नवजात बाळाच्या आगमनाने आई-वडील खूप खुश असतात परंतु अचानक दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून बाळाच्या अंगावर पिवळसरपणा वाढायला ( Newborn Jaundice in marathi) लागतो. त्यामुळे आई-वडील घाबरून जातात पण अशावेळी घाबरून न जाता आपल्या बालरोगतज्ञ यांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
बाळाच्या अशा पिवळसर पणाला नवजात शिशुचे कावीळ (Newborn jaundice in marathi) असे म्हणतात. अशावेळी काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे असते .त्यासाठी हा लेख पूर्णपणे समजून घ्या व आपल्या मनातील सर्व शंकांचे निरसन करा जेणेकरून तुम्ही खंबीर राहाल व घाबरून न जाता बाळाची व्यवस्थित काळजी घ्या.
नवजात कावीळ म्हणजे काय ? (What is Newborn Jaundice in marathi ?)
नवजात बाळाची त्वचा व डोळे यावर पिवळसरपणा येणे. हा पिवळसरपणा येण्याचे कारण म्हणजे बाळाच्या रक्तातील बिलिरुबिन या पदार्थांचे प्रमाण खूप वाढणे हे असते.
बिलिरुबिन हे नवजात बाळाच्या लाल रक्तपेशींच्या विघटनामुळे वाढत असते. नवजात बाळाचे यकृत हे पहिल्या काही दिवसात अपरिपक्व असते .याचे मुख्य कार्य आहे बिलीरुबिन आतड्यामार्फत बाहेर टाकण्याचे असते. परंतु यकृत अपरिपक्व असल्याने बिलिरुबिन हे रक्तातच वाढण्यास सुरुवात होते व नवजात बाळाचा कावीळ वाढतो.
नवजात बाळाचे कावीळ (Newborn jaundice in marathi) हे खूप सामान्य असते जवळपास अपुऱ्या दिवसांच्या बाळाला हे होण्याचे प्रमाण 70 टक्के असते व पूर्ण दिवसांच्या काळात हे प्रमाण 60 टक्के इतके असते
नवजात बाळाला कावीळ कोणत्या कारणांमुळे होतो? (What are causes of Newborn Jaundice in marathi?)
नवजात बाळाला कावीळ होण्याचे कारण म्हणजे
- बाळ जर कमी दिवसांचे जन्माला आले असेल तर,
- बाळाला आवश्यक तेवढे दूध पिण्यास मिळत नसेल तर
- जर बाळाचा रक्तगट हा आईचा रक्तगटाची सुसंगत नसेल तर,
नवजात बाळाचा रक्तगट हा आईचा रक्तगटाची सुसंगत नसेल तर ,त्यामुळे बाळाच्या रक्तात अँटीबॉडी तयार होत असतात. ज्या बाळाच्या रक्तातील लालपेशींवर हल्ला करून त्यांचा नायनाट करतात. ज्यामुळे बाळाच्या रक्तातील बिलीरुबिनचे प्रमाण खूप प्रमाणात वाढते.
नवजात बाळाच्या कावीळ चे काय लक्षणे असतात ? (What are symptoms of Newborn jaundice in marathi?)
प्रथम बाळाच्या काविळीचे लक्षण म्हणजे बाळाच्या त्वचेवर व डोळ्यांवर पिवळसरपणा येणे हा पिवळसरपण वयाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून वाढण्यास सुरुवात होते.
सर्वप्रथम हा पिवळसरपणा चेहऱ्यावर दिसून येतो नंतर छातीवर ,पोटावर हात पायांवर व शेवटी पंजे तळव्यांवर दिसून येतो बाळाचे कावीळ हे तीन ते सात दिवसांमध्ये वाढत असते व नंतर यकृत काम करू लागल्याने व बाळाने व्यवस्थित दूध पिण्याने हे प्रमाण आठ ते दहा दिवसांपर्यंत कमी होते.
काहीवेळेस नवजात बाळाच्या रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण साधारणपणे वाढलेले असेल तर त्याचा अनिष्ट परिणाम बाळाच्या मेंदूवर होऊ शकतो. या स्थितीला कर्णीॲक्टरस (Kernicterus in marathi) असे म्हणतात. अशा वेळी बाळ जोरजोरात राहणे बाळाच्या स्नायूंचे टोन वाढणे फिट येणे असे प्रकार दिसून येतात.
- बाळाला पिवळी लघवी होणे.
- बाळ आईचे दूध व्यवस्थित पीत नसणे.
- बाळ हे गुंगलेले असणे.
- बाळाला ताप येणे.
अशी लक्षणे दिसल्यावर लगेच बालरोग तज्ज्ञ यांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
नवजात बाळाच्या काविळीचे निदान कसे केले जाते ? (How newborn jaundice is diagnosed in marathi?)
नवजात बाळाच्या काविळीचे निदान डॉक्टर बाळाच्या शरीरावर आलेल्या पिवळसर पणाने करतात ही तपासणी करण्यासाठी डॉक्टर बाळाचे कपडे काढून चांगल्या प्रकाशात पिवळसर पणा किती ठिकाणी पसरलेला आहे हे बघतात.
