बाळ जन्माला आले की आई-वडील बाळाच्या तब्येतीची खूप काळजी घेतात. तरी पण काही वेळेस काही गोष्टी नकळत बाळाला होऊन जातात, त्यातले एक म्हणजे डायपर रॅश (बाळाची शी ची जागा लाल होणे)
डायपर रॅश म्हणजे काय ? (what is Diaper Rash in Children in Marathi?)
बाळाच्या पार्श्वभागावर लाल चट्टे येणे (बाळाची शी ची जागा लाल होणे) याला डायपर रॅश असे म्हणतात.
डायपर रॅशला कॉन्टॅक्ट डर्मटायटिस ( Contact Dermatitis) किंवा डायपर डर्मटायटिस (Diaper Dermatitis) असे सुद्धा म्हणतात. सामान्यतः जवळपास 30 ते 40 टक्के बाळांमध्ये डायपर रॅश दिसून येते. जन्मानंतर पहिल्या आठवड्यात डायपर रॅश येऊ शकते तसेच तीन वर्षाच्या बाळा पर्यंत सुद्धा याला डायपर रॅश दिसून येते.
डायपर रॅश कशामुळे होते ?
डायपर रॅशच्या नावा मध्येच हे होण्याचे कारण लपलेले आहे. डायपरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर बाळाच्या पार्श्वभागाची जागा लाल होते म्हणूनच डायपर रॅशला कॉन्टॅक्ट डर्मटायटिस असे सुद्धा म्हणतात.
- जेव्हा बाळ डायपर मध्ये सू” किंवा शी” करते त्यावेळेस त्यातील काही पदार्थांमुळे जा त्या जागेवरील त्वचा इरिटेट होण्यास सुरुवात होते व त्या जागेचा लालसरपणा वाढतो.
- बाळाने लघवी केल्यावर व डायपर ओव्हरफ्लो झाले की,ती जागा ओलसर राहते त्यामुळे सुद्धा त्या जागेवर लालसरपणा येतो.
- डायपरची साईज जर कमी असेल तर ते नेहमी बाळाच्या त्वचेला स्पर्श करत राहते त्यामुळे तेथील जागा इरिटेट होते व लाल पडते.
- डायपरच्या जागेवर जर फंगसचा संसर्ग झाला असेल, तरी सुद्धा ती जागा लाल पडते. मुख्यतः कँडिडा नावाचा फंगस हा संसर्ग पसरवतो.
- जर बाळाला डायपर मध्ये वापरात येणाऱ्या डायची किंवा लंगोट धुतांना वापरात येणाऱ्या साबणाची ऍलर्जी असेल तर अशी रॅश दिसून येते.
डायपर डर्मटायटिसची लक्षणे काय असतात ?
डायपर डर्मटायटिसचीची (बाळाची शी ची जागा लाल होणे) लक्षणे ही त्याच्या अलग अलग कारणांनी दिसून येतात.
- कॉन्टॅक्ट डायपर डर्मटायटिस
ज्या जागेवर डायपरचा स्पर्श होतो त्या त्या जागेवर लालसरपणा व चकाकी दिसून येते तो लालसरपणा बेंबीच्या खाली सुद्धा पसरतो. त्यात बाळाने वारंवार शी केल्याने बाळाची शी ची जागा लाल होते व त्यामुळे बाळाला दुखत असल्याने बाळ रडत राहते
- कँडिडा डायपर डर्मटायटिस
यात बाळाच्या पार्श्वभागावर भडक लाल रंगाचे चट्टे आलेले असतात व अशावेळेस बाळाच्या तोंडामध्ये पांढरे चट्टे सुद्धा दिसून येतात.
- सेबोरिक डायपर डर्मटायटिस-
बाळाच्या पार्श्वभागावर लाल पिवळे चट्टे दिसून येतात व घाम येणार्या भागात म्हणजे काखेत, जांघेत सुद्धा असे चट्टे दिसून येतात यात बाळाच्या चेहऱ्यावर सुद्धा लाल चट्टे दिसून येतात.
डायपर रॅशचे निदान कसे केले जाते ?
डॉक्टर डायपर रॅशचे निदान हे तपासणीने करतात. निदान करण्यासाठी इतर तपासण्याची गरज नसते. काही वेळी बाळाला वारंवार त्या जागेवर चट्टे येत असतील तर शीची तपासणी ( Stool examination) करण्यास डॉक्टर सांगू शकतात.
डायपर रॅशचे उपचार काय आहेत ?
