आपल्या मुलाला अधिक फळ व पालेभाज्या कशा खाऊ घालाव्यात

एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे कि पालकांसोबत जेवण केल्याने लहान मुले जेवणासोबत फळे व भाज्या जास्त प्रमाणात खात असतात.

एका प्रयोगात असे दिसून आले आहे की लहान मुले पालकांसोबत टेबलावर जेवत असताना दहा मिनिट अधिक जेवणासाठी थांबले म्हणजे एकूण 25 ते 30 मिनिट जेवणासाठी थांबले तर ते फळ व पालेभाज्या जास्त प्रमाणात खात असतात. त्यांनी सुमारे 100 ग्रॅम जास्त फळ किंवा पालेभाजी खाल्ली असे या प्रयोगात दिसून आले. कापून ठेवलेली फळे व सॅलड हे लहान मुलांच्या जेवणात असणे फार महत्त्वाचे असते. या अभ्यासाचे निकष यु एस जर्नल जामा नेटवर्क ओपन मध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहेत.

palakansobat jevan

या प्रयोगाचे सार्वजनिक आरोग्यासाठी फार महत्त्व आहे कारण जेवणामध्ये फळ व भाज्यांचा समावेश केल्यामुळे कार्डिओ मेटाबोलिक रोगाचा धोका सहा ते सात टक्क्यांनी कमी होतो. मॅग्नम विद्यापीठातील आरोग्य मानसशास्त्राचे प्राध्यापक जटा माता स्पष्ट करतात की अशा प्रभावासाठी लहान मुलांच्या जेवणासोबत कापलेले फळ व भाज्यांचा समावेश असणे आवश्यक असते

या प्रयोगामध्ये 50 पालकांच्या जोड्या व 50 मुले असा समावेश होता पालकांचे सरासरी वय 43 वर्ष व मुलांचे सरासरी वय आठ वर्ष होते मुले व मुलींनी सारख्या संख्येने या प्रयोगात सहभाग नोंदवलेला होता. जेवणात त्यांना भाजी पोळी सोबत फळांचे तुकडे सुद्धा वाढण्यात आलेले होते.आई-वडिलांनी त्यांच्या मुलांसोबत जेवण केल्याने त्या मुलांनी जास्त आहार घेतलेला होता व त्यांना वाढण्यात आलेले फळांचे तुकडे सुद्धा खाल्लेले होते. या अभ्यासात असेही दिसून आले की पालकांसोबत जेवण केल्यामुळे लहान मुलांनी ब्रेड व इतर फास्ट फूड सुद्धा खाणे टाळले होते. अशा प्रकारे कौटुंबिक जेवणाची पद्धती ही लहान मुलांचा आहार वाढवण्यासाठी फायद्याची असते.

कुटुंबासोबत जेवण केल्याने लहान मुलांची भूक भागते व लहान मुलांमध्ये लठ्ठपणा होण्याचा धोका सुद्धा कमी असतो. तसेच आई वडील व मुलांमधील बंध सुद्धा घट्ट होतो.

कुटुंबासह एकत्र जेवणाचे फायदे

  1. आई वडील व मुलांमधील बंध घट्ट होतो तसेच लहान मुले स्वतःला सुरक्षित मानतात.
  2. लहान मुलांमध्ये मन्नेर्स म्हणजे शिष्टचार तसेच मुलांमध्ये संवाद करण्याची पद्धत विकसित होते.
  3. लहान मुलांची वाढ योग्यप्रकारे होत असते.
  4. लहान मुलांमध्ये पोट भरून खाण्याची इच्छा निर्माण होत असते.
Rate this post

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

Leave a Comment