नवजात बाळाला होणाऱ्या ७ प्रकारच्या इजा| Birth injury in Marathi

नवजात बाळ जेव्हा जन्माला येत असते त्यावेळेस नवजात बाळामध्ये जन्ममार्गात असतांना त्यांना इजा ( Birth Injury in Marathi) होऊ शकते. अश्या वेळेस नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी हे पालकांना माहित असणे फार महत्वाचे असते. चला तर मग या लेख मध्ये जाणून घेऊया नवजात बाळाला होणाऱ्या विविध इजा बद्दल आवश्यक ती माहिती.

नवजात बाळाला इजा कशामुळे होत असते? ( What causes birth injury in marathi?)

नवजात बाळाची प्रसूती होत असतांना काही वेळेस बाळ जन्ममार्गात फसल्याने बाळाला इजा होत असते. नवजात बाळाला खालील कारणांमुळे इजा होऊ शकते.

१) नवजात बाळाचे वजन प्रसूतीच्या वेळेस जास्त असेल तर ( ४ किलो पेक्षा जास्त )

२) नवजात बाळ कमी दिवसाचे जन्माला आले असेल तर

३) बाळाच्या आईचे ओटीपोट हे बाळ बाहेर येण्यासाठी लहान पडत असेल तर

४) प्रसूती होण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर

५) बाळाच्या आईच्या गर्भातील स्थिती सामान्य नसेल तर

६) आईचे वजन जास्त असेल तर

नवजात बाळाला होणारी इजा व नवजात बाळाचा जन्मदोष यातील फरक काय असतो?

नवजात बाळाला होणारी इजा ही प्रसूतीच्यावेळी बाळ जन्माला येत असते त्यावेळेस झालेली असते. तसेच नवजात बाळाचा जन्मदोष हा बाळ आईच्या गर्भात असतांना आईला संसर्ग झालेला असेल, कुटुंबात जन्मदोषाचा इतिहास असेल किंवा आईने धूम्रपान केले असेल तर दिसून येत असते.

नवजात बाळाला कोणत्या प्रकारच्या इजा सामान्यपणे होत असतात? (Birth injuries of newborn in marathi)

नवजात बाळाला जन्मावेळी होणाऱ्या इजांसाठी डॉक्टर जबाबदार नसतात. परंतु नवजात बाळाची प्रसूती होत असतांना काही समस्या येत असतात अश्या वेळी खालील प्रकारची इजा नवजात बाळाला होऊ शकते.

क्यापूट सक्सेडेनियम

नवजात बाळ आईच्या जन्ममार्गतून बाहेर येत असतांना बाळाच्या कवटीवर दबाव येत असतो. यामुळे नवजात बाळाच्या डोक्याच्या मागील भागावर सूज येत असते. या डोक्याच्या आलेल्या सूज ला क्यापूट सक्सेडेनियम असे म्हणतात. नवजात बाळाच्या डोक्यावरील सुजेमुळे बाळाला काही त्रास होत नसतो.

डोक्यावरील ही सूज काही दिवसात कमी होत असते. बऱ्याचदा नॉर्मल प्रसूती होत असतांना बाळाच्या डोक्यावर व्हॅक्युम पंप लावण्यात येत असतो. अश्या बाळांमध्ये अश्या प्रकारची सूज दिसून येऊ शकते.

सेफलहेम्याटोमा

सेफ़ल म्हणजे बाळाच्या कवटीवर व हेम्याटोमा म्हणजे रक्त गोठणे म्हणून या नावावरूनच तुम्हाला समजून आले असेल की नवजात बाळाच्या कवटीवर गोठलेल्या रक्तामुळे आलेली सूज असते. हे गोठलेले रक्त फक्त कवटीच्या वरच्या भागावर असते व ते टाळूवर पसरत नसते. जन्मानंतर काही तासांमध्ये सेफलहेम्याटोमा दिसून येत असतो.

गोठलेले रक्त असल्याने ते हळूहळू शोषले जाते व डोक्यावरील सूज कमी होत असते. सूज च्या आकारानुसार सेफलहेम्याटोमा कामी होण्यासाठी दोन आठवडे ते तीन महिने वेळ लागू शकतो. हा रक्तश्राव आईच्या गर्भमार्गातून बाळ बाहेर येत असतांना होत असतो. काही वेळेस सूज मोठी असली तर गोठलेल्या रक्तातील लाल पेशी खंडित होत राहिल्याने बाळाचा कावीळ वाढण्याची शक्यता असते.