1. सर्वात महत्वाचे म्हणजे स्वच्छता. बाळाच्या डायपर ची जागा स्वच्छ ठेवावी व लगेच कोरडी करून घ्यावी. बाळाची काळजी घेत असतांना आधी साबणाने हात स्वच्छ धुऊन घ्यावे. जेणेकरून बाळाला अजून दुसरा संसर्ग होणार नाही.
2. अँटी फंगल डस्टिंग पावडर- अँटी फंगल डस्टिंग पावडरचा वापर काखेत, मानेखाली सुद्धा करता येतो त्यामुळे तेथील फंगल संसर्ग कमी होण्यास मदत होते.
3. कपडे धुण्याची पावडर अथवा साबण हा लंगोट वर राहता कामा नये कारण त्यामुळे बाळाच्या जांगेतील जागेवर त्याची रिअँक्शन होऊन तो भाग लालसर पडू शकतो.
4. जर बाळाला जास्त प्रमाणात चट्टे आले असतील तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे अँटी फंगल पावडर किंवा अँटी फंगल क्रीमचा ( Diaper rash cream) वापर करावा. जेव्हा क्रीम लावाल तर ते चोळून लावू नये व जास्त प्रमाणात लावावे व ती जागा अर्धा तास तरी मोकळी ठेवावी.
5. नेहमी डायपरचा वापर टाळावा. पण काही कारणास्तव डायपर वापरावे लागत असेल तर थोडा वेळ बाळाला बिना डायपरचे सुद्धा ठेवावे जेणेकरून त्या भागाला हवा लागते व संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होते.
6. बाळाची कोमट पाण्याने अंघोळ घालावी व आंघोळीनंतर बाळाची पार्श्व भागाची जागा कोरडी करून तेथे अँटी फंगल डस्टिंग पावडर टाकावी.
बरेचदा विचारण्यात येणारे प्रश्न
डायपर रॅश कमी होण्यासाठी कोणते क्रीम वापरावे ?
डायपर रॅश कमी होण्यासाठी अँटी फंगल क्रीम वापरू शकतात. पण स्टेरॉईड क्रीम चा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावा. Alovera याचा वापर सुद्धा डायपर रॅश कमी करण्यासाठी होतो.
डायपर रॅशबद्दल केव्हा जास्त काळजी करावी ?
जेव्हा डायपर रॅश बेंबीच्या खाली व गुडघ्याजवळ पसरत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते
आईचे दूध डायपर रॅश कमी करण्यास फायदेशीर असते का ?
आईचे दूध फायदेशीर असते परंतु काही वेळेस लॅक्टोज इंटॉलरन्स मध्ये फायदेशीर नसते.
डायपर रॅश कशा मुळे लगेच कमी होते ?
डायपर रॅश अँटी फंगल क्रीम मुळे लवकर कमी होऊ शकते पण ते व्यवस्थित लावणे महत्त्वाचे असते.
बाळाला वारंवार डायपर रॅश का होते ?
जर बाळाला वारंवार डायरिया होत असेल तर बाळाला पुन्हा पुन्हा डायपर रॅश होऊ शकते.
डायपर रॅशसाठी व्हॅसलिन वापरू शकतो का ?
डायपर रॅशसाठी व्हॅसलीन चा वापर करता येतो. व्हॅसलिनमुळे बाळाची त्या जागेवरची खाज कमी होते.
डायपर रॅश वर खोबरेल तेल लावले तर चालते का?
खोबरेल तेलाचा वापर डायपर रॅश कमी होण्यासाठी होत नाही पण तेल लावल्याने त्याजागेवरची खाज कमी होते.
डायपर रॅश दुखणारी असते का ?
डायपर रॅश दुखणारी नसते पण त्या जागेवरील, त्वचेवरील भाग निघाल्याने त्या ठिकाणी खाज येते व बाळ त्यामुळेच रडत राहते.
डायपर रॅश असतांना डायपर वाईप वापरावे का ?
डायपर रॅश ऍक्टिव्ह असतांना वाईपचा (wipes) वापर टाळावा कारण त्यामुळे त्या जागेवरील इरिटेशन त्यातील केमिकल्स मुळे अजून वाढते.
वरील सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला नक्की समजून आले असेल की तुमच्या बाळाला डायपर रॅश झालेली असेल त्या वेळेस काय काळजी घेतली पाहिजे. तरीपण तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही खाली कंमेंट करू शकतात. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेयर करा.