फ्ल्याटुना ड्रॉप्स (Flatuna Drops Uses in Marathi) हे लहान बाळांमध्ये गॅस व पोटदुखीसाठी वापरण्यात येणारे औषध आहे. नवजात बाळांमध्ये गॅस होणे हा खूप सामान्य प्रॉब्लेम आहे ज्यामुळे लहान बाळाला पोटदुखी होत असते व त्यामुळे बाळ खूप जोरजोराने रडत असते. चला तर मग या लेख मध्ये जाणून घेऊया फ्ल्याटुना ड्रॉप्स बद्दलची माहिती.
फ्ल्याटुना ड्रॉप्स म्हणजे काय ? (Flatuna Drops in Marathi)
फ्ल्याटुना ड्रॉप्स हे लहान बाळांमध्ये पोटातील गॅस कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे औषध आहे. हे औषध
घेतल्यानंतर बाळाला गॅस पासून होणारा त्रास कमी होत असतो. हे औषध लहान बाळांमध्ये सुरक्षितपणे वापरण्यात येऊ शकते.
फ्ल्याटुना ड्रॉप्स हा Antiflatulent आणि अँटीस्पॅस्मोडिक ड्रॉप आहे.
Antiflatulent म्हणजे पोटात तयार झालेला गॅस कमी करणारे औषध.
अँटीस्पॅस्मोडिक ( Antispasmodic) म्हणजे पोटातील दुखणे किंवा मुरडा कमी करणारे औषध.
फ्ल्याटुना ड्रॉप्स हे मेरिडियन इंटरप्राईस कंपनी ने बनवलेले औषध आहे.
फ्ल्याटुना ड्रॉप्स चे कन्टेन्ट काय आहे ? ( Content of Flatuna Drops in Marathi)
फ्ल्याटुना ड्रॉप्स चे औषध १५ मिली व ३० मिली च्या पॅकिंग मध्ये ड्रॉपर सोबत उपलब्ध असते.
फ्ल्याटुना ड्रॉप्स च्या प्रत्येक १ मिली मध्ये खालीलप्रमाणे कन्टेन्ट असतात
- Simethicone : 40 mg
- Dill Oil : 0.005 ml
- Fennel Oil : 0.0007 ml
फ्ल्याटुना ड्रॉप्स हे औषध रूम टेम्परेचर ला ठेवले पाहिजे व लहान मुलांपासून दूर ठेवावे.
लहान मुलांमध्ये गॅस होण्याचे कारणे काय असतात ?
लहान बाळांमध्ये गॅस चा प्रॉब्लेम हा खूप सामान्य आहे. बऱ्याच बाळांमध्ये पोटात गॅस असणे हे खूप सामान्य असते पण जर गॅस जास्त प्रमाणात वाढला तर बाळाला गॅस मुळे पोटदुखी चा त्रास होण्यास सुरवात होते व बाळ जोरजोराने रडते.
- हवा गिळल्याने : लहान बाळाला जेव्हा आई दूध पाजत असते त्या वेळेस जर बाळाला व्यवस्थित पकडलेले नसेल तर बाळाच्या तोंडातून दुधासोबत हवा सुद्धा पोटात शिरत असते. ही हवा पोटात जमा झाल्याने बाळाला त्रास होण्यास सुरवात होते. अश्यावेळेस बाळाला दूध पाजताना बाळाच्या आईने बाळाला नीट छातीला लावणे फार महत्वाचे असते.
- जास्त प्रमाणात रडल्याने : बाळ जास्त प्रमाणात रडल्याने, रडता रडता बाळ हवा गिळत असते त्यामुळे ती हवा पोटात फसून राहते व बाळाचा त्रास अजून वाढतो.
- अपचन : बाळाचे आतडे हे सुरवातीच्या दिवसांमध्ये पूर्णपणे विकसित झालेले नसल्याने बाळाला पाजलेले दूध पचन होण्यास त्रास होतो व पोटात गॅस चे प्रमाण वाढायला लागते.
- संसर्ग : लहान बाळाला पोटात संसर्ग झालेला असेल तर पोटात गॅस चे प्रमाण वाढू शकते.
फ्ल्याटुना ड्रॉप्स चे कार्य काय असते ? ( Action of Flatuna Drops in Marathi)
- Simethicone : Simethicone हे एक प्रकारचे अँटी गॅस औषध आहे जे पोटातील गॅस कमी करण्यास मदत करत असते. सीमेथिकने हे सरफॅक्टंट म्हणून कार्य करते ज्यामुळे पोटात जमा झालेल्या गॅस च्या फुग्याचे सर्फेस टेंशन वाढते व तो गॅस चा फुगा फुटल्याने आतड्यातून गॅस सहजपणे पास होत असतो. सीमेथीने हे रक्तात अबसॉरब होत नाही त्यामुळे ते बाळाच्या मल सोबत बाहेर पडत असते
- बडीशेप तेल : बडीशेप तेल हे बडीशेप पासून तयार केलेले असते. त्याला इंडियन डिल असे सुद्धा म्हणतात. बडीशेप तेल पोटातील मुरडा कमी करण्यास मदत करत असते.
- फेनेल तेल : फेनेल तेल हे एका जातीची बडीशेप तेल आहे. ते फेनिक्युलम वल्गेर वनस्पतीच्या बियांच्या वाफेच्या ऊर्धपातनातून मिळते. फेनेल तेल बाळाच्या पोटातील आतड्यांमधील तणाव कमी करत असते त्यामुळे बाळाची पोटदुखी कमी होते.
फ्ल्याटुना ड्रॉप्स चा डोस काय व तो कसा द्यावा ? ( Dose of Flatuna Drops in Marathi)
फ्ल्याटुना ड्रॉप्स हे लहान बाळांमध्ये वापरण्यात येणारे औषध आहे. फ्ल्याटुना ड्रॉप्स चा डोस हा खालीलप्रमाणे आहे
- ६ महिने खालील बाळांमध्ये : १० थेंब (०.५ मिली ) दर ६ तासांनी दूध पाजण्याआधी
- ६ महिने ते १२ महिने मधील बाळांसाठी : २० थेंब (१ मिली ) दर ६ तासांनी दूध पाजण्याआधी
- १ वर्ष वरील बाळांमध्ये : २० ते २५ ड्रॉप्स (१.२ मिली ) दर ६ तासांनी खाऊ घालण्याआधी
बाळाचे वय | डोस |
६ महिने खालील | ०.५ मिली दर ६ तासांनी |
६ महिने ते १२ महिने मधील | १ मिली दर ६ तासांनी |
१ वर्ष वरील | १.२ मिली दर ६ तासांनी |
फ्ल्याटुना ड्रॉप्स चे दुष्परिणाम काय आहेत ? ( Side Effects of Flatuna Drops in Marathi)
फ्ल्याटुना ड्रॉप्स मधील कन्टेन्ट आयुर्वेदिक आहेत त्यामुळे त्याचे दुष्परिणाम जास्त प्रमाणात नसतात. फ्ल्याटुना ड्रॉप्स मधील सीमेथीने हे आतड्यांमध्ये शोषले जास्त नसल्याने त्याचा दुष्परिणाम दिसून येत नाही.
फ्ल्याटुना ड्रॉप्स चे उपयोग काय आहेत ? (Flatuna Drops Uses in Marathi)
फ्ल्याटुना ड्रॉप्स चे उपयोग ( Flatuna Drops Uses in Marathi) खालीलप्रमाणे आहेत
- लहान बाळांमध्ये पोटात दुखून येणे.
- लहान बाळांमध्ये गॅस चा त्रास असेल तर
- पोटात कळ येणे.
लहान बाळांमध्ये कोलिक म्हणजे काय ?
लहान बाळांमध्ये कोलिक म्हणजे पोटात दुखून येणे व याचे कारण म्हणजे बाळाच्या पोटातील आतड्याची हालचाल कमी झाली कि पोटात गॅस जमा होण्यास सुरवात होते व त्यामुळे आतड्यातील तणाव वाढतो व बाळाच्या पोटात दुखून येते. लहान मुलांमध्ये कॉलिक चा त्रास जास्त करून संध्याकाळी होत असतो त्यामुळे त्याला इव्हीनिंग कॉलिक असे सुद्धा म्हणतात.