लहान मुलांमध्ये बद्धकोष्टता ( Constipation in children in marathi ) खूप सामान्य आजार असतो. बद्धकोष्ठता असलेली मुले क्वचितच व कडक शी करत असतात. कडक शी होत असल्याने त्यांना शी करतांना खूप त्रास होतो व त्यामुळे पालक सुद्धा परेशान होऊन जातात. चला तर मग करून घ्या तुम्हाला असलेल्या बद्धकोष्टतेबद्दल सर्व शंकांचं निरसन.
बद्धकोष्ठता म्हणजे काय ? (What is constipation in children in marathi?)
लहान मुलांमधील बद्धकोष्ठता म्हणजे लहान मुलाने कडक शी करणे व खूप कमी वेळा शी करणे हे होय.
लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठतेची लक्षणे काय असतात ?
लहान मुलांमध्ये खालील प्रकारची लक्षणे बद्धकोष्ठतामध्ये दिसून येतात.
- जर मुले आठवड्यातून तीन वेळेस किंवा कमी वेळेस शी करत असतील.
- मुलाला जर कोरडी कडक शी होत असेल व त्यामुळे त्याला शी करतांना दुखून येत असेल.
- शी करण्याआधी पोटामध्ये दुखून येत असेल.
- बाळाच्या पॅन्ट मध्ये कोरड्या शी” च्या खुणा दिसून येत असतील.
- शी करताना रक्त पडत असेल.
- शी करण्याआधी जास्त प्रमाणात रडणे.
शी होण्यासाठी बाळाला दुखून येत असल्याने ते शी करण्यास घाबरतात. त्यामुळे ते शी रोखून ठेवतात आणि जेव्हा बाळ कडक शी करत असते, तेव्हा ते दोन्ही पाय जवळ घेते व चेहरा एकदम वेडावाकडा करते. असे काही लक्षणे बाळामध्ये दिसून आली तर बाळाला बद्धकोष्ठता (Constipation in children in marathi) आहे असे समजावे.
लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता होण्याची कारणे काय असतात ?
बद्धकोष्ठतेचे मुख्य कारण म्हणजे बाळाच्या शरीरातील मल मोठ्या आतड्या- मधून खूप हळुवार पुढे सरकत असतो व मोठ्या आतड्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी शोषले जात असते. त्यामुळे तो पुढे सरकतांना अजून कोरडा होतो.
बद्धकोष्ठता होण्याची बरीच कारणे असतात. परंतु मुख्यतः खालील कारणांमुळे लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता होऊ शकते.
- शी थांबवून ठेवणे – बाळाला शी लागलेली असेल तरी ते शी थांबवून ठेवते कारण शी करत असताना त्रास होईल याची भीती असल्याने व आपले खेळणे थांबवण्याची इच्छा नसल्याने बाळ असे करू शकते. काही मुलांना घराबाहेरील टॉयलेटमध्ये शी करणे आवडत नसते, त्यामुळे ते शी लागलेली असेल तरी ती थांबवून ठेवतात. जर बाळाला कडक शी झाल्याने बाळाच्या शी च्या जागेवर जखम होते व पुढील वेळेस त्या जखमेवरून शी पुढे सरकतांना बाळाला दुखून येते व ते पुन्हा शी करणे थांबवते आणि असे चक्र(कृती) वारंवार चालू राहते.
- जेवणामध्ये योग्य तो आहार नसणे – लहान मुलांच्या खाण्यात फायबरचा वापर कमी प्रमाणात असणे म्हणजे हिरव्या भाज्या किंवा फळांचा वापर कमी असल्याने शी नरम किंवा मऊ होत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. शक्यतोवर असा त्रास आपण जेव्हा बाळाला पातळ गोष्टींपासून घट्ट पदार्थ देण्यास सुरुवात करतो अशा वेळेस होतो.
- टॉयलेट ट्रेनिंग व्यवस्थित न झाल्याने – बऱ्याचदा आई-वडील बाळाला टॉयलेट ट्रेनिंग देतात परंतु ते देत असताना बाळावर जर चिडचिड केली तर बाळ त्यामुळे घाबरून जाते वर्षी थांबवून ठेवते. टॉयलेट ट्रेनिंगचा सामान्य वेळ ही 18 महिने ते 24 महिने असतो. तरी प्रत्येक बाळ हे वेगवेगळे असल्याने काही बाळ लवकर प्रशिक्षित होतात. तर काहींना उशीर लागतो. म्हणून पालकांनी बाळावर चर्चा न करता त्याला सोप्या भाषेत समजावून सांगितले तर ते लवकर प्रशिक्षित होऊ शकतात.
- दुधाचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने– बराच बाळांना गाईचे किंवा म्हशीचे दूध हे जास्त प्रमाणात दिल्याने काही वेळेस बाळाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
- मुलांचा नियमितपणा बदलल्याने– लहान मुलांमध्ये काही जागा बदल झाल्याने वातावरण बदलामुळे त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो बरेचदा लहान मुले जेव्हा शाळेत जाण्यास सुरुवात करतात त्यावेळेस भीतीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होऊ शकतो. जर घरातील कोणाला म्हणजे आई वडील यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर मुलाला सुद्धा अनुवंशिकतेमुळे हा त्रास होऊ शकतो
- अन्य इतर आजार असेल तर – काही वेळेस मुलाच्या शी च्या जागेवर विकृती असेल किंवा आतड्यांचा आजार असेल, हायपोथायरॉईडीझम मध्ये सुद्धा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.
लहान मुलांमध्ये कॉन्स्टिपेशनचे निदान कसे करण्यात येते ?
मुलाला असणाऱ्या लक्षणांवरून व त्याच्या आधीच्या हिस्ट्री वरून आणि बाळाच्या तपासणीवरून डॉक्टर बाळाला बद्धकोष्ठता असल्याचे निदान करतात. तसेच ते निदान निश्चित करण्यासाठी खालील प्रकारच्या तपासण्या करण्यात येऊ शकतात.
- डिजिटल रेक्टल तपासणी – या तपासणीमध्ये डॉक्टर ग्लोज घालून गुरुद्वाराची तपासणी करतात त्यामुळे त्यांना त्या भागात काही विकृती तर नाही ना हे समजून येते किंवा बऱ्याचदा कडक शी त्या जागेवर फसलेली सुद्धा असते हे या तपासणीमुळे समजून येते.
- पोटाचा एक्स-रे – पोटाच्या एक्स-रे मध्ये आतड्यांमध्ये किती प्रमाणात शी जमा झालेली आहे हे समजून येते.
- बेरियम एनिमा – ही तपासणी या आतड्यांमधील अडथळा ओळखण्यासाठी करण्यात येत असते. यात बाळाच्या गुरुद्वारात बेरियम नावाचा डाय सोडण्यात येतो व बाळाच्या पोटाचा एक्स-रे काढण्यात येतो. बेरियम हा एक रेडिओग्राफिक कॉन्ट्रास्ट एजंट असल्याने बाळाच्या आतड्यांमधील डाय त्या एक्स-रे वर दिसून येतो.
- रेक्टल बायोप्सी – या तपासणीमध्ये गुदद्वाराजवळील जागेचा छोटासा तुकडा घेण्यात येत असतो व तपासण्यात येतो. काही वेळेस बाळाला हर्षप्रन्ग डिसीज असल्याची शंका डॉक्टरांना आली तर ही तपासणी करण्यात येऊ शकते.
- सिग्माइडोस्कोपी,कोलोनोस्कोपी – बाळाच्या मोठ्या आतड्यामध्ये कुठे सूज आलेली आहे कां? आतड्यांमध्ये गाठ तयार झालेली असेल किंवा कोणत्या भागातून रक्तस्त्राव होत आहे हे या तपासणीमध्ये समजून येते. ही तपासणी बाळाच्या गुदद्वारातून दुर्बीण सोडून करण्यात येते.
- रक्ताची तपासणी – बाळाला थायराइड किंवा काही मेटाबोलिक समस्या, लघवीतील संसर्ग ओळखण्यासाठी रक्ताच्या तपासण्या करण्यात येऊ शकतात.
नक्की वाचा बाळाला शी ची जागा नसणे
लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठतेचा उपचार काय असतो ?
लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता न होण्यासाठी नेहमी आई-वडिलांनी प्रयत्न करायला पाहिजे. त्यामुळे बद्धकोष्ठतेमुळे मुलाला होणारा त्रास कमी होईल खालील काही उपाय केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
- भरपूर प्रमाणात पाणी पाजावे –
बाळाला भरपूर प्रमाणात पाणी पाजल्याने बाळाच्या आतड्यामधील मल पुढे सरकण्यास मदत होते. एक वर्षाखालील बाळांना फळांचा रस पाजल्याने सुद्धा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. लहान मुलांनी जवळपास चार ते पाच ग्लास पाणी पिणे अत्यावश्यक असते. त्यामुळे त्यांची पचन प्रक्रिया सुद्धा सुरळीत होत असते.
- जेवणात फायबरचा समावेश करणे –
फायबर म्हणजे तंतुमय असलेल्या अन्नाचा जसे फळे, हिरव्या पालेभाज्या, पत्ताकोबी चा वापर जेवणात केल्याने बद्धकोष्ठता होण्याचा त्रास कमी होतो. या फायबर असलेल्या पदार्थांमुळे शी नरम किंवा मऊ होण्यास मदत होते. मैदा असलेले पदार्थ म्हणजे बिस्किट, ब्रेड,नूडल्स,जंकफूड मुळे बद्धकोष्ठतेचा त्रास हा वाढू शकतो. कारण मैदा हा पचायला जड असतो फायबर असलेल्या जेवणासोबत नेहमी दिवसातून भरपूर वेळेस पाणी पिल्याने बद्धकोष्ठता हळुवार कमी होण्यास सुरुवात होते.
- जेवणाचा विशिष्ट नियमित कार्यक्रम असायला हवा –
जेवणाच्या वेळा ह्या ठरलेल्या पाहिजे कारण त्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे बाळाच्या शाळेच्या वेळेनुसार हा जेवणाचा कार्यक्रम ठरवणे महत्त्वाचे असते. फायबर असलेले पदार्थ जसे हिरव्या भाज्या, कच्चे सलाड, सर्व प्रकारचे फळे खाणे फार आवश्यक असते.
- नियमित टॉयलेट ट्रेनिंग करावे.–
दररोज सकाळी उठल्यावर मुलाला शी करण्यासाठी टॉयलेटमध्ये पाठवावे व त्याला पूर्णपणे पोट साफ झाल्यावरच बाहेर पडण्यास सांगावे व असे करतांना त्याला घाई करू नये. जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ त्याला टॉयलेटमध्ये बसू द्या. ही सवय रोज लावणे गरजेचे असते व हे करत असताना त्याला खाली बसूनच (स्क्वाटिंग पोझिशन) मध्ये शी करण्यास सांगावी जर तुमच्या मुलाने असा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. तर त्याला आठवड्यातून एकदा त्याच्या आवडीचे बक्षीस द्यावे. असे केल्याने मुलाचा त्रास सुद्धा कमी होईल व त्याला टॉयलेट ट्रेनिंगची सवय सुद्धा लागेल.
- नियमित व्यायाम करणे –
नियमित व्यायाम केल्याने बाळाची पचनक्रिया सुरळीत होते. त्यामुळे तुमच्या बाळाला भरपूर प्रमाणात मैदानी खेळ खेळू द्यावे.
वरील सर्व उपाय करून सुद्धा बाळाचा त्रास कमी होत नसेल किंवा बाळाला अति जास्त प्रमाणात त्रास होत असेल तर आपल्या बालरोग तज्ज्ञांशी संपर्क करावा. ते बाळाची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यावर त्याला काही औषधी (लॅक्झीटिव्ह) देऊ शकतात पण अशावेळी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे फॉलोअप ठेवणे खूपच गरजेचे असते.
बद्धकोष्ठता मुळे कोणत्या समस्या येऊ शकतात ?
बद्धकोष्ठतेमुळे बाळामध्ये खालील समस्या दिसून येतात.
- भूक न लागणे किंवा कमी प्रमाणात भूक असणे.
- पोट नेहमी भरलेले वाटणे.
- शी होताना किंवा झाल्यावर काही प्रमाणात रक्त जाणे.
- बाळाच्या अंर्तवस्त्राला शी लागलेली असणे.
- वारंवार लघवीचा संसर्ग होणे याचे मुख्य कारण म्हणजे बाळाला शी करण्यास त्रास होत असल्याने बाळ लघवी करण्यास सुद्धा घाबरते. त्यामुळे लघवी तुंबून राहिल्याने त्याचा संसर्ग होतो.
वरील सर्व गोष्टी समजून घेतल्यावर तुम्ही तुमच्या बाळाला झालेला बद्धकोष्ठतेचा त्रास स्वतः कमी करू शकतात. गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची.
2 thoughts on “लहान मुलांमधील बद्धकोष्टता | Constipation in Children in Marathi”