोक्याकडील भाग उंच ठेवून बाळाला कांगारू मदर केयर देण्यात येऊ शकते. अश्या वेळेस आई झोपून सुद्धा आराम करू शकते.
बाळाला हॉस्पिटलमधून सुट्टी केव्हा देण्यात येते?
कांगारू मदर केयर ही हॉस्पिटलच्या स्टाफच्या निगराणीखाली देण्यात येत असते. ज्या वेळेस खालील निकष पूर्ण होतात त्या वेळेस बाळाला हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात येते.
- बाळाचे वजन नियमित वाढण्यास सुरवात झाल्यावर म्हणजे १५ ग्राम किलोमागे सलग ३ दिवसांसाठी वाढल्यावर.
- बाळाच्या शरीराचे तापमान सलग तीन दिवसांकरिता नियमित असेल तर
- बाळ नियमित स्तनपान करत असेल तर
- बाळाची तब्येत व्यवस्थित असेल तर
- आई व घरातील व्यक्तींची बाळाची काळजी घेण्यासाठीची इच्छाशक्ती असेल तर
बाळाला कांगारू मदर केयर देण्यास केव्हा थांबवावे?
बाळाचे वजन जोपर्यंत २.५ किलो होत नाही तोपर्यंत कांगारू मदर केयर नक्की देण्यात यावी. त्यानंतर सुद्धा कांगारू मदर केयर देण्यात येऊ शकते. बाळाला आंघोळ घातल्यानंतर तसेच थंडीच्या दिवसांत कांगारू मदर केयर देण्यात येऊ शकते.
कांगारू मदर केयर देण्यासाठी कुटुंबातील सर्व व्यक्तींचा समावेश तसेच इच्छाशक्ती असणे फार महत्वाचे असते. बऱ्याचदा आई बाळाची काळजी घेऊन थकलेली असेल अश्या वेळेस बाळाचे वडील कांगारू मदर केयर देऊ शकतात जेणेकरून बाळाच्या आईला त्या वेळेस आराम करता येईल.
समाजात कांगारू मदर केयर चे फायदे माहीत असणे फार महत्वाचे आहे कारण त्यामुळे नवजात शिशुच्या जीवाला असलेला धोका टळतो व त्याची नियमित वाढ होते.
तुम्हाला कांगारू मदर केयर (Kangaroo mother care in marathi) बद्दलची माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेयर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल.