लहान मुलांमध्ये कोरोना आजार होण्यापासून संरक्षण होण्यासाठी आपल्या भारत देशात भरत बायोटेक ची कोवॅक्सिन व झायडस कॅडीला ची झायकोव्हाक डी या लसींना ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मान्यता देण्यात आलेली आहे.
पालकांना मुलांना देण्यात येणाऱ्या लसीबद्दल (Covid vaccine for children in marathi) माहिती असणे फार महत्वाचे असते. चला तर मग जाणून घेऊया लहान मुलांना देण्यात येणाऱ्या अँटी कोरोना लसीबद्दल आवश्यक ती माहिती.
कोरोना विरुद्ध कोणत्या लसींना मान्यता देण्यात आलेली आहे?
लहान मुलांना कोरोना विरुद्ध दोन प्रकारच्या लसींना (Covid vaccine for children in marathi) मान्यता देण्यात आलेली आहे.
१) भरत बायोटेक ची कोवॅक्सिन
२) झायडस कॅडीला ची झायकोव्हाक डी
भारत बायोटेक ची कोवॅक्सिन
कोवॅक्सिन ही लस भरत बायोटेक कंपनीने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ व्हॅरोलॉजी सोबत मिळून तयार केलेली आहे.
कोवॅक्सिन लस कसे काम करते?
कोवॅक्सिन ही एक प्रकारची इनॅक्टिव्हेटेड लस आहे म्हणजे हि लस मरण पावलेल्या विषाणूपासून बनवलेली आहे व त्यामुळे ती संसर्ग पसरवू शकत नाही. कोवॅक्सिन लस टोचून दिल्यानंतर शरीरातील प्रतिरक्षा प्रणाली त्या विषाणूला ओळखते व जरी तो विषाणू मेलेला असला तरी ती लस शरीराची रोग प्रतिकारशक्ती त्या विचाणूविरुद्ध वाढवते.
पेडिऍट्रिक कोवॅक्सिन कोणत्या वयोगटात देण्यात येते?
पेडिऍट्रिक कोवॅक्सिन २ ते १८ वर्षातील वयोगटातील मुलांना व मुलींना देण्यात येईल.
पेडिऍट्रिक कोवॅक्सिन कशी देण्यात येते?
पेडिऍट्रिक कोवॅक्सिन ही दंडामध्ये (डेल्टोईड) स्नायूमध्ये टोचून देण्यात येते.
पेडिऍट्रिक कोवॅक्सिन चे किती डोस घ्यावे लागतात?
पेडिऍट्रिक कोवॅक्सिन चे दोन डोस घ्यावे लागतात. व दोन्ही डोस मधील कमीत कमी अंतर 20 दिवस असते.
पेडिऍट्रिक कोवॅक्सिन कोणत्या तापमानात स्टोर करण्यात येते?
पेडिऍट्रिक कोवॅक्सिन २ ते ८ डिग्री या तापमानात स्टोर करण्यात येते.
कोवॅक्सिन ही १२ वर्षाखालील मुलांमध्ये वापरण्यात येणारी सर्वप्रथम लस आहे. या लसीचे ट्रायल ३ प्रकारच्या वयोगटात करण्यात आले आहे. २ ते ६ वर्ष, ६ ते १२ वर्ष,१२ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांमध्ये कोवॅक्सिन लसीची ट्रायल करण्यात आलेली आहे.या लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून ऑक्टोबरमध्ये मान्यता मिळण्याची शक्यता सुद्धा आहे.
झायडस कॅडीला ची झायकोव्हाक डी
झायकोव्हाक डी ही लस झायडस कॅडीला कंपनीने बनवलेली आहे. झायकोव्हाक डी ही जगातील सर्वप्रथम DNA लस आहे जी कोरोनाविरुद्ध वापरण्यात येते. झायकोव्हाक डी लस ही भारतात सर्वप्रथम १२ ते १७ वर्ष वयोगटात देण्यात येणारी लस आहे.
झायकोव्हाक डी लस कसे काम करते?
झायकोव्हाक डी ही एक प्रकारची प्लास्मीड DNA लस आहे. ही लस दिल्यावर शरीरात कोरोना विषाणूंवर असलेले स्पाईक प्रोटीन तयार करतात त्यामुळे शरीरातील प्रतिरक्षा प्रणाली त्या प्रोटीन ला ओळखते व शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते व कोरोना आजार होण्यापासून स्वरक्षण करते.
झायकोव्हाक डी लस कोणत्या वयोगटात देण्यात येते?
झायकोव्हाक डी १२ ते १७ वर्ष वयोगटातील मुलांना व मुलींना देण्यात येते.
झायकोव्हाक डी लस कशी देण्यात येते?
झायकोव्हाक डी ही भारतातील कोरोनाविरुद्ध सर्वप्रथम सुई विना देण्यात येणारी लस आहे. ही लस फार्माजेट प्रणालीनुसार सुई विना देण्यात येते. ही लस दोन्ही दंडामध्ये त्वचेत (इंट्राडर्मल) देण्यात येते
झायकोव्हाक डी लसीचे किती डोस द्यावे लागतात?
झायकोव्हाक डी चे ३ डोस घ्यावे लागतात व प्रत्येक डोस मध्ये चार आठवड्याचे अंतर असते म्हणजे ० दिवसाला, २८ व्या दिवसाला, ५६ व्या दिवसाला लस लावण्यात येते. परंतु एका वेळेस दोन्ही दंडामध्ये सुई नसलेल्या अप्लिकेटर चा साहाय्याने देण्यात येते.फार्माजेट प्रणालीने एका गन (बंदूक) ने दबाव करून अप्लिकेटर ने त्वचेमध्ये देण्यात येते.
झायकोव्हाक डी ही लस कोणत्या तापमानात स्टोर करण्यात येते?
झायकोव्हाक डी लस २ ते ८ डिग्री या तापमानात स्टोर करण्यात येते.
झायकोव्हाक डी ही लस जरी सुई विना देण्यात येणारी लस असली तरी ती देण्यासाठी वापरण्यात येणारी गन ही खूप महाग असते व ती बाहेरील देशातून मागवण्यात येते. तसेच त्या गन ला लावण्यात येणारे अप्लिकेटरचा हे झायडस कॅडीला कंपनी कडून पुरवठा करण्यात येणार आहे. फार्माजेट प्रणालीने देण्यात येणाऱ्या लसीमुळे सुईने होणाऱ्या गैरसोयींपासून मुक्तता होते.
कोवॅक्सिन व झायकोव्हाक डी या लसीचे काय दुष्परिणाम असू शकतात?
या लसींमुळे डोकेदुखी, ताप येणे, तसेच टोचलेल्या जांघेवर दुखून येणे किंवा सूज येणे असे दुष्परिणाम दिसून येतात. मुलाला किंवा मुलीला ताप आलेला असेल तर पॅरासिटॅमॉल १५ मिलिग्रॅम किलोग्रामप्रमाणे देण्यात यावे. हे दुष्परिणाम १ ते २ दिवसात कमी होतात.
मुलांना कोवॅक्सिन व झायकोव्हाक डी यातील कोणती लस देण्यात यावी?
सद्याच्या परिस्थितीत फक्त १८ वर्षाखालील मुले ही लस घेण्यापासून वंचित राहिलेली आहेत. त्यामुळे जी लस आपल्या परिसरात उपलब्ध असेल ती लस घेतलेली बरी.
कोवॅक्सिन व झायकोव्हाक डी या दोन्ही लस बद्दल (Covid vaccine for children in marathi) दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा लेख नक्की आपल्या मित्रांमध्ये शेयर करा.