Cephalhematoma in newborn

चेहऱ्यावर जखम होणे

काही नवजात बाळांमध्ये डोक्यावर तसेच चेहऱ्यावर जखम दिसून येत असते. याचे मुख्य कारण म्हणजे बाळ आईच्या गर्भातून बाहेर येत असतांना आईच्या ओटीपोटाच्या संपर्कात आल्याने अश्या जखमा होत असतात. काही वेळेस बाळाची प्रसूती करत असतांना चिमटा वापरण्यात येत असतो. त्यामुळे सुद्धा बाळाच्या चेहऱ्यावर जखम होऊ शकते. परंतु चिमटा वापरण्याचे प्रमाण सध्या फारच कमी झालेले आहे.

डोळ्यांवर लालसरपणा येणे

प्रसूती होत असतांना बाळाच्या डोळ्यातील रक्तवाहिन्या फुटल्याने डोळ्यात रक्तस्त्राव होत असतो त्यामुळे बाळाच्या डोळ्यांचा पांढरा भाग हा लालसर होत असतो. डोळे लाल होणे हे नवजात बाळांमध्ये खूप सामान्य आहे. यामुळे डोळ्याला इजा होत नसते तसेच डोळ्यात आलेला लालसरपणा हा ८ ते १० दिवसात कमी होत असतो.

फ्रॅकचर होणे

नवजात बाळाची प्रसूती होत असतांना बाळाच्या मानेखालील असलेले आडवे हाड म्हणजे क्लॅव्हिकल चे फ्रॅकचर होत असते. या हाडाला क्वालर बोन असे सुद्धा म्हणतात. फ्रॅकचर झाल्याने बाळ त्या बाजूला हाथ हलवू शकत नाही. हे फ्रॅक्चर काही न करता बरे होत असते.

फ्रॅक्चर झालेल्या जागेवर नवीन हाड येत असल्याने त्या जागेवर पहिल्या ८ ते १० दिवसात सूज आल्यासारखे दिसून येत असते. बाळाला या फ्रॅक्चर चा त्रास होत असेल अश्या वेळेस बाळाच्या हाथाची हालचाल थांबवण्यासाठी हाताला बँडेज लावण्यात येत असते.

चेहऱ्याचा पॅरालीसीस

बाळ ज्या वेळेस आईच्या गर्भमार्गातून बाहेर येत असते त्यावेळेस चेहऱ्यावर आलेल्या दबावामुळे फ्यासिअल नस दाबली गेल्याने चेहऱ्याचा पॅरालीसीस होत असतो. बाळ ज्या वेळेस रडत असते त्या वेळेस बाळाला फेशियल पॅरालीसीस असल्याचे समजून येत असते कारण बाळाच्या पॅरालीसीस असलेल्या भागाची हालचाल होत नसते व डोळे सुद्धा बंद होत नसतात.

फेशियल नसेवर कमी प्रमाणात दबाव आल्याने फेशियल पॅरालीसीस झालेला असेल तर तो काही आठवड्यात बारा होत असतो परंतु फॅसिअल नस जर तुटलेली असेल तर टी जोडण्यासाठी ऑपरेशन ची गरज पडत असते.

ब्रॅकीयल पॅरालीसीस

बाळ आईच्या गर्भातून बाहेर येत असतांना खांद्यातील असलेल्या नासाच्या जाळ्याला इजा झाल्याने ब्रॅकीयल पॅरालीसीस होत असतो. बाळाचा खांदा आईच्या गर्भमार्गात फसल्याने हा पॅरालीसीस होऊ शकतो या आजारात बाळ आपला हाथ जवळ घेऊ शकत नाही तसेच गोल फिरवत सुद्धा येत नाही.

नसांवर काही प्रमाणात सूज आल्याने झालेला पॅरालीसीस काही महिन्यात बारा होत असतो. परंतु नस जर तुटलेली असेल तर ही इजा कायमची असते.

वरील प्रकारच्या इजा या सौम्य असतात व जास्त प्रमाणात दिसून येत असतात.

पालकांना आपल्या बाळाला इजा (Birth injury in marathi)होणे हे कदापि मान्य नसते परंतु काही अनावश्यक कारणांमुळे नवजात बाळाला इजा होत असते. त्यामुळे पालकांनी अश्या वेळेस खंबीर असणे फार महत्वाचे असते कारण त्यांना बाळाची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक असते.

Rate this post

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

Leave a Comment