तसेच बाळाच्या डोळ्यातील स्केलराची (डोळ्यातील पांढरा भागाची) तपासणी सुद्धा करतात तो पण पिवळा झालेला असेल तरीसुद्धा बाळाला कावीळ झाल्याचे निदान होते. काही वेळेस डॉक्टर बाळाच्या मूत्र व शौचालयाच्या रंगाविषयी सुद्धा विचारपूस करू शकतात.
रक्ताच्या चाचण्या – जर डॉक्टरांना तपासणीवर बाळाला कावीळ झाला आहे व ते जास्त प्रमाणात आहे असे वाटले, तर ते बाळाच्या रक्ताच्या तपासण्या करण्यास सांगू शकतात.
जर कावीळ हे कमी प्रमाणात असेल, तर डॉक्टर रक्ताची तपासणी करणे टाळू शकतात या रक्ताच्या तपासण्यांमध्ये मुख्यतः सीरम बिलीरुबिन, ब्लड ग्रुप या तपासण्या केल्या जातात त्यामुळे बाळाचा का वेळ किती वाढलेला आहे हे समजून येते.
काही हॉस्पिटल्समध्ये बाळाचे बिलीरुबिन हे ट्रान्सक्युट एनिअस बिलिरुबिन बॅटरी तपासले जाते ज्यात त्या मशीन मधून बाळाच्या त्वचेवर प्रकाशाचे किरण सोडले जातात व किती प्रकाशाच्या त्वचेतून रिफ्लेक्ट होतो किंवा किती प्रकाश त्यात वरचे शोषला जातो यावरून बाळाच्या शरीरातील बिलिरुबिन चे प्रमाण मोजले जाते
काही वेळेस आई व बाळ यांचा रक्तगट समान असेल जास्त करून जर आईचा रक्तगट निगेटिव्ह असेल व बाळाचा रक्तगट पॉझिटिव्ह असेल अशावेळी कुंब टेस्ट करण्यात येते या टेस्टमध्ये बाळाच्या रक्तात काही विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज आहेत का हे तपासले जाते या अँटीबॉडीज बाळाच्या लाल पेशींचा नायनाट करतात व त्यामुळे रक्तातील बिलिरुबिन चे प्रमाण वाढते
नवजात बाळाला होणार्या काविळीचे उपचार काय असतात ? (What is treatment of Newborn jaundice in marathi?)
जर नवजात बाळाला कावीळ झालेले असेल व रक्तातील बिलिरुबिन हे 15 मिलिग्रॅम पेक्षा जास्त असेल व बाळ नीट दूध पीत नसेल तर बाळाला आयसीयूमध्ये भरती करावे लागू शकते.
पण बऱ्याचदा बाळाचे कावीळ इतके वाढलेले नसते अशा वेळी घरीच व्यवस्थित बाळाची काळजी घेतली तर बाळ काही दिवसात कावीळ मुक्त होऊ शकते.
सूर्यप्रकाश (Sunlight for jaundice in marathi)
सर्वात स्वस्त व मुबलक प्रमाणात उपलब्ध असा उपचार म्हणजे सूर्यप्रकाश. नवजात बाळाला जर कावीळ झालेला असेल तर सकाळचे कोवळे ऊन दाखविणे फायद्याचे असते. या कोवळ्या उन्हात बाळाला पंधरा ते वीस मिनिटं ठेवल्याने बाळाच्या रक्तातील बिलीरुबिन चे विघटन होऊन मूत्रमार्गात द्वारे बाहेर टाकण्यात येते. सूर्यप्रकाश दाखविताना सकाळचे उन दाखवावे. 8 वाजेनंतरचे उन दाखवू नये कारण या उन्हामुळे बाळाच्या शरीरातील पाणी कमी होऊ शकते. त्यामुळे बाळ सुस्त पडू शकते.
फोटोथेरपी (Phototherapy for jaundice in marathi)
ज्या बाळांना एन आय सी यु मध्ये भरती करण्याची वेळ येते त्यांना पेटीत ठेवून विशिष्ट निळा रंगाचा प्रकाश देण्यात येतो. तो देत असताना बाळाचे डोळे व गुप्तांग झाकून ठेवण्यात येते. कारण बाळाच्या डोळ्यांच्या रेटिना ला इजा होऊ नये व त्वचेचा आजार होऊ नये म्हणून ते झाकून ठेवण्यात येते. फोटो थेरपीने दोन ते तीन दिवसात बाळाचे कावीळ कमी होते.
एक्सचेंज ट्रान्स फ्युजन (Exchange Transfusion for jaundice in marathi)
जर बाळाचे कावीळ अति प्रमाणात वाढले असेल तर रक्त संक्रमणाचे गरज भासू शकते ह्या बाळाच्या रक्तातील बिलीरुबिन पूर्णपणे कमी होईपर्यंत बाळाचे रक्त संक्रमित केले जाते व त्यामुळे बाळाचा जीव सुद्धा वाचतो
आईचे दूध (Mothers milk for jaundice in marathi)
जर तुमच्या बाळाच्या बिलीरुबिन हे कमी असेल तर तुम्ही घरीच बाळाचे नीट काळजी घेऊन बाळाचा कावीळ कमी करू शकतात. त्यासाठी तुम्हाला बाळाला दर दोन तासांनी दूध पाजणे महत्त्वाचे असते सोबतच सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश दाखविला तर बाळाचे कावीळ कमी होण्यास मदत होते